जळगांव. दि. 4 :- स्वातंत्र्य दिनाचा
65 वा वर्धापन दिनोत्सवा निमित्त दिनांक 15 ऑगस्ट 2012 रोजी ध्वाजरोहणाचा मुख्य
शासकीय कार्यक्रम सकाळी ठिक 9-05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात
होणार आहे. जळगांव शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना या मुख्य शासकीय समारंभात भाग
घेता यावा यासाठी दिनांक 15 ऑगस्ट 2012 रोजी सकाळी 8-35 ते 9-35 वाजेच्या दरम्यान
ध्वजारोहणाचा किंवा कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ करण्यात येऊ नये. जर
एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:च्या ध्वजारोहणाचा समारंभ करावा असे
वाटत असेल तर त्यांनी त्यादिवशी सकाळी 8-35 च्या पूर्वी किंवा 9-35 च्या नंतर
करावा. त्याप्रमाणे उपरोक्त कार्यक्रमास
जळगांव शहरातील नागरिक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी , स्वातंत्र सैनिक, शासकीय
अधिकारी व कर्मचारी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
00000
शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत
21 ऑगस्ट रोजी
महाअंतिम फेरी
जळगांव, दि. 4 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, जळगांव व बोदवड येथे ऑगस्ट 2012 मध्ये प्रवेशाच्या महाअंतिम फेरीच्या
तारखेमध्ये बदल करण्यात आला असून आता महाअंतिम फेरी 17 ऑगस्ट 2012 ऐवजी 21 ऑगस्ट
2012 रोजी होईल बदलाची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण
संस्था जळगांव आणि बोदवड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment