Saturday, 4 August 2012

पशु गणना निर्धारीत कालावधीत पूर्ण करा -जिल्हाधिकारी राजूरकर







 जळगांव, दि. 4 :- जिल्हयातील पशुगणना कार्यक्रम निर्धारीत कालावधीत पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आज येथे केले. 19 वी  पशुगणना कार्यक्रमाची पूर्व तयारी संदर्भात जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी मनपा  आयुक्त तथा अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ , जिल्हा सांख्यिकी अधिकारी आर. ए. पवार जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. व्ही. टी. रुईकर, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील जिल्हयातील नगर पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, प्रगणकांची नेमणूक करतांना शासनाने केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करुन प्रगणकांची माहिती  तत्काळ सादर करावी 1500 कुटूंबासाठी एक प्रगणक सहा प्रगणकांसाठी एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यात येईल. ग्रामीण भागात 6  लाख 18 हजार 314 तर शहरी भागात 2 लाख 73 हजार 920 कुटूंब  संख्या आहे. प्रगणकांची नेमणुक करतांना तांत्रिक कौशल्य असलेले कृषी पदविकाधारक अथवा शास्त्र शाखेचा पदवीधर अशा प्रकारे प्राधान्यक्रम दयावा त्यानंतर दहावी , बारावी पास बेरोजगार महसूल शिक्षण विभाग आणि महिला बाल विकास विभागातील कार्यक्रमांना याकामी नेमणूका दयाव्यात.
            जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त तथा जिल्हा पशु गणना अधिकारी डॉ. व्ही. जी . फालक यांनी आपल्या प्रास्ताविकात 19 वी  पशु गणना 15 ऑक्टोंबर आधार दिवस धरुन करण्यात येणार असून 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोंबर या कालावधीत पशुगणना पूर्ण करावयाची आहे. ग्रामीण भागातील पशुगणनेसाठी पांढ-या रंगाचे प्रपत्रके असून नागरी भागांसाठी पिवळया रंगाचे प्रपत्रके आहेत. मागील पशुगणनेच्या तुलनेत हया पशुगणनेत इतर माहिती संकलीत करावयाची नसल्याने प्रपत्रकातील रकान्यांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे अचूक  माहिती वेळेत संकलीत होवून निर्धारीत कालावधीत पशुगणना पूर्ण होईल.

No comments:

Post a Comment