मुंबई, दि. 13 : शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी
पत्रकार कल्याण निधीतून पत्रकारांना
आतापर्यंत पाच लाख 63 हजार 200 रुपयांची मदत मंजूर
करण्यात आली.
शंकरराव
चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या उपसमितीची बैठक माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक
प्रमोद नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. या बैठकीस
उपसमितीच्या सदस्य सचिव माहिती संचालक श्रद्धा बेलसरे, सदस्य वैद्यकीय अधिकारी डॉ.परवेज हशिम खान, सदस्य ज्येष्ठ
पत्रकार यशवंत पाध्ये, खजिनदार उपसंचालक रश्मी नांदिवडेकर उपस्थित होत्या
यापूर्वी 29 सप्टेंबर 2011 रोजी झालेल्या बैठकीत 5
पत्रकारांना 1 लाख 45 हजार रुपयांची मदत करण्यात आली. 9 एप्रिल 2012 रोजीच्या
बैठकीत 10 पत्रकारांना 3 लाख 23 हजार 200 रुपयांची तर नुकत्याच झालेल्या बैठकीत
चार पत्रकारांना 95 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली, अशी एकूण पाच लाख
63 हजार 200 रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. शंकरराव चव्हाण
सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून मदत मिळण्याविषयीचे विहीत नमुन्यातील अर्ज
जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध आहेत.
No comments:
Post a Comment