Friday, 31 January 2014

राष्ट्रीय महामार्ग क्रं.211 च्या भुसंपादनाच्या कामास गती : प्रांताधिकारी मनोज घोडे

राष्ट्रीय महामार्ग क्रं.211 च्या भुसंपादनाच्या कामास गती
                                                              : प्रांताधिकारी मनोज घोडे
  
            चाळीसगाव, दिनांक 31 :- औरंगाबाद-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्रं.211  च्या चौपदरीकरणासाठी चाळीसगाव तालुक्यातील 14 गावातील शेतजमिनी संपादीत करण्याचे कामकाज सुरु होते. भारत सरकारच्या डिसेंबर-2013 च्या राजपत्रान्वये सदर राष्ट्रीय महामार्गाचे भुसंपादनाचे कामकाज पाचोरा प्रांताधिका-यांकडून चाळीसगांव प्रांताधिका-यांकडे वर्ग झाले आहे. भुसंपादनाबाबत आज प्रथमच प्रांत कार्यालय, चाळीसगांव येथे शेतक-यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले व सदर बैठकीत चाळीसगांव व कोदगांव येथील शेतक-यांना त्यांचे यापुर्वीचे बाह्यवळण रस्त्याचे भुसंपादनाचे वाढीव मोबदला प्रलंबीत असल्याने तो त्वरीत मिळण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने सदरचा मोबदला मिळण्यासाठी शेतक-यांचे प्रतिनीधी म्हणून पाच शेतकरी व त्यांचे विधीतज्ञ म्हणून वकील व संबंधित अभियंता यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती तालुक्याचे आमदार राजीव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शासन व शेतकरी यांच्यातील समन्वय घडवून शेतक-यांना वेळेवर मोबदला मिळवून देण्यास प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भुसंपादनाच्या मोजणी कामकाजातील अडथळा दुर झाला असुन भुसंपादन कामकाजाच्या या पहिल्याच बैठकीत यश मिळाल्याचे प्रांताधिकारी मनोज घोडे यांनी सांगितले.
या बैठकीस तहसिलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, प्रकल्प अधिकारी राष्ट्रीय महामार्ग संदीप खलाटे, उप अधिक्षक भुमि अभिलेख राजू यशोद, शाखा अभियंता पी.एस.पाटील यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. समितीमध्ये अनुक्रमे अंबु बुधा पाटील कोदगांव, चंद्रकांत गळपतराव शिंदे पाटखडकी, बापु भास्कर पाटील चाळीसगांव, हिम्मतराव रामराव पाटील कोदगांव, कुणाल भरत बुंदिलखंडे चाळीसगांव यांचा समावेश करण्यात आला तर विधीतज्ञ म्हणून ॲड.सतिष तुकाराम पवार व ॲड.किर्ती सतिष पवार व शासकीय अधिकारी म्हणून शाखा अभियंता पी.एस.पाटील, उप अभियंता ए.यु.भुरट यांचा समावेश करण्यात आला आहे.
भुसंपादन होणारी सर्व 14 गावे  अनुक्रमे बोढरे, रांजणगांव, चाळीसगांव, कोदगांव, पाटखडकी, खडकी बु., बिलाखेड, करगांव, भोरस खु., भोरस बु., दसेगांव बु., मेहुणबारे, खडकीसिम व दहिवद ही चाळीसगांव तालुक्यात येत असल्याने व कामास अधिक गती यावी म्हणुन भुसंपादनाचे कामकाज हे पाचोरा प्रांताधिका-यांकडून चाळीसगांव प्रांताधिका-यांकडे उपरोक्त राजपत्रान्वये वर्ग करण्यात आले आहे. तथापी वरील 14 गावांपैकी 11 गावांची मोजणीचे कामकाज पुर्ण झाले असून मेहुणबारे येथील मोजणी कामकाज सुरु आहे. तसेच चाळीसगांव व कोदगांव येथील मोजणी कामकाज लवकरच सुरु होऊन राष्ट्रीय महामार्ग क्रं.211 च्या भुसंपादनाच्या कामकाजात प्रांताधिकारी मनोज घोडे यांना पहिल्याच बैठकीत यथ मिळाल्याने त्यांचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी अभिनंदन केले.

                                           * * * * * * * *

Tuesday, 28 January 2014

विद्यार्थीदशेतच व्हावा ग्रंथसंस्कार ग्रंथोत्सवातील परिसंवादात वक्त्यांचा सूर

विद्यार्थीदशेतच व्हावा ग्रंथसंस्कार
ग्रंथोत्सवातील परिसंवादात वक्त्यांचा सूर

  जळगाव, दि.28- बुद्धीप्रामाण्यवादाचा अवलंब करुन आपला समाज हा ज्ञानाधिष्ठित समाजाकडे वाटचाल करीत आहे. ही बुद्धीप्रामाण्यवादाची जडणघडण ही बालवयातच होणे आवश्यक असते, त्यासाठी विद्यार्थीदशेतच मुलांवर ग्रंथसंस्कार होऊन, त्याना वाचनाची सवय लावणे आवश्यक आहे, असे मत ग्रंथोत्सवात आयोजित  ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीत ग्रंथांची भूमिका, या विषयावरील परिसंवादात बोलतांना मान्यवर वक्त्यांनी व्यक्त केले.
             राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत ग्रंथोत्सव-2013- 14 रविवार दि.26 जानेवारी ते मंगळवार दि.28 जानेवारी 2013 या कालावधीत सरस्वती सभागृह (लेवा बोर्डीग हॉल ) जळगाव येथे संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या तिस-या  दिवसाच्या प्रथम सत्रात  ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीत ग्रंथांची भूमिका, या विषयावरील परिसंवादात पार पडला. अध्यक्षस्थानी बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस. राणे हे होते. या परिसंवादात दै.लोकमतचे संपादक सुधीर महाजन, कवयित्री माया धुप्पड,  डॉ.सुधीर भटकर, प्रा. शरदचंद्र छापेकर या मान्यवर वक्त्यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.
                परिसंवादाला प्रारंभ करतांना  प्रा. शरद छापेकर यांनी सांगितले की, मानवाला आलेल्या अनुभवांची सुसंघटीत पुनर्रचना म्हणजे ज्ञान होय, अशी ज्ञानाची व्याख्या करता येईल. आज माहितीचा प्रचंड मोठा विस्फोट झालेला आहे. पण माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्या द्वारे मानवतावादाचा विकास होतो ते ज्ञान. अशाप्रकारच्या ज्ञानाने समाज समृध्द करण्यासाठी ग्रंथांशिवाय पर्याय नाही. समाजात ज्ञानाची वाढ़ होतांना ती संतुलित असली पाहिजे , त्यासाठीही ग्रंथ हे मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.
                    विविध काव्य पंक्ती आणि सुभाषितांच्या आधारे आपले विचार मांडतांना माया धुप्पड म्हणाल्या की,  ज्ञान हे नेहमी जिवनाभिमुख असावे. आणि असं ज्ञान हे ग्रंथच देऊ शकतात. ग्रंथाद्वारे विवेकवादाची जोपासना होते. त्यासाठी लहानपणीच वाचनाचा संस्कार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
                  उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुधीर भटकर यांनी ग्रंथनिर्मितीत मुद्रण तंत्राचा इतिहास सांगून मानवाचे पशुत्व दूर करण्यात ग्रंथांचे मोलाचे योगदान आहे असे मत मांडले. तसेच  अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे ग्रंथ ही सुद्धा माणसाची एक गरज व्हावी, असे प्रतिपादन केले.
                  आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात लोकमतचे संपादक सुधीर महाजन म्हणाले की, उत्तर पेशवाईतील जो ज्ञानाधिष्ठित समाज होता तो विशिष्ट चौकटीच्या बाहेर विचार करीत नव्हता. मात्र ग्रंथ मुद्रण आणि प्रसाराला इंग्रजांनी चालना दिल्यानंतर हेच ग्रंथ हातात घेऊन महात्मा फुल्यांनी क्रांती केली आणि हीच क्रांती पुढच्या ज्ञानाधिष्ठित समाजरचनेची पाया भरणी करणारी ठरली. 1990 नंतर आलेल्या संगणक क्रांतीने पुस्तकांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढविली. त्यातून आजचा समाज घडतो आहे. ग्रंथांच्या प्रभावामुळे समाज बदलतो. आजही समाज ज्ञानेश्वरी , तुकारामाची गाथा, भागवत यांची पारायणे करतो, हे ग्रंथ डोक्यावर धरतो कारण त्यांचं संदर्भमूल्य आजही टवटवीत आहे, असे त्यांनी सांगितले.
                    आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. राणे म्हणाले की, ग्रंथाचे महत्व ज्ञानाधिष्ठित समाजरचना जी सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात होत आहे. त्यासाठी ग्रंथांचे महत्त्व अबाधित असून त्यासाठी ग्रंथवाचनाची चळवळ उभी राहिली पाहीजे. ग्रंथोत्सवासारखे उपक्रम त्यात आपले योगदान देत आहेत.
                     परिसंवादाच्या प्रारंभी मान्यवर वक्त्यांचे स्वागत देवेंद्र भूजबळ, उपसंचालक (माहिती), नाशिक विभाग, नाशिक यांनी केले. श्री. भुजबळ यांचे स्वागत जिल्हा माहिती अधिकार मिलिंद दुसाने यांनी केले. सूत्रसंचालन मनोज गोविंदवार यांनी तर आभारप्रदर्शन मिलिंद दुसाने यांनी केले. या ग्रंथोत्सवास वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांनाही जळगाव शहरातील रसिकांची चांगली गर्दी लाभत आहे.
                                             
                                         * * * * * * * * *

Monday, 27 January 2014

कशासाठी जगायचं हे ग्रंथच शिकवतात:कविवर्य ना.धों.महानोर


कशासाठी जगायचं हे ग्रंथच शिकवतात : कविवर्य ना.धों.महानोर

जळगाव, दि.27- पोटापाण्याचा उद्योग म्हणून घेतलं जाणारं शिक्षण हे आणि त्यानिमित्तानं होणारं वाचन हे जगण्यासाठी आवश्यक आहेच. पण जगण्याचं भान येण्यासाठी अधिकाधिक वाचन केलं पाहिजे आणि म्हणूनच  कशासाठी जगायचं हे शिकवण्याचं काम फक्त ग्रंथच करतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय समितीचे अध्यक्ष पद्मश्री कविवर्य ना. धों महानोर यांनी आज केले.
 राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत ग्रंथोत्सव-2013- 14 रविवार दि.26 जानेवारी ते मंगळवार दि.28 जानेवारी 2013 या कालावधीत सरस्वती सभागृह (लेवा बोर्डीग हॉल ) जळगाव येथे संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या दुस-या दिवसाच्या द्वितीय सत्रात श्री. महानोर ग्रंथचळवळ आणि महाराष्ट्र, या विषयावर उपस्थित रसिक वाचकांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी अध्यक्षस्थानी बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस. राणे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री. महानोर म्हणाले की,  महाराष्ट्रामध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करुन महान लेखकांची साहित्य संपदा संपादित करुन लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रंथ प्रकाशित केले ते स्वस्त दरात लोकांना उपलब्ध करुन दिले.  माझ्या घरातील पुस्तकांचा कोनाडा हाच माझा देव्हारा असे यशवंतराव म्हणत, अशी आठवण सांगून ते म्हणाले की, आज आपल्यापैकी किती जण ग्रंथ खरेदी करतो आणि ते वाचतो? असा सवाल त्यांनी केला. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या प्रांतात वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी केलेल्या फिरते वाचनालय, ग्रंथालये या उपाययोजनांची माहितीही त्यांनी सांगितली. ते पुढ़े म्हणाले की,   महाराष्ट्रात नवसाहित्यिकांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी अनुदान योजनाही आहे.  वाचनाची गोडी लागावी यासाठी शालेय पाठ्यक्रमात स्वाध्याय दिलेले असतात . त्यानुसार वाचन करण्याचे मार्गदर्शन शिक्षकांनी केले पाहिजे. केवळ योग्य वयात शिक्षकांनी मार्गदर्शन केल्यामुळे वाचनाची गोडी लागून अनेक जण पुढे आयुष्यात खूप मोठे झाले. म्हणूनच परिपूर्ण पुरुषोत्तम होण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
व्याख्यानाच्या प्रारंभी श्री. महानोर यांचा जिल्हा माहिती अधिकार मिलिंद दुसाने यांनी पुष्पगुच्छ, शाल  व सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला. सूत्रसंचालन मनोज गोविंदवार यांनी तर आभारप्रदर्शन मिलिंद दुसाने यांनी केले. या ग्रंथोत्सवास वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांनाही जळगाव शहरातील रसिकांची चांगली गर्दी लाभत आहे.  

                                      * * * * * * *

Sunday, 26 January 2014

वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यात ग्रंथोत्सवाची भुमीका महत्वाची:पालकमंत्री संजय सावकारे


वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यात ग्रंथोत्सवाची भुमीका महत्वाची
                                                    :पालकमंत्री संजय सावकारे


         जळगाव, दिनांक 26 -  आधुनिक माध्यमांमुळे वाचन संस्कृती कमी होत आहे, ही गोष्ट खरी आहे. नवीन माध्यमांमुळे वाचनासाठी आवश्यक असणारी एकाग्रता कमी होत आहे, त्यामुळे वाचनाची सवय वाढविणे व वाचन संस्कृती वृध्दिंगत करणे महत्वाचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या ग्रंथोत्सवांची भुमिका महत्वाची ठरते, असे प्रतिपादन राज्याचे कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.संजय सावकारे यांनी केले.
              जळगाव जिल्हा ग्रंथोत्सव 2013-14 चे पालकमंत्री ना.सावकारे यांच्या हस्ते आज थाटात उदघाटन झाले. लेवा बोर्डींग सभागृहात आयोजित या ग्रंथप्रदर्शन उदघाटन सोहळयाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर हे होते. या प्रसंगी बोलतांना सावकारे म्हणाले की, ग्रंथोत्सवाच्या निमीत्ताने अनेक दुर्मीळ ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध झालेले आहेत, त्यांचा वाचकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन विविध उपक्रम राबवित असते. मराठी ही ज्ञान भाषा झाली पाहिजे, तिचा अभिमान आपण बाळगला पाहिजे त्याचबरोबर ज्ञान मिळविण्यासाठी इतर भाषाही अवगत केल्या पाहिजेत तरच आपण जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकू. ग्रंथोत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी राजूरकर यांनी जिल्हयातील व राज्यातील ग्रंथालयांच्या उपलब्धतेविषयी माहिती सांगून ग्रंथ प्रसारासाठी व वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथोत्सवांचे महत्व आपल्या भाषणातून अधोरेखीत केले.
                या सोहळयाला ग्रंथोत्सव समितीचे सदस्य डॉ.किसन पाटील, चंद्रशेखर ठाकूर, विजय पाठक, रंगराव पाटील, शशिकांत हिंगोणेकर, बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राणे, नाशिक विभागाचे माहिती अधिकारी रविंद्र ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी फित कापून ग्रंथोत्सव दालनाचे उदघाटन पालकमंत्र्यांनी केले त्यानंतर ग्रंथ स्टॉल्सची पाहणी करुन स्वत: ग्रंथ खरेदी केली. उदघाटन सोहळा प्रसंगी शाहीर शिवाजीराव पाटील व सहका-यांनी देशभक्तीपर तसेच ग्रंथांची महती सांगणारे पोवाडे सादर केले. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी केले तसेच समिती सदस्य डॉ.किसन पाटील यांनी ग्रंथवाचणाचे महत्व विशद केले तर सुत्रसंचालन मनोज गोवींदवार यांनी केले. कार्यक्रमला विविध प्रकाशन संस्थेचे प्रतिनिधी, ग्रंथ प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.


