मुंबई, दि. 6 : इस्लाम धर्मातील पवित्र
रमजान महिना शांती आणि बंधुभावाचा संदेश देणारा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
मुंबई
पोलीस आयुक्तालयामार्फत येथील हज हाऊसमध्ये आज आयोजित ईफ्तार पार्टी कार्यक्रमात
ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,
अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान, आमदार ॲनी शेखर, आमदार अबू
असीम आझमी, मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, पोलीस आयुक्त अरुप पटनायक, चित्रपट
अभिनेते रझा मुराद यांच्यासह विविध देशांचे राजदूत तसेच मुस्लिम बांधव मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री
म्हणाले की, समाजातील बंधुभावाचे वातावरण अधिक वृद्धींगत व्हावे यासाठी
पोलिसांमार्फत नेहमीच प्रयत्न केले जातात. आजचा कार्यक्रम हा त्याचाच भाग आहे. काही
अपप्रवृत्तींमार्फत समाजातील वातावरण बिघडविण्याचे नेहमीच प्रयत्न होत असतात. अशा
अपप्रवृत्तींना बळी न पडता नागरीकांनी बंधुभाव आणि सामाजिक एकोपा कायम ठेवून राज्याच्या
विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
गृहमंत्री
श्री. पाटील म्हणाले की, इस्लाम हा शांतीचा संदेश देणारा धर्म आहे. देशाला मजबूत
करण्यासाठी धर्मनिरपेक्षतेची सर्वाधिक गरज आहे. देशाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी सर्वांची
असून पोलीस दलाचे यासाठीचे योगदान महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment