Monday, 30 September 2013

राज्यपाल के. शंकरनारायणन यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम



राज्यपाल के. शंकरनारायणन यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

             जळगाव, दि. 30 :- महाराष्ट्राचे राज्यपाल  व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती   के. शंकरनारायणन यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
                  बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2013 रोजी सकाळी 10.35 वा.   जळगाव विमानतळ येथे आगमन, सकाळी 10.40 ते 11.05 पर्यंत व्ही आय पी लांउज येथे राखीव, 11.05 वा. जळगाव विमानतळ येथून मोटारीने प्रयाण, 11.30 वा. उत्तर महाराट्र विद्यापीठ जळगाव येथे आगमन, 11.30 ते 12.30 वा. उत्तमविद्या नगरी कर्मचारी वसाहतीचे भूमीपूजन व व्ही. व्ही. आय. पी. गेस्ट हाऊसचे उदघाटन, दुपारी 1.00 वा. जैन हिल गेस्ट हाऊस येथे आगमन, दुपारी 1.00 ते 2.45 पर्यत जैन हिल गेस्ट हाऊस येथे राखीव, दुपारी 2.45 वा. जैन हिल गेस्ट हाऊस येथून जैन हिल येथील कार्यक्रमास रवाना , दुपारी 3.00 ते 4.00 वा. गांधी तिर्थ, जैन हिल येथे भेट व गांधी  रिसर्च फाऊंडेशन  आयोजित चर्चासत्र कार्यक्रमास उपस्थिती, 4.25 वा. जळगाव विमानतळाकडे प्रयाण, 4.25 ते 4.40 पर्यत जळगाव विमानतळावर व्ही आय पी लांऊंज येथे राखीव, 4.40 वा जळगाव विमानतळ येथून मुंबईकडे विमानाने प्रयाण.

मागासवर्गीयांच्या विकासासाठी जनजागृतीची आवश्यकता- आ.साहेबराव पाटील

 




                              मागासवर्गीयांच्या विकासासाठी जनजागृतीची आवश्यकता 
                                           -- आ.साहेबराव पाटील
 [            जळगाव दि.30 : भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यातील दुर्बल घटक विशेषत: अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लोकांचा शैक्षणिक आर्थिक विकास होण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे, असे प्रतिपादन कृषिभूषण आ.साहेबराव पाटील यांनी दहिवद ता.अमळनेर येथील आयोजित पारधी समाजाच्या जनजागृती मेळाव्यात केले.
            एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे पारधी समाजाचा जनजागृती मेळाव्याचे आयोजन दहिवद ता.अमळनेर येथील आश्रमशाळेत केले होते. या प्रसंगी  सरपंच विलास भदाणे, जि.प.सदस्य भगवान पाटील, पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश चव्हाण, प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
            आदिवासी क्रांतीकारक बिर्सा मुंडा तसेच सरस्वती प्रतिमेचे पूजन आ.साहेबराव पाटील यांच्या हस्ते करुन या मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. आदिवासी विकास विभागामार्फत पारधी समाजाच्या 26 घरकुल लाभार्थ्यांना यावेळी धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पारधी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आ.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी दहिवद तसेच वैजापूर येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करुन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. विजय नाना पाटील आर्मी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संचलन करुन मानवंदना दिली.
            प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांनी मार्गदर्शनपर भाषणात पारधी जमात ही देशाची मूळ राज्यकर्ती जमात असुन कालातंराने ही जमात मागासली गेल्याने या जमातीचे शैक्षणीक आर्थिक उत्कर्ष करण्याचा ऊद्देश समोर ठेवुन या जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागामार्फत एकुण 465 प्रकारच्या विविध योजना राबविल्या जातात परंतु या योजनांविषयीची माहिती ही लाभार्थ्यांपर्यत पोहचत नसल्यामुळे शासनाच्या कल्याणकारी योजनांपासुन लाभार्थी वंचित राहतात. त्यासाठी जनजागृती मेळाव्यामुळे विविध जमाती प्रवाहात येतील असा आशावाद व्यक्त करुन पारधी समाजाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असुन त्याविषयी तसेच विविध योजनांविषयीचा उवापोह त्यांनी आपल्या भाषणातुन केला.
            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी ए.डी.माळी यांनी केले कार्यक्रमासाठी पारधी समाजाचे राज्याध्यक्ष आत्माराम पवार, पारधी समाज तालुकाध्यक्ष मधुकर चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पन्नालाल मावळे यांच्यासह पारधी समाजातील विविध अधिकारी, पदाधिकारी परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

