मुंबई, दि. 9:
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार राज्य निवडणूक
आयोगाने 9 सप्टेंबर 2012 रोजी होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमात बदल केला असून आता
पूर्वनियोजित 9 सप्टेंबर 2012 रोजी केवळ 124 ग्रामपंचायतींच्याच निवडणुका होणार
असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.
पाच वर्षांची मुदत
संपण्यापूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक घेणे राज्य निवडणूक आयोगावर बंधनकारक असते.
पूर्वनियोजित कार्यक्रमातील 124 ग्रामपंचायतींच्या मुदती ऑक्टोबर 2012 मध्ये संपत
असल्यामुळे त्यांच्या निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
उर्वरित ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम यथावकाश जाहीर करण्यात येणार आहे. आता
आचारसंहिता केवळ 124 ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातच लागू असेल, असे श्रीमती
सत्यनारायण यांनी सांगितले.
पूर्वनियोजनानुसार निवडणूक
होणाऱ्या 124 ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशनपत्रे 21 ऑगस्ट 2012
ते 25 ऑगस्ट 2012 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 27 ऑगस्ट 2012 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची
अंतिम मुदत 29 ऑगस्ट 2012 असेल. त्याच दिवशी चिन्ह नेमून
देऊन अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली
जाईल. 9 सप्टेंबर 2012 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी
5.30 या कालावधीत मतदान होईल. दुसऱ्या
दिवशी म्हणजे 10
सप्टेंबर 2012 रोजी मतमोजणी होईल, अशीही माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली
आहे.
9 सप्टेंबर 2012 रोजी मतदान
होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय नावे पुढील प्रमाणे:
चंद्रपूर: ब्रह्मपुरी- किताळी, सिंदेवाही- नांदगाव, सावली- बोथाली, गेवरा बूज.
जळगाव:
बोदवड- कोल्हाडी.
नागपूर: कामटी- अडका, अजनी,
आवंधी, भीलगाव, भोवारी, भूगाव, बिना, दिघोरी, गाडा, गुमथी, गुमथसाळा, जाखेगाव,
कढोली, कापसी, केम, खैरी, खापा, खासला, लिहिगाव, प्ररसळ, रनाळा, शिवनी, सोनेगाव,
सुरादेवी, तरोडी, वडोदा आणि येरखेडा.
पुणे:
इंदापूर- गाणजेवळण, भोर- मालेगाव, सांगवी खु. मुळशी- बावधन बु.
ठाणे:
मोखाडा- चास, मुरबाड- कन्होल, तोंडली.
हिंगोली: बसमत-
बोरगाव बु, दगडपिंप्री, दिग्रज, हिराडगाव, हिवरा खु, कौठा, कुडाळा, लहान,
महमदपूरवाडी, पारिली, परजणा, वाखारी, विरेगाव.
अकोला: अकोट- अकोली जहागीर, अकोलखेड, बेलेगाव, बांबरडा, बेलुरा, देऊळगाव,
धामणगाव, धारेल, दिवाठाणा, जळगाव नाहाटे, जितापूर, कळवाडी, करातवाडी, करातवाडी
रेल्वे, लामकणी, लोहारी खु, लोटखेड, महागाव, मरोडा, मुंडगाव, नाखेगाव, नेवहोरी बु,
पाटसूल, पुंडा, रऊंडाळा, रेल, रोहनखेड, सावरगाव, शहापूर रुपग, टाकळी बु, टाकळी खु,
तरोडा, वडाळी सटवाई, वडगाव मेंढे, वणी, वरुळा, वासतापूर मंक्री.
नांदेड: किनवट- भीमपूर
सिरमेटी, जरूर, मरेगाव वरचे, भुलजा, पिंपळशेंडा, पिंपरफोडी, घोगरवाडी.
गडचिरोली: गडचिरोली- देवापूर,
नाशिक:
मालेगाव- रोंझे, मालगव्हाण, शिरसोंडी,
नांदगाव- बोयगाव, घाणेर, लक्ष्मीनगर,
लोढरे, मूळडोंगरी, नागापूर, पिंपरखेड, शास्त्रीनगर, भार्डी, धोटाणे खु, हिरेनगर,
हिसावळ बु, कासवखेडा, नवसारी, तळवडे,
यवतमाळ: आर्णी- बेलोरावन, भंडारी, भानसरा, एवलेश्वर, पालोडी,
सावली, शिवार बु. नेर- सातेफळ.
औरंगाबाद: वैजापूर- शिर्डी हरगोविंदपूर
No comments:
Post a Comment