मुंबई,
दि. 9 :
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता
मंत्रालयाच्यावतीने अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था
यांना सन-2012 च्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी
अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अर्जांमधूनच महाराष्ट्र राज्याच्या
सामाजिक न्याय विभागामार्फत, अपंग कर्मचारी (स्वयंरोजगार) व त्यांचे नियुक्तक
यांना दिल्या जाणाऱ्या अपंग कल्याण राज्य पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी उत्कृष्ट कर्मचारी -
स्वयंउद्योजक अपंग व्यक्ती ; उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी /
संस्था; अपंग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या उत्कृष्ट
व्यक्ती (व्यावसायिकासह) व उत्कृष्ट संस्था ; प्रतीथयश व्यक्ती; अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारण्याच्या
उद्देशाने केलेले उत्कृष्ट संशोधन/ उत्पादन निर्मिती; अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी अडथळा विरहीत वातावरण निर्मिती करणारे कार्यालय /
संस्था; अपंग व्यक्तींना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा; आत्ममग्न,
मेंदूचा पक्षाघात, मतिमंद व बहुविकलांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्यास
अधिनियमांतर्गत कार्य करणारी स्थानिकस्तर समिती; राष्ट्रीय अपंग वित्त व विकास
महामंडळाचे कार्य करणारी राज्य यंत्रणा; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रौढ अपंग
व्यक्ती; उत्कृष्ट कार्य करणारे अपंग बालक; उत्कृष्ट ब्रेल छापखाना ; उत्कृष्ट
सहजसाध्य संकेतस्थळ इत्यादी प्रवर्गातील
व्यक्ती/संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
वरील
पुरस्काराकरीता करावयाच्या अर्जाचे नमुने जिल्हा परिषदेतील जिल्हा समाजकल्याण अधिकारी
तसेच मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांमध्ये
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयातून पुरविण्यात येतील. तसेच अर्जाचे
नमुने केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या www.socialjustice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
नारायणगाव येथे 26 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरपर्यत
तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
मुंबई, दि. 9 : सांस्कृतिक कार्य संचालनालय
आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने
26 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर
या कालावधीत पुणे जिल्ह्यातील
नारायणगाव येथे तमाशा निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर निवासी शिबिर 20 दिवसांचे असून
यात 5 स्थानिक शिबिरार्थी आणि बाहेरील 15
अशा 20 शिबिरार्थीची निवड करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांना तमाशा कलाप्रकाराबद्दल अनुभव किंवा मूलभूत
माहिती असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा मुलांसाठी
15 ते 30 वर्ष तर मुलींसाठी 15 ते 25
वर्ष अशी ठेवण्यात
आली आहे.
प्रशिक्षणासाठी निवड होणाऱ्या शिबिरार्थीचा प्रवास खर्च, निवास व्यवस्था,
भोजन व्यवस्था शासनाकडून करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी शिबिर संचालक म्हणून ज्येष्ठ कलावंत वसंत अवसरीकर यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. इच्छुकांनी आपले अर्ज, परिचय आणि आवश्यक प्रमाणपत्रासह संचालक, सांस्कृतिक कार्य
संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई -32 यांच्याकडे 16 ऑगस्ट 2012 पर्यंत पाठवावेत.
अर्ज mahaculture@gmail.com या ई-मेलद्वारे तसेच 022-22043550 या क्रमांकावर फॅक्सद्वारेही स्वीकारले जातील.
No comments:
Post a Comment