Thursday, 9 August 2012

कामगार न्यायाल्याची महा - लोकअदालत


         जळगांव, दि. 9 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव, यांच्यामार्फत कामगार न्यायालय, जळगांव येथील प्रलंबीत असलेले खटले तडजोडीने लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी रविवार दि. 16 सप्टेंबर 2012 रोजी सकाळी 10.30 वाजता न्यायालय परिसर, जुने बी.जे. मार्केट, 3 रा मजला, जी गाळा जळगांव येथे महा - लोकअदालत घेण्यात येणार आहे. तरी कामगार न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसेस ज्यांना महा-लोकअदालतमध्ये ठेवावयाच्या असतील त्या सर्व संबंधीतांनी स्वत: /वकीलांमार्फत / प्रतिनिधीमार्फत महा-लोकअदालतमध्ये प्रकरण ठेवण्याबाबतचे संमतीपत्रक भरुन दयावे असे न्यायालय अधिक्षक, श्री. अशोक पानपाटील यांनी कळविले आहे.
                                                                                         0 0 0 0 0

ऑक्टोंबर - 2012 मध्ये होणा-या
12 वी परिक्षेची प्रिलिस्ट सोमवारी वितरीत होणार
       जळगांव, 9 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळामार्फत ऑक्टोंबर - 2012 मध्ये घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेस प्रविष्ठ होणा-या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची प्रिलिस्ट मंडळाच्या नेहमीच्या वाटप केंद्रावर (नाशिक, मालेगांव, धुळे, नंदुरबार, भुसावळ, चाळीसगांव अंमळनेर) सोमवार दिनांक 13 ऑगस्ट 2012 रोजी सकाळी 11 ते 5या वेळेत वाटप करण्यात येणार आहे. तसेच दुरुस्त केलेली प्रिलिस्ट गुरुवार दिनांक 16 ऑगस्ट 2012 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत निर्धारित वाटप केंद्रावर स्विकारण्यात येणार आहे. याची सर्व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी नोंद घेवून आपला जबाबदार प्रतिनिधी अधिकार पत्रासह दिनांक 13 ऑगस्ट 2012 रोजी उपरोक्त वाटप केंद्रावर प्रिलिस्ट घेण्यास पाठवावा असे आवाहन बी.एस.सुर्यवंशी विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
                                                                            0 0 0 0 0
 

No comments:

Post a Comment