Friday, 30 August 2024

वाढवण बंदराचा पायाभरणी व 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय

                        वाढवण बंदराचा पायाभरणी व 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय 

                                    प्रकल्पांचे व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ

            वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

                 पालघर, दि. 30 (जिमाका) - देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर हा जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील. या बंदराचा लाभ महाराष्ट्राबरोबरच या भागातील स्थानिकांना व त्यांच्या पुढील पिढ्यांना होणार आहे, असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

               सुमारे 76,200 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पाचे व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय बंदर विकास, जहाज व जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन, केंद्रीय बंदर विकास, जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, बंदर विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार निरंजन डावखरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेश वाघ, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे आदी यावेळी उपस्थित होते.  

मराठी भाषेतून संवाद साधत भाषणाची सुरुवात

           सर्व लाडक्या बहिणी व भावांना तुमच्या या सेवकांचा नमस्कार, अशा शब्दांत मराठी भाषेतून संवाद साधत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी संत सेनानी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंदन करून भाषणाची सुरूवात केली. 

           सिंधुदुर्ग येथील घटनेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणाशी मस्तक टेकून मी माफी मागतो, असे सांगून प्रधानमंत्री पदासाठी नाव घोषित झाल्यानंतर मी सर्व प्रथम रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवर जाऊन प्रार्थना केली होती. भक्तिभावाने आशिर्वाद घेऊन राष्ट्रसेवेला प्रारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी व माझ्या सहकाऱ्यांसाठी आराध्य दैवत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

           आजचा दिवस हा विकसित महाराष्ट्र विकसित भारत संकल्पनेसाठी महत्त्वाचा दिवस आहे. राज्याच्या विकास यात्रेतील हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगून श्री. मोदी म्हणाले की, महाराष्ट्राला एक समृद्ध व संसाधनयुक्त समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यावरून आंतरराष्ट्रीय व्यापार होत असून यामुळे भविष्यातही मोठ्या संधी निर्माण होणार आहे. त्यामुळेच 76,200 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा, देशातील सर्वात मोठे बंदर वाढवणमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील सर्वच बंदरामधून जेवढी कंटेनर वाहतूक होते, त्यापेक्षाही जास्त कंटेनर वाहतूक एकट्या वाढवण बंदरातून होणार आहे. हे बंदर देशाच्या व्यापार व औद्योगिक प्रगतीचे मोठे केंद्र बनणार आहे. वाढवण बंदरामुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून एक नवी ओळख निर्‌माण होईल. तसेच हा परिसर वेस्टर्न फ्रेट कॉरिडॉर, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर यांना जोडला जाणार आहे. यामुळे वाढवण बंदरात वर्षभर कंटेनरची वाहतूक होणार आहे. या क्षेत्राची ओळख पूर्वी किल्ल्यांमुळे होत होती आता ही ओळख आधुनिक पोर्टमुळे होणार आहे.

वाढवण बंदरामुळे 12 लाख रोजगार निर्माण होणार

मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या संकल्पनांचा लाभ महाराष्ट्राला होत असून यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. वाढवण बंदरामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक या परिसरात होणार असून सुमारे 12 लाख रोजगार निर्माण होणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासनाने नेहमीच मोठे निर्णय घेतले. महाराष्ट्राचा विकास ही माझ्यासाठी सर्वात प्राधान्याची गोष्ट आहे. त्यामुळेच नुकतेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात दिघी येथे बंदर औद्योगिक क्षेत्राला मंजुरी दिली आहे. ही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंद द्विगुणित करणारी गोष्ट आहे. दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नाचे प्रतिक बनेल. या पोर्टमुळे पर्यटन व इको रिसोर्टला चालना मिळेल, असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे सागरी ताकदीला वेगळी ओळख 

