मुंबई,
दि. 22 : राज्य शासनाने खासगीकरणातून अर्थात बांधा - वापरा- हस्तांतरित करा तत्वावर बांधलेल्या
महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग वगळून इतर सर्व रस्त्यांवरील टोल नाक्यावर
प्रकल्पाची सर्वंकष माहिती देणारे इलेक्ट्रॉनिक
डिजीटल बोर्डस् येत्या 15 सप्टेंबर पूर्वी दर्शनी जागी लावावेत, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज
विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
छगन भुजबळ यांनी आज मंत्रालयात
सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व मुख्य अभियंत्यांसमवेत रस्ते, महामार्ग, टोल
नाके, पथकर स्थानकांवर प्रसाधनगृहे, प्रथमोचार, अग्निशमन उपकरणे, कर्मचाऱ्यांचे
गणवेश, तक्रार पुस्तिका, पार्कींगची व्यवस्था आदी कामांचा आढावा घेतला. बैठकीस राज्यमंत्री रणजित कांबळे, विभागाचे
सचिव श्यामलकुमार मुखर्जी व वरिष्ठ अधिकारी
उपस्थित होते.
भुजबळ पुढे म्हणाले की, टोल
नाक्याच्या दर्शनी जागी बसवावयाच्या या डिजिटल बोर्डवर प्रकल्पाची एकूण किंमत, टोल
वसूल करावयाचा पूर्वनिश्चित कालावधी, झालेली टोल वसुली व होणाऱ्या टोल वसुलीची रक्कम
या बाबी ठळकपणे व सहज वाचता येतील, अशा पद्धतीने फलकावर दर्शवाव्यात. हा फलक दिवसा व रात्री सहजपणे दिसणे गरजेचे आहे.
पथकर स्थानकावर वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता वाहनधारकांना महापास (ई -
टॅग ) ची सुविधा लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ही योजना पुणे, जालना
रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात यावी व त्यानंतर राज्यभरातील सर्व पथकर
स्थानकांवर ती सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व मुख्य अभियंत्यांनी राज्य रस्ते
विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्याशी समन्वय साधावा, अशी सूचनाही भुजबळ
यांनी सर्व मुख्य अभियंत्यांना यावेळी दिली.
या डिजिटल फलकावर एकूण तेरा बाबींची माहिती देण्यात येणार असून फलकाचा आकार
4x8 फूट एवढा असेल, या अगोदर इलेक्ट्रॉनिक
माहिती फलक प्रायोगिक तत्वावर नगर ते जालना या रस्त्यावर 5 ठिकाणी बसविण्यात आले
आहेत,असे यावेळी सांगण्यात आले.
प्रकल्पासंबंधीची न बदलणारी माहिती वेगळ्या फलकावर लिहून अन्य आवश्यक माहिती अधिक मोठ्या अक्षरात दिसेल, अशी व्यवस्था
करण्याची सूचना राज्यमंत्री रणजीत कांबळे यांनी केली. टोल नाक्याच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची त्वरित
उभारणी करावी, असेही त्यांनी सुचविले.
रस्त्यांवरील विशेषत: महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी वेळ वाचविणे तसेच
टिकाऊपणाच्या दृष्टीने पेव्हर ब्लॉकचा वापर
करावा, असे भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना
सांगितले. विशेषत: मुंबई - गोवा महामार्गावर आगामी गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी
वाहतूक विचारात घेऊन या महामार्गावरील खड्डे बुजवणे व इतर आवश्यक दुरुस्तीची काम
प्राधान्याने हाती घ्यावीत, असे भुजबळांनी
यावेळी आवर्जून सांगितले.
राज्यातील महामार्गावरुन जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची गणना करण्यासाठी
व्हिडीओ बेसड् ऑटोमॅटीक काऊंट ऍ़न्ड क्लासिफिकेशन हे आधुनिक उपकरण
वापरण्यासंबंधीचे एक सादरीकरण यावेळी करण्यात आले. या नव्या उपकरणामुळे रस्त्यावरुन
जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचे छायाचित्र, त्याचा प्रकार, त्याच्या जाण्याची वेळ
इत्यादि माहिती विनाविलंब उपलब्ध होणार आहे.
वाहनांची वर्गवारी करुन इतर तपशील सतत नोंदला जाणार असून मुख्य कार्यालयात
ही माहिती पाठविण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. ही यंत्रणा दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही
स्वयंचलिपणे काम करु शकेल. वाहतुक गणनेत
पारदर्शकता येण्यासाठी ही नवी यंत्रणा वापरण्याच्या सूचना भुजबळ यांनी यावेळी
दिल्या.
0 0 0 0
No comments:
Post a Comment