जळगांव, दि. 13 - राज्याचे कृषि, परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
मंगळवार, दिनांक 14 ऑगस्ट, 2012 रोजी सकाळी 6.15 वा. जळगांव रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने मधुबन बंगल्याकडे प्रयाण, सकाळी 6.30 वा. मधुबन बंगला येथे आगमन व राखीव, सकाळी 8.00 ते 10 वा.राखीव जळगांव. सकाळी 10.00 वा. जनता दरबार, स्थळ :- पदमालय विश्रामगृह, जळगांव, दुपारी 1.00 वा. श्री चित्रनिश पाटील रा. आसोदा यांचेकडे वास्तूशांती कार्यक्रम स्थळ : भोळे नगर, आसोदा, दुपारी 3 ते 5.00 राखीव जळगांव, सायं 5.00 वा. दै.तरुण भारत कार्यालयास भेट, सायं 6.वा. दैनिक पुण्यनगरी दशकपूर्ती वर्धापनदिन सोहळा (5.30 ते 9.30) स्थळ : सरस्वती सभागृह, लेवाबोर्डीग, जळगांव मुक्काम जळगांव बुधवार, दिनांक 15 ऑगस्ट, 2012 सकाळी 9.05 वा. ध्वजारोहण कार्यक्रम स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालयाचे पटांगण, जळगांव. सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वा. राखीव जळगांव. दुपारी 3.30 वा. शासकीय मोटारीने खेडगांव ता. चाळीसगांवकडे प्रयाण. सायं 5.00 वा. खेडगांव, ता. चाळीसगांव येथे आगमन व शहीद जवानाच्या स्मारकांच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 11.00 वा. चाळीसगांव येथून 12810 हावडा एक्सप्रेसने मुबंईकडे प्रयाण.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment