Monday, 6 August 2012

सुवर्ण जयंती राजस्व अभियानात आवश्यक बदल करुन यावर्षीही अभियान राज्यात राबविणार- बाळासाहेब थोरात

            मुंबई, दि. 6: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांना दिलासा देण्यासाठी तसेच प्रशासकीय कामात गतीमानता येण्यासाठी महसूल विभागामार्फत राज्यात राबविण्यात  येत असलेल्या सुवर्ण जयंती  राजस्व अभियानाला मिळालेल्या प्रतिसादामुळे यापुढेही या अभियानात आवश्यक ते बदल करुन हे अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्या संदर्भात 4 जुलै, 2012 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्यमंत्री प्रकाश सोळंके आणि विभागाचे अपर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते.
     महसूल विभाग लोकाभिमुख, कार्यक्षम, गतीमान व पारदर्शक करण्यासाठी हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत सर्वसामान्य जनतेला 40 लाख विविध दाखले देण्यात आले. लोक सहभागातून व कायदेशीर तरतुदीच्या आधारे बंद झालेले शेत रस्ते 25हजार 323 कि.मी.चे शेत रस्ते तयार करण्यात आले. फेरफार अदालत आयोजित करुन 8 लाख 70 हजार 272 फेरफार मंजूर करण्यात आले. प्रलंबित असलेले 56 हजार महसूल व अपिल प्रकरणे निकाली काढण्यात आले. ई चावडी अंतर्गत 82 हजार दाखले व उतारे देण्यात  आले, अशी माहिती श्री. थोरात यांनी यावेळी दिली. सुवर्ण जयंती राजस्वअभियाना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
* * * * *
पवार/पौडवाल/6.8.2012

No comments:

Post a Comment