मच्छिमार बांधवांसाठी आज 700 कोटीहून अधिक योजनांचा शुभारंभ केला आहे. तसेच वाढवण बंदर, दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र, विविध मत्स्य व्यवसायाच्या योजनांचा शुभारंभ ही मोठमोठी कामे ही माता महालक्ष्मी, माता जिजाऊ, माता जीवदानी व भगवान तुंगारेश्वर यांच्या आशिर्वादने होत आहेत, असेही श्री. मोदी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ,सागरी ताकदीला एक वेगळी ओळख दिली. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी ईस्ट इंडिया कंपनीला धडकी भरवली होती. त्यांच्या या वारसाकडे नंतरच्या काळात  लक्ष दिले गेले नाही. पण आजचा भारत हा नवीन भारत आहे. नवीन भारत देशात अनेक बदल घडवीत आहे. नवीन भारत आपल्या सामर्थ्याला व गौरवांना ओळखतो. सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करत आहोत. देशातच जहाज निर्मिती होण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यातून या क्षेत्रात कोट्यावधींची गुंतवणूक करत आहोत. यामुळे जहाज वाहतुकीचा वेळ कमी होत असून याचा फायदा व्यापारी  व उद्योगांना होत असून तरुणांना नवी संधी मिळत आहे. देशातील बंदरांची क्षमता दुप्पट झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य उत्पादन करणार देश झाला असून मत्स्य उत्पादनातही गेल्या नऊ वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. झिंगाची निर्यातही दुप्पट झाली आहे. मत्स्य उत्पादन क्षेत्रात महिलांचे योगदान वाढविण्यात केंद्र शासन अग्रेसर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशाच्या विकासात आदिवासी व मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान

देशाच्या विकासात आदिवासी व मच्छिमार बांधवांचे योगदान मोठे आहे. सागरी क्षेत्रातील विकासात मच्छिमार बांधवांचे योगदान आहे. 526 गावे, कोळीवाडे आणि 15 लाख मच्छिमारांच्या लोकसंख्येसह महाराष्ट्राचे मत्स्य पालन क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. त्यामुळेच आमच्या सरकारने आदिवासी तसेच मच्छिमारांसाठी वेगळे मंत्रालय निर्माण केले आहे. मच्छिमार बांधवांचे जीवनमान सुधारण्याला प्राधान्य दिले असून त्यांच्या हितासाठी योजना बनविण्यात येत आहेत. मच्छिमार बांधवांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी मच्छिमार संस्था मजबूत करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आज शुभारंभ केलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या योजना तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे मच्छिमार बांधवांचे जीवनमान सुधारून आर्थिक संपन्नता येणार आहे. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.




वाढवण बंदर प्रकल्पाची वैशिष्ट्ये

● वाढवण बंदर या प्रकल्पासाठी 76,200 कोटी रुपये खर्च येणार आहे.

● वाढवण हे भारतातील सर्वात मोठे खोल पाण्याचे बंदर बनणार आहे

● हा प्रकल्प जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याबरोबर आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी व्यापार कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

● 2047 पर्यंत विकसित भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृतकाल दृष्टिकोनासाठी महत्त्व पूर्ण प्रकल्प आहे.

● पश्चिम किनाऱ्यावर स्थित वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांना थेट कनेक्टिव्हिटी निर्माण करेल आणि पारगमन वेळ आणि खर्च कमी करेल.

● अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बंदरात डीप बर्थ, कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असणार आहे. 

● या बंदराच्या उभारणीमुळे अमृतकाल दरम्यान भारताच्या व्यापक आर्थिक उद्दिष्टांशी जुळवून घेऊन रोजगाराच्या लक्षणीय संधी निर्माण होणार आहेत. 

● या प्रकल्पामुळे सुमारे 10 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे.

● स्थानिक व्यवसायांना चालना मिळणार असून या प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासात योगदान मिळणे अपेक्षित आहे.

● वाढवण बंदर प्रकल्पामध्ये शाश्वत विकास पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये पर्यावरणीय प्रभाव कमी करणे आणि कठोर पर्यावरणीय मानकांचे पालन करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे.

● प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर, हे बंदर भारताची सागरी कनेक्टिव्हिटी वाढवेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत करणार आहे. 

● वाढवण बंदर प्रकल्प हा बंदर वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा खाजगी क्षेत्रातील भागीदारांच्या सक्रिय सहभागासह संयुक्त उपक्रम आहे. बंदर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, पहिला टप्पा 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे.

मत्स्यपालन पायाभूत सुविधा प्रकल्प 

● मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी हे याच कार्यक्रमात 757.27 कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या मत्स्यपालन पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी करत आहेत. 

● यामध्ये मासेमारी बंदरांचे आधुनिकीकरण आणि फिश मार्केटचे बांधकाम यांचा समावेश आहे. 

● या प्रकल्पामुळे मासे आणि सीफूडच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा आणि स्वच्छताविषयक परिस्थिती प्रदान करण्यात येणार आहे. 

● या क्षेत्रांमध्ये मासेमारी उद्योगासाठी पायाभूत सुविधा आणि सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आंध्र प्रदेश, केरळ आणि ओरिसा या राज्यांमध्येही लागू केले जाणार आहे.

मासेमारी बोटींवर ट्रान्सपॉन्डर बसविण्याचा शुभारंभ

● 364 कोटी रुपये खर्चून एक लाख मासेमारी बोटींवर ट्रान्सपॉन्डर बसवण्याच्या योजनेचा देखील  मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुभारंभ करण्यात आला.  

●  समुद्रातील मच्छिमारांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि संकटाच्या वेळी त्यांना संवाद साधता यावा यासाठी हे स्वदेशी ट्रान्सपॉन्डर इस्रोने विकसित केले आहेत. 

● स्वदेशी ट्रान्सपॉन्डरमुळे समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना संकटकाळात संपर्क साधण्यास व मदत पोचविण्यास सहाय्य होणार आहे.

प्रकल्पाच्या कामाला वेग घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना






                        चिंचोली येथील प्रस्तावित 'मेडिकल हब' ची मंत्री 

                        गिरीश महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली पाहणी

▪ प्रकल्पाच्या कामाला वेग घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

       जळगाव, दिनांक 30 (जिमाका) : तालुक्यातील चिंचोली येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम वेगाने सुरु आहे. या प्रकल्पाची शुक्रवारी दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पाच्या कामाला लवकर पूर्ण करण्याच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.


          चिंचोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवीन इमारतींचे बांधकाम वेगात सुरु आहे. याठिकाणी महाविद्यालय, रुग्णालय, वसतिगृह, अतिथीगृह, प्राध्यापक निवासस्थान, अधिष्ठाता कार्यालय असे विविध प्रकल्प उभारले जात आहे. शुक्रवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे यांनी पाहणी केली. यावेळी एचएससीसी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक  संदीप जैन, विभागीय प्रमुख भीमराव कांबळे, न्याती कन्स्ट्रक्शनचे विभागीय मुख्य अभियंता संदीप गाडेकर, एक्झिक्युटिव्ह अभियंता शरद दवांगे उपस्थित होते.


          यावेळी संदीप गाडेकर आणि संदीप जैन यांनी मंत्री महाजन, जिल्हाधिकारी, अधिष्ठाता व अधिकाऱ्यांना प्रकल्पाचे आतापर्यंत झालेले बांधकाम व त्यातील रचना, मांडणी, कामाचा दर्जा याबाबत माहिती दिली. पूर्ण प्रकल्पाला जाऊन अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बांधकामातील साहित्य, साधनसामुग्रीचा माहिती घेतली. नकाशाद्वारेदेखील बांधकामाची माहिती मंत्री महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांना देण्यात आली.  यावेळी गिरीश महाजन यांनी समाधान व्यक्त केले. पाणी, रस्ते, वीज, कंपाऊंड वॉलसाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचित केले.


          प्रकल्प कार्यालयात मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी, अधिष्ठाता यांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी पिपीटीद्वारे माहिती दिली. प्रकल्प कुठवर पूर्णत्वास गेला आहे तसेच पूर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच निवास व्यवस्था तयार झाल्यावर भविष्यात कसे दिसेल याचे एक प्रतीचलचित्र (व्हिडिओ) दाखवण्यात आले.


          प्रकल्पाच्या ठिकाणी कामगारांना स्वतंत्र कॉलनी उभारण्यात आली असून त्यांच्या सर्व सुरक्षेची काळजी घेतली जात असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शासकीय विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांचेसह अधिष्ठाता कार्यालयातील बांधकाम विभागाचे साहेबराव कुडमेथे आदी उपस्थित होते.

00000000000

Thursday, 29 August 2024

पंतप्रधान 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

 

पंतप्रधान 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

पंतप्रधानांच्या हस्ते 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाची पायाभरणी
वाढवण हे भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक होणार
हे बंदर भारताची सागरी जोडणी वाढवेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत करेल
सुमारे 1560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यपालन प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही पंतप्रधान करणार
नॅशनल रोल आउट ऑफ व्हेसल कम्युनिकेशन अँड सपोर्ट सिस्टम अंतर्गत 13 किनारपट्टीवरील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यांत्रिक आणि मोटरयुक्त मासेमारी जहाजांवर लाख ट्रान्सपॉन्डर्स बसविण्यात येणार आहेत
पंतप्रधान मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 ला संबोधित करणार


            नवी दिल्ली 29 : पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील मुंबई आणि पालघरला भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 ला संबोधित करतील. त्यानंतरदुपारी 1:30 वाजता पंतप्रधान सिडको मैदानपालघर येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.


