Thursday, 9 August 2012

रोहयोच्या अपूर्ण कामांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार- पालकमंत्री गुलाबराव देवकर


               जळगांव, दि. 9 :- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत यापूर्वी मंजूर करण्यात सिंचनाची कामे विविध कारणांमुळे अपूर्ण राहिले आहेत ती कामे पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी शासनाकडून मिळवून घेण्यासाठी मी प्रयत्नशिल आहे. मात्र अधिका-यंच्या बैठकीत दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करुन अपूर्ण राहिलेली कामे पुर्णत्वास न्यावी असे आव्हान पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रोजगार हमी योजनेंच्या कामांचा आढावा आज पालकमंत्र्यांनी घेतला यात प्रामुख्याने चालु कामे, बंद कामे अपूर्ण कामे यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, गिरीष महाजन, दिलीप वाघ, साहेबराव पाटील, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, उप जिल्हाधिकारी जितेंद्र वाघ, सिंचन विभागाचे अधिकारी वनविभागाचे अधिकारी यावेळेत उपस्थित होते.
                                                                            0 0 0 0 0

No comments:

Post a Comment