Saturday, 20 October 2012

जळगांवच्या केळीचा फळ पिक विमा योजनेत समावेश



           जळगांव, दि. 20 :- जिल्हयातील केळी व डाळींब या पिकांचा समावेश हवामान  आधारित पथदर्शक फळ पिक विमा योजना सन 2012-13 मध्ये करण्यात आलेला आहे. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त केळी व डाळींब उत्पादक शेतक-यांनी हेक्टरी सहा हजाराचा विमा हप्ता 31 ऑक्टोंबर पर्यत भरण्याचे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
            सदरच्या योजनेतंर्गत केळी व डाळींब पिकांना प्रति हेक्टरी 12 हजाराचा विमा हप्ता असून शेतक-यांना फक्त सहा हजार रुपये भरावयाचे असून उर्वरित रक्कम केंद्र  व राज्य प्रत्येकी 3 हजार रुपये भरणार आहे. सदरची रक्कम 31 ऑक्टोंबर पर्यत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक अथवा  रार्ष्टीयकृत बॅकेच्या शाखेत 7/12 उतारा व 8 अ उता-यासह शेतक-यांनी भरावयची आहे, अशी माहिती  श्री. ठाकूर यांनी दिली..
            तसेच सदरचे विमा संरक्षण केळी पिकांकरिता 1 नोव्हेंबर 2012 ते 28 नोव्हेंबर 2013 या कालावधीत लागू असून डाळींब पिकाकरिता  1 नोव्हेंबर 2012 ते 31 मार्च 2013 या दरम्यान विमा संरक्षण असेल दोन्ही पिकांसाठी प्रति हेक्टरी एक लाखाचे विमा संरक्षण लागू करण्यात आले असल्याचे श्री. ठाकूर यांनी सांगितले.
            या योजनेची जळगांव जिल्हयात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी याकरिता प्रत्येक तालुक्यासाठी महसुल मंडळे कार्यरत आहेत. यात केळी पिकासाठी पिंप्राळा, भोकर, म्हसावद (ता. जळगांव) वरणगांव, पिंपळगांव बु. ( ता. भुसावळ ) मुक्ताईनगर, अंतुर्ली, घोडसगांव, कु-हा, ( ता. मुक्ताईनगर ), रावेर खानापूरृ ऐनपूर, खिर्डी बु. निंभोरा बु. खिरोदा प्र. या.  सावदा ( ता. रावेर ,) यावल, किनगांव, साकळी, बामणोद, भालोद फैजपूर ( ता.यावल) , नाडगांव ( ता. बोदवड), अंमळनेर, नगांव, पातोंडा, अमळगांव, मारवड ( ता. अंमळनेर ), चोपडा, चहार्डी, हातेड, अडावद, धानोरा प्र. अ, लासूर    (ता. चोपडा) , धरणगांव, सावळदा, पिंप्री, रोटवद, चांदसर, पाळधी  (ता. धरणगांव), एरंडोल, रिंगणगांव, उत्राण, गह कासोदा ( ता. एरंडोल), भडगांव, कजगांव, कोळगांव, आमडदे (ता. भडगांव ), जामनेर, नेरी, मालदाभाडी, पहूर, शेंदुर्णी, तोंडापूर, फत्तेपूर, वाकडी ( ता. जामनेर), चाळीसगांव, शिरसगांव, बहाळ.मेहुणबारे हातले, तळेगांव. खडकी बु. ( ता. चाळीसगावं). पाचोरा, नांदा. कु-हाड बु. नगरदेवळा, गाळण. वरखेडी, पिंपळगांव बु. ( ता. पाचोरा)
            पिंपळगांव बु ( ता.पाचोरा) येथे महसूल मंडळे कार्यरत आहेत. त्याप्रमाणेच डाळींब पिकांसाठी नगरदेवळा. गाळण (ता. पाचोरा), चाळीसगांव, शिरसगांव, हातले. तळेगांव. खडकी बु. ( ता. चाळीसगांव ) येथे कृषि महसूल मंडळे कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment