Friday, 31 August 2012

हेरिटेज यादीसंदर्भात मनपा आयुक्त आणि हेरिटेज समितीचे मत मागवुन पुढील निर्णय घेणार : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 31 : मुंबईतील हेरिटेज वास्तू परिसरासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसुचनेत समाविष्ट असलेल्या वास्तुंबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि हेरिटेज समितीचे मत मागवून याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
मुंबईतील हेरिटेज वास्तू परिसरासंदर्भात राज्य सरकारने अधिसुचना प्रसिद्ध केली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, महापौर रमेश प्रभू, आमदार सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, रविंद्र वायकर आदींचा समावेश होता.
शिष्टमंडळाशी बोलताना श्री. चव्हाण म्हणाले की, मुंबई शहरात अनेक वास्तू आणि परिसर ऐतिहासिक महत्वाचे आहेत. विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा ऐतिहासिकपणा हरवु नये, त्यांचे संरक्षण व्हावे आणि हेरिटेजची परंपरा नष्ट होऊ नये, एवढाच उद्देश यामागे आहे. यादृष्टीने ही समिती खूप महत्वाची आहे. यामुळेच ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने सुचविलेल्या वास्तू परिसरासंदर्भात लोकभावना मी समजू शकतो. मात्र, याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि हेरिटेज समितीचे लेखी मत मागविण्यात येईल. त्यांनतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
समितीने जी यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये अनेक राहत्या इमारतींचा समावेश आहे. त्यामुळे त्यांची दुरुस्ती, पुनर्बांधणी यामध्ये अडचणी येईल, अशी शंका नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. यासाठी या यादीचा फेरविचार व्हावा, अशी मागणी शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आली.
* * * * * *

Monday, 27 August 2012

धरणगाव शहरातील 80 लक्ष रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी -- पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर


 
जळगाव, दिनांक 26 - धरणगाव शहरातील पाच प्रमुख रस्त्यांच्या कामांना स्थानिक विकास निधीतून 80 लक्ष रुपये अनुदान पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांनी उपलब्ध करुन दिले असून आज त्यांच्या अध्यक्षतेखाली पद्मालय विश्रामगृहात झालेल्या अधिकारी नगरसेवकांच्या संयुक्त बैठकीत येत्या 15 दिवसात या कामांना सुरुवात करावी अशा सूचना त्यांनी संबंधित विभागांच्या अधिका-यांना दिल्या.
 जिल्हयात रात्रीचे विद्युत भार नियमांचा कालावधी दोन तासांनी कमी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिका-यांना दिल्याने जिल्हयात दोन तास भारनियमन कमी झाल्याने उपस्थितांनी पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.
 धरणगाव शहरातील स्थानिक विकास निधीतून तयार करण्यात येणा-या प्रमुख रस्त्यांची नावे - तेली तलाव ते कोट बाजार बालाजी मंदीर, शिवाजी पुतळा ते बालाजी स्टोअर्स, राजफुट वेअर ते परिहार चौक, पारधी वाडा ते मातोश्री कॉप्लेक्स, धनगर गल्ली ते परिहार चौक, कोट बाजार ते बालाजी पतपेढी या रस्त्यांचा समावेश आहे.
 या बैठकीस धरणगाव नगर परिषदेचे गटनेते दिलीप वाघमारे, नगरसेविका सौ.पद्मीनी डहाळे, श्रीमती लता चव्हाण, चंद्रकला सोनवणे, नगरसेवक सर्वश्री निहालभाई चौधरी, पी.एम.पाटील, गोविंद पानसरे, हाजी शेख ईब्राहीम, छाूटूभाऊ महाले, सार्वजनिक बांधकाम अमळनेर विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.पाटील, उपअभियंता सुरवाडे, जिल्हा बॅकेचे संचालक वाल्मिक पाटील, जळगाव पंचायत समितीचे उपसभापती विजय नारखेडे, धरणगावचे सामाजिक कार्यकर्ते आदि संख्येने उपस्थित होते.
* * * * * * 

Saturday, 25 August 2012

पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न अधिकाऱ्यांनी गांभिर्याने हाताळावा . . पालकमंत्री गुलाबराव देवकर