आदिवासी युवक / युवतींसाठी प्रशिक्षण



आदिवासी युवक / युवतींसाठी  प्रशिक्षण
                  जळगाव, दि. 30 :- आदिवासी विकास विभाग व सेन्ट्रल इंस्टिट्युट ऑफ प्लास्टिक्स इंजिनियरिंग एण्ड टेक्नॉलाजी (सिपेट ) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने युवक, युवतींसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडून विहीत मुदतीत अर्ज मागविण्यात येत आहे.
           प्रशिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे - प्लास्टिक प्रोसिसिंग मशिन ऑपरेटर, प्लास्टिक टेस्टींग आणि क्लॉलीटी  कंट्रोल टूल रुम मशिन ऑपरटेर या प्रशिक्षणासाठी इयत्ता 10 उत्तीर्ण  वयोमर्यादा 18 ते 25 प्रशिक्षण कालावधी 3 महिने , कॉप्युटर ऑयडेड डिझायीन युजिंग, ॲटो क्यॅड प्रो- इ, युजी , क्यॅटिया शैक्षणिक पात्रता आय. टी आय , / डीप्लोमा , इंजिनिरींग , डीग्री इंजिनिरींग, वयोमर्यादा 18 ते 25, प्रशिक्षण कालावधी 6 महिने ,कॉप्युटर प्रोफेसियन्सी इन  एम एस ऑफिस ॲण्ड टॅली, शैक्षणिक पात्रता इ. 10 किंवा  12 वी उत्तीर्ण वयोमर्यादा 18 ते 25, प्रशिक्षण कालावधी 3 महिने,
                सदर प्रशिक्षण विनाशुल्क असून प्रशिक्षणा दरम्यान निवास व भोजनाची व्यवस्था शासनामार्फत करण्यात येईल  प्रशिक्षण दिनांक 14 ऑक्टोबर 2013 पासून सुरु होईल. प्रशिक्षणासाठी उमेदवार निवडीकरिता दि. 3 ते 8 ऑकटोबर 2013 या कालावधीत संकेतस्थळावर नमुद केंद्रावर उमेदवार निवड कार्यक्रम तथा कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. प्रकल्पाशी संबंधीत उमेदवाराने निवड कार्यक्रमासाठी संबंधीत केंद्रावर स्वखर्चने उपस्थित रहावे. प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर उमेदवारास प्रशिक्षणात गैरहजार राहता येणार नाही. अथवा प्रशिक्षण मधेच सोडून जाता येणार नाही.
               विहीत नमुन्यातील अर्ज व उमेदवार निवड कार्यक्रम कॅम्पचे वेळापत्रक www.mahatribal.gov.in / www.cipet.govin  या संकेतस्थळावर पुढील पत्तावर उपलबध आहे. व्यवस्थापक, सेन्ट्रल इंस्टिट्टयुट ऑफ प्लास्टिक इंजिनियरिंग एण्ड टेक्नोलॉज ( सिपेट) भारत सरकाची संस्था ( रसायन एवं पेट्रोरसायन विभाग, रसायन एवं उर्वरक मंत्रालय, भारत सरकार) प्लॉट न. जे 3 /2 एम. आय. डी. सी. चिकलठाना, औरंगाबाद, दूरध्वनी 0240-2478302, 307 / 309 / 316/, 319 फॅक्स 0240 - 2478333, भ्रमणध्वनी क्र. 9325687905 / 07, 9373687911 ई-मेल cipetabad@gmail.com