Wednesday, 28 August 2024

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू

                       आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू

 मुंबईदिनांक २७ : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रु.१०.०० लाख व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास रु.५.०० लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असूनया संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. १ एप्रिल२०२४ पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.


आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रति वर्ष अंदाजित रु.१.०५ कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.


आरोग्य यंत्रणासेवाभावी संस्था व ग्रामस्थसमाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकतासुसंवादसमन्वयप्रोत्साहननिर्माण करण्याच्या दृष्टीने "आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक" महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्यबाल आरोग्यकुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित गृहभेटी देणेमाता व बालकांना मार्गदर्शन करणेरुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रग्रामीण रुग्णालयउपजिल्हा रुग्णालयजिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात.


 आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेवून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास रु.१०.०० लक्ष व कायमस्वरुपी अंपगत्त्व आल्यास रु.५.०० लक्ष इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


0000

No comments:

Post a Comment