     
    जळगांव दिनांक 25:- जिल्हयात उदभवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत सर्व योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गांभीर्याने हाताळावा व सर्व लोकांना पिण्याचे पाणी मिळेल असे नियोजन करुन सर्वाना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी  तसेच जिल्हयातील टंचाई निवारणाबाबत चालढकल करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई  करण्याचे  निर्देश पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी टंचाई आढावा बैठकीत दिले.
          आज अल्प बचत भवनात पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली  जिल्हयातील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस विधानसभेचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे, जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे, खासदार हरिभाऊ जावळे, महापौर विष्णु भंगाळे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जि.प. मुध्यकार्यकारी अधिकारी शितल उगले, मनपा आयुक्त सोमनाथ गुंजाळ, अति. मु.का. अधिकारी सुनिल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मंचावर उपस्थित होते.
          याबैठकीत जिल्हयातील आतापर्यत पडलेल्या पावसाचा आढावा घेण्यात येऊन धरणातील व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा आणि जिल्हयातील पिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच पाणी टंचाई निवारणार्थ हाती घेतलेल्या उपाय योजनांचा आढावा घेतला.  यात प्रामुख्याने  जिल्हयातील 22 गावांना 15 टॅकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असून 93 विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तसेच 13 गावातील 12 तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असुन 193 गावांत 318 विंधन विहीरी नव्याने घेण्यात आल्या आहेत. तसेच 41 गावांमध्ये 51 नविन कुपनलिका घेण्यात आल्या आहेत.  तसेच चाळीसगांवात 40 विहीरींचे खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच 8 गावातील नळ योजनांची दुरुस्ती करण्यात आली आहे.  जिल्हयातील धरणगांव, चोपडा , अंमळनेर या शहरी भागात पाणी टंचाई निवारणार्थ चार पाणी योजनांना मंजुरी देण्यात आली असून ही कामे पुर्ण झालेली आहेत. तसेच या बैठकीत पेयजल टंचाई निवारणार्थ भविष्यकालीन योजनांसाठी आस्कमिक कृती आराखडाही तयार करण्यात आला असून तो बैठकीत सादर करण्यात आला.
          बैठकीत आ. साहेबराव पाटील, आ. संजय सावकारे, आ. चिमणराव पाटील, आ. गिरीष महाजन, आ. दिलीप वाघ, आ. राजीव देशमुख, आ. जगदीश वळवी, आ. मनिष जैन जिल्हयातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती, सर्व नगरपालिकांचे नगराध्यक्ष , सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी , सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हयातील सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्याने उपस्थित होते.
0 0 0 0 0

Friday, 24 August 2012

महसुल दिनी उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार


जळगांव दिनांक 24 :- नाशिकचे विभागीय आयुक्त श्री. रविंद्र जाधव यांच्या हस्ते 7 अधिकारी 29 कर्मचारी यांचा महसुल दिनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
            जळगांव उपजिल्हाधिकारी  श्रीमती दिपमाला चौरे, तहसिलदार श्री. कैलास कडलग, नायब तहसिलदार श्री. डी. पी. गिरासे, अव्वल कारकून श्रीमती पी. बी. नारखेडे, लिपीक श्री. आर. के. बागवान, स्टेनो  श्री. आदेश बारी, वाहनचालक श्री. उमेश तळेकर, शिपाई श्रीमती एस. ए. पाटील.
            जळगांव उपविभागातील नायब तहसिलदार श्री. एस. बी. साकेगांवकर, अवल कारकुन श्री. अशोक सोनवणे, मंडळ अधिकारी श्री. ए. आर. पाटील, लिपीक श्री. एस. पी. कोते, तलाठी  श्री. एल व्ही रोटे, शिपाई श्री. आर. सी. परदेशी, कोतवाल श्री. तुकाराम रुपचंद न्हावी.
            भुसावळ उपविभागातील नायब तहसिलदार श्री. राजेंद्र खैरनार, अवल कारकुन श्री. एम. आर. पाठक, मंडळ अधिकारी श्री. सी. बी. देवराज, लिपीक श्रीमती जे. एस. बारी, तलाठी, श्री. एस. पी. सुर्यवंशी, शिपाई श्रीमती सुषमा सोनटक्के, कोतवाल श्री. शरद पवार.
            पाचोरा उपविभागातील नायब तहसिलदार श्री. आबा महाजन, अवल कारकुन श्रीमती सुनंदा पाटील, मंडळ अधिकारी श्री. आर. एन. पाटील, लिपीक श्रीमती बी. के. शेवाळे, तलाठी श्री. ए. यु. आंधळे, शिपाई श्री. आर. डी. शेवाळे, कोतवाल श्री. पी. व्ही. कोळी.
            अमळनेर उपविभागातील नायब तहसिलदार श्री. पी. ए. कुलकर्णी, अवल कारकुन श्री. आर. के. वैद्य, मंडळ अधिकारी श्री. एन. बी. महाजन, लिपीक श्री. आर. बी. माळी, तलाठी श्री. आर. जे. बेलदार, शिपाई      श्री. एम. बी. सैदाणे, कोतवाल श्री. चिंतामण कांबळे.
            कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रांतधिकारी श्री. रविंद्र राजपूत यांनी केले.

* * * * *