जळगांव, दि. 16 :- जळगांव जिल्हयात दिनांक 20 ऑगस्ट 2012
रोजी रमझान ईद हा सण मुस्लीम बांधव मोठया उत्साहात साजरी करणार आहेत. सदर उत्सव
शांततेत व सुरळीतपणे पार पडावा व त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच मदयपीच्या गैरवर्तणूकीमुळे
या कार्यकमात व्यत्यय येऊ नये व सामाजिक सलोखा रहावा तसेच या कालावधीत जळगांव
जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर
राजूरकर यांनी दिनांक 20 ऑगस्ट 2012 रोजी रमझान ईद निमित्त् जळगांव जिल्हयातील
सर्व महानगरपालीका, नगरपरिषद / नगरपालीका (जळगांव, भुसावळ, मुक्ताईनगर, एरंडोल, धरणगांव,
चोपडा, अंमळनेर, पारोळा, चाळीसगांव, यावल, रावेर, सावदा, फैजपूर, पाचोरा, भडगांव,
बोदवड, जामनेर ) व तालुक्याचे ठिकाणी असलेल्या क्षेत्रातील मदय विकीच्या सर्व
अनुज्ञप्त्या (सिएल -3 सिएल/ एफएल/टिओडी-3 एफएल -2एफएल -3 एफएल/बी.आर -2 व ताडीचे
दुकाने ) रात्री 6.00 वाजेपर्यत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाचे उल्लघन
केल्याचे आढळून आल्यास त्यांच्या विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल असेही या आदेशात
नमूद करण्यात आले आहे.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment