Friday, 10 August 2012

नाशिराबाद लघु पाटबंधारे तलावास पालकमंत्री देवकर यांची भेट


जळगांव, दि. 10 :- राज्याचे कृषी, परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज जळगांव तालुक्यातील नशिराबाद (मूर्दाबाद) लघु पाटबंधारे तलावास भेट देवून कामांच्या प्रगतीची पहाणी केली यावेळी त्यांच्या समवेत अधिक्षक अभियंता ए. एस. मोरे, कार्यकारी अभियंता एस. जी. बागुल, उपविभागीय अभियंता एस. बी. पाटील, जळगांव पंचायत समितीचे उपसभापती विजय नारखेडे, पंकज महाजन, विकास पाटील, योगेश देसले, कैलास व्यवहारे , शाखा अभियंता आर. जी . राणे , ग्रामस्थ उपस्थित होते.
          जळगांव  लघु पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत वाकी नदीवरील नशिराबाद (मूर्दाबाद) लघु पाटबंधारे प्रकल्पामुळे परिसरातील नशिराबाद, मन्यारखेडा, मुरारखेडा, तरसोद, असोदा या गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे. एकूण 899 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
          यावेळी देवकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. जल वितरीकेचे काम न झाल्यास अपेक्षित सिंचनाचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी काही ग्रामस्थांनी केल्याने देवकरांनी त्वरीत सदर कामे हाती घेण्याच्या सूचना केल्या. निधी उपलब्धते बाबत शासनस्तराव प्रलंबीत प्रस्तावाचा पाठपुरवा करण्यासाठी विशेष अधिकारी मंत्रालयात पाठविण्याच्या सूचना यावेळी दिल्यात.

                                                                           0 0 0 0 0

No comments:

Post a Comment