Tuesday, 20 August 2024

‘दिलखुलास’

 
‘दिलखुलास’ कार्यक्रमात
मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर

 

            मुंबई, दिनांक २० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहिती दिली आहे.

            बुधवार २१ ऑगस्ट २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत हे मनोगत प्रसारित होणार आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व विविध घटकांसाठीच्या विकास कामांचे नियोजन केले जाते, त्याची प्रभावी अंमलबजावणीही केली जाते. मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. केसरकर यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील विकास कामांबाबत दिलखुलास कार्यक्रमात माहिती दिली आहे.

----000---

No comments:

Post a Comment