Thursday, 16 August 2012

राज्यातील शेतक-यांचे देशाबाहेर अभ्यास दौरा


         जळगांव, दि. 16 :- राज्यातील शेतक-यांचे अभ्यास दौरे ही योजना या वर्षी कार्यान्वीत झाली असुन लाभार्थी शेतकरी यांना अभ्यास दौ-यासाठी  प्रवास खर्चाच्या 50 टक्के अथवा कमाल रु. 1,00,000 /- (रुपये एक लाख फक्त ) या मध्ये जे कमी असेल ते प्रति शेतकरी या मर्यादेत अनुदान देय आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थी हे स्वत: शेतकरी असावेत व त्याचे नावाने  7/12 व 8/अ चा उतारा असावा. वय, जन्मतारीख प्रमाणपत्र असावे. शिक्षण (प्रमाणपत्र), शेतक-यांनी पासपोर्ट काढलेला असावा. सहभागी होणारे शेतक-याचे कमाल वय 65 वर्षे असावे. शेतक-याने स्वत:चा आरोग्‍य विमा काढलेला असावा. विदेश दौ-यासाठी अनुदान मर्यादित असल्याने कृषि विषयक कामगिरी करीता शासकीय पुरस्कार मिळालेल्या शेतक-यांना प्रथम प्राधान्य्‍ देण्यात येईल. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक , कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा. राज्यातील शेतक-यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतक-यांनी घ्यावा असे आवाहन श्री. संभाजी ठाकूर, उपविभागीय कृषि अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.
                                                      0 0 0 0 0

No comments:

Post a Comment