जळगाव, दिनांक 26 - धरणगाव शहरातील पाच प्रमुख रस्त्यांच्या कामांना स्थानिक विकास निधीतून 80 लक्ष रुपये अनुदान पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांनी उपलब्ध करुन दिले असून आज त्यांच्या अध्यक्षतेखाली पद्मालय विश्रामगृहात झालेल्या अधिकारी व नगरसेवकांच्या संयुक्त बैठकीत येत्या 15 दिवसात या कामांना सुरुवात करावी अशा सूचना त्यांनी संबंधित विभागांच्या अधिका-यांना दिल्या.
जिल्हयात रात्रीचे विद्युत भार नियमांचा कालावधी दोन तासांनी कमी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिका-यांना दिल्याने जिल्हयात दोन तास भारनियमन कमी झाल्याने उपस्थितांनी पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.
धरणगाव शहरातील स्थानिक विकास निधीतून तयार करण्यात येणा-या प्रमुख रस्त्यांची नावे - तेली तलाव ते कोट बाजार बालाजी मंदीर, शिवाजी पुतळा ते बालाजी स्टोअर्स, राजफुट वेअर ते परिहार चौक, पारधी वाडा ते मातोश्री कॉप्लेक्स, धनगर गल्ली ते परिहार चौक, कोट बाजार ते बालाजी पतपेढी या रस्त्यांचा समावेश आहे.
या बैठकीस धरणगाव नगर परिषदेचे गटनेते दिलीप वाघमारे, नगरसेविका सौ.पद्मीनी डहाळे, श्रीमती लता चव्हाण, चंद्रकला सोनवणे, नगरसेवक सर्वश्री निहालभाई चौधरी, पी.एम.पाटील, गोविंद पानसरे, हाजी शेख ईब्राहीम, छाूटूभाऊ महाले, सार्वजनिक बांधकाम अमळनेर विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.पाटील, उपअभियंता सुरवाडे, जिल्हा बॅकेचे संचालक वाल्मिक पाटील, जळगाव पंचायत समितीचे उपसभापती विजय नारखेडे, धरणगावचे सामाजिक कार्यकर्ते आदि संख्येने उपस्थित होते.
* * * * * *
No comments:
Post a Comment