जळगाव, दिनांक 18 - शेतकरी जनता अपघात योजना सन 2011-12 व 2008-09
मधील मयत शेतक-यांचे वारसदारांना धनादेश वाटप करण्याबाबत कार्यक्रम जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी जळगाव यांचे कार्यालयामध्ये कबाल ईन्स्युरन्स ब्रोकिंग सव्हिसेस
प्रा.लि.यांचे संयुक्त विद्यमाने मयत झालेल्या शेतक-यांच्या वारसदारांना मदत
म्हणून जिल्हयातील एकुण 14 लाभार्थींना प्रत्येकी रुपये एक लाखाचा धनादेश जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी श्री.किसन मुळे व कबाल ईन्स्युरन्स कंपनीचे संचालक
श्री.श्रीधर व्यवहारे, विभाग नाशिक यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी
विभागीय व्यवस्थापक श्री.अमर पन्हाळे, कंपनी प्रतिनिधी श्री.मुकुंद कुलकर्णी,
जिल्हा प्रतिनिधी श्री.दिपक सोनवणे तसेच कृषि उपसंचालक श्री.के.डी.महाजन व
उपविभागीय कृषि अधिकारी श्री.घालगडे उपस्थित होते.
धनादेश
प्राप्त शेतक-यांचे वारसदार पुढीलप्रमाणे - ज्योतीबाई रामदास पाटील (नागलवाडी,
चोपडा) इंदुबाई काशिनाथ पाटील (नागदुली म्हसावद, एरंडोल) रामबाई पोपट कोळी (वटार,
चोपडा) मंगलाबाई दशरथ पाटील (नांद्रा,पाचोरा) अनिता एकनाथ महाजन (कजगाव, भडगाव)
राजकोरबाई देविदास पाटील (एकरुखी, अमळनेर) निर्मलाबाई विनायक नालकर (राजोरे,
अमळनेर) नंदाबाई बळवंत पाटील (महालपुर, पारोळा) लताबाई भारत पाटील (सारवे बुदुक,
पारोळा) अलकाबाई मिलींद पाटील (वर्डी, चोपडा) भगवान शिवाजी पाटील (कंकराज, पारोळा)
वैष्णवी सतिश पाटील (कजगाव, भडगाव) मंगलाबाई युवराज पाटील (खडगाव गोरगावले, चोपडा)
रेखाबाई नरेंद्र पाटील (आटवाडे, रावेर). या कार्यक्रमाचे नियोजन कृषि पर्यवेक्षक
श्री.एम.एम.पाटील व श्री.डी.वाय.महाले यांनी केले.
No comments:
Post a Comment