चाळीसगांव, दि.
14:- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 65 वा वर्धापन दिन समारंभ बुधवार दि. 15 ऑगस्ट, 2012 रोजी येथील पोलिस कवायत मैदान येथे सकाळी 9.05 वाजता साजरा करण्यात येणार आहे .
तालुका चाळीसगांव तहसिलदार श्री. शशिकांत हतगल यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात येईल . या समारंभास सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी उपस्थित रहावे, अशी विनंती निवासी नायब तहसिलदार श्री. महेंद्र माळी यांनी एका शासकीय
प्रसिध्दी पत्रकान्वये केली
आहे .
तसेच ज्या एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो त्यादिवशी सकाळी 8-35 वाजेपूर्वी किंवा 9-35 वाजेनंतर करावा.
*****
No comments:
Post a Comment