Wednesday, 1 August 2012

राज्यातील 7,756 ग्रामपंचायतींच्या 9 सप्टेंबरला सार्वत्रिक निवडणुका


मुंबई, दि. 1 : राज्यातील 7 हजार 756 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 9 सप्टेंबर 2012 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आज मध्यरात्रीपासून मतमोजणी होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
            नामनिर्देशनपत्रे 21 ऑगस्ट 2012 ते 25 ऑगस्ट 2012 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 27 ऑगस्ट 2012 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 29 ऑगस्ट 2012 असेल. त्याच दिवशी चिन्ह नेमून देऊन अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. 9 सप्टेंबर 2012 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 सप्टेंबर 2012 रोजी मतमोजणी होईल. या सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे (EVM) मतदान घेण्यात येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा दैनंदिन हिशोब सादर करणे आवश्यक राहील; तसेच निवडणुकीनंतर 30 दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल. ती मुदतीत सादर करणाऱ्या उमेदवारांना अनर्ह ठरविण्यात येते, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही राज्य निवडणूक आयुक्तांनी केले आहे.
            जिल्हानिहाय मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या अशी: ठाणे- 98, रायगड- 247, रत्नागिरी- 226, सिंधुदुर्ग- 329, नाशिक- 189, अहमदनगर- 210, धुळे- 108,   जळगाव- 131, नंदुरबार- 53, पुणे- 220, कोल्हापूर-477, सांगली- 459, सातारा- 325, सोलापूर- 194, औरंगाबाद- 218, बीड- 703, हिंगोली- 62, जालना- 285, लातूर- 353, नांदेड- 177, उस्मानाबाद- 165, परभणी- 125, अमरावती- 262, अकोला- 277, बुलडाणा- 278, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नागपूर- 246, भंडारा- 380, चंद्रपूर- 61, गडचिरोली- 39, गोंदिया- 357 आणि वर्धा- 115. एकूण- 7,756

No comments:

Post a Comment