जळगांव, दि.13 :- महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या समाजसेविकांच्या व संस्थाच्या कामाची दखल घ्यावी व समाजसेविकांना त्यापासुन प्रेरणा मिळावी जेणेकरुन महिला व बालकांच्या उत्थानासाठी समाजसेविका सरसावून पुढे याव्यात या साठी महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्ये करीत असलेल्या जिल्हयातील समाजसेविकांना सन ज्ञ् 2007 -08 ते सन 2010-11 या चार वर्षाच्या कालावधीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करणेबाबत शासनाने जाहिर केले आहे. सदर पुरस्कारांचे वितरण 15 ऑगस्ट, 2012 स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जळगांव जिल्हयाचे पालक मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव देवकर, यांचे शुभ हस्ते करण्यात येणार आहे. पुरस्कारर्थी महिलांचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार (वैयक्तीक)
1. सन 2007-08 सौ. तृप्ता अरुण जावळे, 55 ओंकार नगर, जळगांव.
2. सन 2008-09 सौ. रिता भुपेंद्र बाविस्कर, समर्थ नगर, अंमळनेर, जि. जळगांव.
3. सन 2009 -10 सौ. मिना सिताराम साळी, 1 पत्रकार कॉलनी, जळगांव.
4. सन 2010-11 सौ. अलका दिनकर बडगुजर, जळगांव.
* * * * * * *
No comments:
Post a Comment