पंतप्रधान पालघरमध्ये

        30 ऑगस्ट 2024 रोजी पंतप्रधान वाढवण बंदराची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे रु. 76, 000 कोटी. मोठ्या कंटेनर जहाजांची पूर्तता करूनसखोल मसुदे सादर करून आणि अति-मोठ्या मालवाहू जहाजांना सामावून घेऊन देशाच्या व्यापार आणि आर्थिक वाढीस चालना देणारे जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.


पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ असलेले वाढवण बंदर हे भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असेल आणि आंतरराष्ट्रीय नौवहन मार्गांना थेट संपर्क प्रदान करेलज्यामुळे वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बंदरात खोल बर्थकार्यक्षम माल हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असतील. या बंदरामुळे रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण होतीलस्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि या प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासात योगदान मिळेल अशी अपेक्षा आहे. वाढवण बंदर प्रकल्पात पर्यावरणीय परिणाम कमी करण्यावर आणि कठोर पर्यावरणीय मानकांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करून शाश्वत विकास पद्धतींचा समावेश आहे. एकदा कार्यान्वित झाल्यावरहे बंदर भारताची सागरी जोडणी वाढवेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत करेल.


देशभरातील या क्षेत्राच्या पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने सुमारे 1560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यपालन प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. या उपक्रमांमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रात पाच लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.


पंतप्रधान सुमारे 360 कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय जहाज दळणवळण आणि सहाय्य प्रणालीचा शुभारंभ करणार आहेत. या प्रकल्पांतर्गत 13 किनारपट्टीवरील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यांत्रिक आणि मोटरयुक्त मासेमारी जहाजांवर टप्प्याटप्प्याने लाख ट्रान्सपॉन्डर्स बसवले जातील. जहाज दळणवळण आणि सहाय्य प्रणाली हे इस्रोने विकसित केलेले स्वदेशी तंत्रज्ञान आहेजे मच्छिमार समुद्रात असताना द्विमार्गी दळणवळण स्थापित करण्यात मदत करेल आणि बचाव कार्यात मदत करेल तसेच मच्छिमारांची सुरक्षा सुनिश्चित करेल.

 

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या इतर उपक्रमांमध्ये मासेमारी बंदरे आणि एकात्मिक एक्वापार्कचा विकासतसेच रिसर्क्युलेटरी एक्वाकल्चर सिस्टम आणि बायोफ्लॉक यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब यांचा समावेश आहे. हे प्रकल्प अनेक राज्यांमध्ये राबवले जातील आणि मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठीकापणीनंतरच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात गुंतलेल्या लाखो लोकांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आणि उच्च दर्जाचे इनपुट प्रदान करतील.


मत्स्य बंदरांचा विकाससुधारणा आणि आधुनिकीकरणमत्स्य लँडिंग केंद्रे आणि मत्स्य बाजारपेठेचे बांधकाम यासह महत्त्वाच्या मत्स्यव्यवसाय पायाभूत प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. यामुळे मासे आणि सागरी खाद्यपदार्थांच्या कापणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा आणि स्वच्छ परिस्थिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.


मुंबईत पंतप्रधान

        ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 च्या विशेष सत्राला पंतप्रधान संबोधित करतील. पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियानॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्वर्जन्स कौन्सिल यांनी संयुक्तपणे जीईएफचे आयोजन केले आहे. भारत आणि इतर विविध देशांतील धोरणकर्तेनियामकवरिष्ठ बँकर्सउद्योगपती आणि शिक्षणतज्ज्ञांसह सुमारे 800 वक्ते या परिषदेत 350 हून अधिक सत्रांना संबोधित करतील. यात फिनटेक क्षेत्रातील नवीनतम नवकल्पना देखील प्रदर्शित केल्या जातील. जी. एफ. एफ. 2024 मध्ये अंतर्दृष्टी आणि उद्योगाची सखोल माहिती प्रदान करणारे 20 हून अधिक विचार नेतृत्व अहवाल आणि श्वेतपत्रे प्रकाशित केली जातील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

0000000000000

२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन

                   




                     २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त विविध क्रीडा उपक्रम आणि खेळांच्या 

स्पर्धांचे आयोजन करण्यात आले


       जळगाव, दिनांक 29 (जिमाका वृत्तसेवा) :   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा प्रशासन जळगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, क्रीडा भारती, जळगाव व जळगाव जिल्हा विविध खेळ संघटनेना विविध क्रीडा मंडळे यांच्या सहकार्याने २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे साजरा करण्यात आला. हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सकाळी ६.३० वाजता जळगाव सायकलीस्ट यांच्यासह जळगाव शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर सायकल रॅलीला आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा छत्रपती पुरस्कारार्थी श्री. कीशोर चौधरी (राज्य क्रीडा मार्गदर्शक- सॉफटबॉल) यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. सदर रॅलीचा मार्ग जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथून श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा टॉवर चौक,  चित्रा चौक,  पुष्पलता बेडांळे चौक, पांडे चौक- स्वांतत्रय चौक मार्गे परत जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे सांगता झाली. सदर सायकल रॅलीत शासकीय व निमशासकीय अधिकारी व नामवंत सायकल पटु यांनी सहभाग घेतला. रॅलीतून खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया तसेच Play for Fun, Fitness & Hapiness च्या  घोषणा देण्यात आल्यात.


          त्याचप्रमाणे सकाळी ९.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुलातील बहुउद्देशीय सभागृहा मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उदघाटन मा. जिल्हाधिकारी व्ही केझो प्रोबेशनरी आय एस ऑफीसर तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जळगांव व मा. रणजीत राजपूत राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी यांच्या हस्ते झाले. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला जळगाव जिल्हा मल्लखांब संघटेनेच्या सहकार्याने मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानंतर जळगाव जिल्हा योगा संघटनेच्या वतीने योगाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर संजीवनी गृप च्या वतीने पारंपारीक खेळ प्रकार मंगळागौर बाबत माहिती  देवून प्रात्यक्षिक सादर केले.

 

          राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधुन जळगाव जिल्हयाचे गतवर्षातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त व सहभागी खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दिनांक २६ ते २९ ऑगस्ट २०२४ या कालावधी दरम्यान राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडुंना मेडल व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच योगाच्या क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी यांनी सर्व खेळाडूंना फिटनेस ची प्रतीज्ञा दिली. आजच्या सोशल मिडीयाच्या युगात पारंपारीक खेळ जिवंत राहण्याकरीता व संध्याच्या पिढीला अवगत होण्यासाठी लंगडी, लगोरी, विंटी दांडू, भोवरा, सोंगट्या, सारीपाट, टायर फिरविणे, लिंबू चमच, दोरी उडया, गोटया अशा विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले. सदर खेळात शिवछत्रपती पुरस्कार श्री. प्रदिप तळवेलकर यांनी हिरारीने भाग घेतला.


          सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव रविंद्र  नाईक यांनी केले प्रस्ताविकात त्यांनी खेळाडू सर्व उपस्थितांना Play for Fun, Foness & maciness व मंत्र देवून  नियमित सहाय्यक जिल्हाधिकारी की झोप्रोबेशनरी आयएस ऑफीसर यानी खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात जिल्हयातील राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी श्री रणजीत राजपूत शिवछत्रपती पुरस्काराकी विशाल फिरके, तालुका क्रीडा अधिकारी श्री जगदीश श्रीराग श्री. फारुख शेख श्री राजेश जाधव, श्री. प्रशांत कोल्हे, श्री वसीम निर्मा, श्री. आसिफ खान, तसेच जगाय जिल्हयातील शाळा, संस्था व महाविद्यातील कीडा शिक्षक मार्गदर्शक खेळाडू व पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  श्रीमती सुजाता गुल्हाने यांनी तर आभार सुरेश बरकुडे यांनी केले. सदर कार्यक्रम कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, श्रीमती चंचल माळी, भारत देशमुख, गोविंद सोनवणे, संजय महिरे, उमेश मराठे, विनोद कुलकर्णी, विनोद माने, सुरज पवार, निलेश बाविस्कर, अविनाश महाजन यांनी परिश्रम घेतले. असे जिल्हा क्रीडा अधिकारी रविद्र नाईक यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

000000000000

'दिलखुलास','जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

                                               

                                             राज्य प्रकल्प संचालक आर विमला यांची

'दिलखुलास','जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

 

मुंबईदिनांक 29 : शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महावाचन उत्सव -2024 बाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांची मुलाखत 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात प्रसारित होणार आहे.


माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातील मुलाखतीत प्रकल्प संचालक आर. विमला यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित 'महावाचन उत्सव 2024' च्या आयोजनामागची भूमिकाउपक्रमाचे स्वरुपविद्यार्थ्यांचा सहभाग व उपक्रमाची व्याप्ती याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.


माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखतशुकवार दि.30 आणि शनिवार दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक शिवानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.


000000000000

प्रदर्शन आणि विक्री 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान सुरू राहील




मऱ्हाटी' महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या
विक्रीला उत्साहात सुरुवात
प्रदर्शन आणि विक्री 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान सुरू राहील

नवी दिल्ली, दिनांक 29 : दिल्लीतील प्रसिद्ध 'मऱ्हाटी' महाराष्ट्र एम्पोरियममध्ये महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला गुरुवारी उत्साहात सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनात 6 इंच ते 3 फुट उंचीच्या विविध आकारांच्या आठशे गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, ज्यांची किंमत 500 रूपयांपासून 26 हजार रूपयांपर्यंत आहे. हे प्रदर्शन 7 सप्टेंबर 2024 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या कलेला राजधानीत प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती दिल्लीतील गणेशभक्तांपर्यंत पोहोचवणे हे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उद्दिष्ट आहे. यासाठी आयोजित केलेल्या उपक्रमाला दिल्लीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील 30 गणेश मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये अमराठी भक्तांचाही मोठा सहभाग असतो. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने ग्राहकांनी एम्पोरियममध्ये हजेरी लावून गणेशमूर्ती खरेदी केल्या, ज्यामुळे आयोजकांचे समाधान दिसून येते.

गेल्या 25 वर्षांपासून ठाणे येथील मूर्तिकार मंदार सूर्यकांत शिंदे हे आपल्या उत्कृष्ट शाडूच्या गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी 'मऱ्हाटी' एम्पोरियममध्ये सहभागी होत आहेत. यावर्षीही त्यांच्या मूर्तींना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय, मुंबईच्या नीता भोसले यांनी मार्बल, फायबर, आणि रेडियमच्या शिवाजी महाराज, गणपती, कृष्ण, विठ्ठल रुक्मिणी यांच्यासह विविध मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

या वर्षीच्या प्रदर्शनात एस्कॉर्ट ग्रुपचे मालक नंदा परिवार, भीमजी जवेरी आणि दिल्लीतील प्रतिष्ठित व्यक्ती व वरिष्ठ अधिकारी यांनी 'मऱ्हाटी' महाराष्ट्र एम्पोरियममधून गणेशमूर्तीची खरेदी केली आहे, अशी माहिती श्री. मंदार शिंदे यांनी दिली.'बाबा खडकसिंह मार्गावरील 'मऱ्हाटी' महाराष्ट्र एम्पोरियममध्ये हे प्रदर्शन 7 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरु राहणार असून, अधिक माहितीसाठी 011-23363888 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

000000000

Wednesday, 28 August 2024

विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वात महत्वाची ;




 विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वात महत्वाची ; 
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही बसणार
 - पालकमंत्री गुलाबराव पाटील

            जळगाव, दिनांक 28 ( जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टी.व्ही लावण्याची सूचना राज्य शासनाने दिली आहे. आम्ही जिल्ह्यातील गोरगरीबांची मुल, मुली ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकतात तिथे सी.सी.टी.व्ही लावणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

          आज जिल्हा नियोजन भवन मध्ये जिल्ह्यातील सर्व विभागाच्या चालू वर्षाच्या नियोजन निधीच्या खर्चाच्या संदर्भात आढावा बैठक घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते. 

           आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व यंत्रणांनी मंजुर कार्माच्या 100 टक्के वर्क ऑर्डर 31 सप्टेंबर पर्यंत पूर्ण कराव्यात असे निर्देश देऊन सन 2024-25 अंतर्गत दिनांक 5 सप्टेंबर 2024 पुर्वी जिल्हा परिषदेने उर्वरित 100 टक्के कामांना प्रशासकीय मान्यता द्याव्यात अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 

           राज्य शासकीय यंत्रणांनी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत 100 टक्के कामांना प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडे सादर करावेत जेणेकरुन आचारसंहितेपुर्वी कामे कार्यारंभ आदेश देऊन कामं सुरु करता येऊ शकतील. मागील कालावधीत ज्याप्रमाणे आपले सर्वांचे सहकार्य लाभले व 100% निधी खर्च झाला त्याप्रमाणे येत्या काळातही आपण सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले.

            मंजूर कामे दर्जेदार व मुदतीत पुर्ण करुन प्रशासकीय दिरंगाई व कामाच्या गुणवत्तेतील चालढकल खपवून घेतली जाणार नाही असे सांगून जिल्ह्यातील ओ.डी.आर.आणि व्ही. आर. रस्त्यांच्या दर्जोंन्नतीसाठी च्या कामांचे प्रस्तावशासनाकडे तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

        प्रलंबित असलेली व खासदार, आमदार आणि नव्याने सुचविलेली कामे मार्गी लावावीत. महावितरण, वन विभाग, अंगणवाडी बांधकामे,  कौशल्य विकासची कामे,  परिवहन विभाग यांच्याकडील कामे तात्काळ मंजूर करावेत अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. ज्या प्रमाणे "मुख्यमंत्री लाडकी बहिण" योजने अंतर्गत तळागाळातील सर्वसामान्य भगिनांना लाभ रक्षाबंधनची भेट म्हणून लाभ मिळण्यासाठी व लखपती दीदी कार्यक्रमासाठी सर्व यंत्रणांनी व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले त्याच प्रमाणे मुख्यमंत्री वयोश्री योजना व तीर्थदर्शन कार्यक्रम योजनांचा वृद्धांना लाभ मिळावा याकरीता या योजनांची सक्षमतेने अंमलबजावणी असे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. 

        जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व विभागाच्या कामाचे सादरीकरण करून विविध विभागांना कामाचा वेग वाढविण्याची सूचना दिली.

00000000000

लोकशाही दिनाचे आयोजन

 जिल्हाधिकारी कार्यालयात ३ सप्टेबर रोजी 

लोकशाही दिनाचे आयोजन

          जळगाव, दिनांक 28 ( जिमाका ) : जिल्हास्तरावर लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. तथापी,सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी २ सप्टेंबर २०२४ या दिवशी शासकीय सुट्टी असल्यामुळे या महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता  अल्पबचत सभागृह  जळगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे.


            नागरिकांनी आपल्या वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी आपल्या संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


00000000

रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रणासाठी जे जे रुग्णालयात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान

                    
             
रुग्णांची सुरक्षा
संसर्ग नियंत्रणासाठी जे जे रुग्णालयात आता अत्याधुनिक 

               तंत्रज्ञान इजराइलच्या सहयोगातून अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी रूमचे उद्घाटन

                 मुंबईदिनांक 28 : जेजे हॉस्पिटल येथे अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 

 

ही सुविधा इस्त्रायल येथील डीप-टेक कंपनी नॅनोसोनोने निर्लाटच्या सहकार्याने विकसित केली आहे. प्रगत प्रतिजैविक ऍक्रेलिक पेंटचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. हे नाविन्यपूर्ण पेंट काही तासांत 99.99% जीवाणूविषाणू यावर नियंत्रण मिळविते. इस्रायलच्या आरोग्य सेवा प्रणालीमध्ये आधीच यश मिळालेले हे तंत्रज्ञान मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूतावासग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून भारतात आणले गेले आहे. पेंटमध्ये समाविष्ट केलेले "QUACTIV™️ क्वाएक्टीव्ह हे तंत्रज्ञान पेंट जोपर्यंत भिंतींवर राहते तोपर्यंत हानिकारक सूक्ष्मजीवांपासून सतत संरक्षण देते. हे पेंट आणि तंत्रज्ञान संक्रमण नियंत्रणासह पर्यावरणास अनुकूल आणि सुरक्षित आहे.

 

कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यावेळी म्हणाले की "जेजे हॉस्पिटलमध्ये या प्रगत प्रतिजैविक आणीबाणी कक्षाचे होत असलेले उदघाटन हे इस्रायल आणि भारत यांच्यातील आरोग्य सेवेतील सहकार्यातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतात रुग्णांची सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य सुविधा विकसित करण्यामध्ये हे पाऊल निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 

 इस्रायलचे मुंबईतील कौन्सुल जनरल श्री. कोबी शोशानी म्हणाले कीइजराइल आणि भारतामध्ये आरोग्य क्षेत्रातील देवाण-घेवाणसाठी होत असलेले सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. वैद्यकीय क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. दोन्ही राष्ट्रांमधील सहयोग यामुळे आणखी वृधिंगत होईल. वैद्यकीय सुविधांमध्ये बदल घडवून आणणारी ही झेप आहे. रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रण यामध्ये या नव्या तंत्रज्ञानाचा व्यापक परिणाम होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता  डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या कीया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबामुळे  रुग्णांची सुरक्षा सुनिश्चित होईल.   "QUACTIV™️ क्वाएक्टीव्ह प्रतिजैविक पेंटची अंमलबजावणी हे जेजे रुग्णालयासाठी एक मोठे पाऊल आहे. हे तंत्रज्ञान आमच्या रुग्णांना संरक्षणाचा अतिरिक्त स्तर प्रदान करेलजे संक्रमण रोखण्यासाठी आणि सुरक्षित वातावरण राखण्यासाठी आवश्यक आहे."

 

नॅनोसोनोचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ओरी बार चेम यांनी या नवोपक्रमाच्या व्यापक प्रभावाविषयी माहिती दिली. "QUACTIV™️ हे तंत्रज्ञान संक्रमण नियंत्रणातील एक महत्वपूर्ण प्रगती आहे. भारतात त्याचा सकारात्मक प्रभाव पाहून आम्ही उत्साहित आहोतअसे त्यांनी सांगितले.

000000000

शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘लाडकी बहीण’ प्रमाणेच ‘सुरक्षित बहीण’ ही जबाबदारीही शासनाचीच ; 

कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही

            ठाणे, दिनांक 28 (जिमाका) : हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. शासनाकडून गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल. “लाडक्या बहिणी” प्रमाणेच “सुरक्षित बहीण” ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासनाने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे. हे शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

            प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक, संस्कृती युवा प्रतिष्ठानचे इतर सर्व पदाधिकारी, विविध गोविंदा पथके व गोविंदाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा खेळ पाहून आम्हालाही आमचे बालपण आठवते. आम्हीही आमच्या लहानपणी या खेळात उत्साहाने सहभागी होवून दहीहंड्या फोडत असू. आता हा उत्सव सातासमुद्रापलीकडे पोहोचलाय. “प्रो-कबड्डी” प्रमाणे हा “प्रो-गोविंदा” खेळ झाला. शासनाने या खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यताही दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या खेळामध्ये खूप लक्ष घालून या खेळाला लोकप्रिय बनविण्यात मोठा हातभार लावला आहे. त्यांनी या खेळाची व्यापकता वाढविली आहे. त्यातला साहसीपणा व धोका लक्षात घेऊन सर्व गोविंदांचा विमा काढण्याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आली होती. शासनाने ही मागणी तात्काळ मान्य केली. सर्व गोविंदांचा विमा काढण्यात आला.

            ते पुढे म्हणाले, असे असले तरी हा उत्सव सुरक्षितपणे साजरा करणे, ही आपली जबाबदारी आहे. आपले कुटुंबीय आपली वाट पाहत असतात. 2011 या वर्षी नऊ थरांचा विक्रम या दहीहंडी उत्सवात झाला होता. “जय जवान” या मित्रमंडळाने हा विक्रम केला होता आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती. आपल्याकडे एकापेक्षा एक मित्रमंडळे, दहीहंडी पथके आहेत, जे या खेळामधील विक्रम दरवर्षी मोडताना दिसत आहेत. परंतु ही सोपी गोष्ट नव्हे. यासाठी वर्षभर मेहनत घ्यावी लागते, कसून सराव करावा लागतो. एकाग्रपणे सांघिक भावनेने या खेळाचे प्राविण्य मिळवावे लागते. या गोविंदाची मेहनत बघून हे शासन आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहील. जे जे शक्य आहे ते सर्व काही गोविंदांसाठी करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी शेवटी महिला गोविंदा पथकांचेही विशेष अभिनंदन केले.

000000000000