* * * * * * * *

जळगाव जिल्ह्यात 28 लाख जणांना अन्नसुरक्षेचा लाभ:पालकमंत्री संजय सावकारे


जळगाव जिल्ह्यात 28 लाख जणांना अन्नसुरक्षेचा लाभ
                                                      :पालकमंत्री संजय सावकारे

जळगाव, दि.26- सतत प्रगल्भ होत जाणा-या लोकशाहीमुळे आपले राष्ट्र सातत्याने प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. या वाटचालीत अनेक क्रांतीकारी निर्णय झाले आहेत. देशात कुणीही उपाशी राहू नये यासाठी अन्न सुरक्षा कायदा आणला गेला आहे. हा कायदा महाराष्ट्रात 1 फेब्रुवारीपासून  अंमलात येणार आहे, आपल्या जळगाव जिल्ह्यातही 28 लाख 12 हजार लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य आणि भटक्या-विमुक्त जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज येथे केले.
देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या 64 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात ते बोलत होते. या सोहळ्याला  राज्याचे विरोधी पक्षनेता एकनाथराव खडसे, आ. मनिष जैन, जि. प. अध्यक्ष  दिलीप खोडपे, महापौर  राखीताई सोनवणे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. जयकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनपा आयुक्त संजय कापडणीस, होमगार्ड जिल्हा समादेशक डॉ. भालोदे , विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, प्रतिष्ठित नागरिक आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर मोठ्या थाटात पार पडला. त्यावेळी जनतेला शुभेच्छा देतांना पालकमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, देशाने अन्नधान्य उत्पादनात मोठी क्रांती केली आहे. ऎकेकाळी आपणास अन्नधान्य आयात करावे लागत होते आता मात्र अन्नधान्याची आपली गरज भागवून आपण इतर देशांना अन्नधान्य निर्यात करु शकतो. अन्न सुरक्षा कायद्यामुळे देशातील ग्रामीण भागातील 76.32 व शहरी भागातील 45.34 टक्के लोकांना सवलतीच्या दरात धान्य मिळणार आहे. राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजना ही जळगाव जिल्ह्यात 25 नोव्हेंबर 2013 पासून लागू झाली आहे. जळगाव जिल्हा या योजनेच्या अंमलबजावणीत अव्वल आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सावकारी  नियमन अध्यादेश 2014 मुळे जिल्हा उपनिबंधकांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त झाले असून त्यामुळे सावकारीमुळे होणारी शेतक-यांची पिळवणूक प्रभावीपणे थांबविता येईल, असेही त्यांनी सांगितले. 
प्रारंभी सकाळी 9.15 वा. पालकमंत्री श्री. सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शानदार संचलन व बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.  पालकमंत्र्यांनी  परेडचे निरिक्षण केले. परेड कमांडर बसवराज तेली (भापोसे) यांच्या नेतृत्वाखाली  23 दलांनी  व विभागाच्या चित्ररथांनी आपले संचलन केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.
जिल्ह्यातील विविध विद्यालयांच्या कलापथकांनी हे कार्यक्रम सादर केले. या प्रसंगी राष्ट्रपती सन्मान पदक प्राप्त पोलीस गृह उपअधीक्षक वाय.डी.पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक मुश्ताक अहमद शेख इसा  यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली, ता. जळगाव, डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक विद्यालय, बांबरुड राणीचे ता. पाचोरा, खुबचंद सागरमल माध्यमिक विद्यालय, शिवाजीनगर जळगाव, काशिनाथ पलोड पब्लिक स्कुल जळगाव , बहिणाबाई माध्यमिक विद्यालय , जळगाव, श्रीमती क.द. नाईक माध्यमिक विद्यालय, पाळधी, ता. जामनेर  या शाळांना पंचतारांकित हरित शाळा पारितोषिक , जिजामाता माध्यमिक विद्यालय, जळगाव या शाळेस उत्कृष्ट बी संकलन करणारी शाळा पारितोषिक देण्यात आले. तसेच कांचन योगेश चौधरी ( एकलव्य क्रीडा पुरस्कार), विष्णू रामदार भंगाळे (क्रीडा संघटक), उल्हास ठाकरे (ॲथेलेटिक्स) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, नागेश अर्जून खरारे (बॉक्सिंग), विशाल बेलदार व तृप्ती तायडे (तायक्वोंदो) या खेळाडूंचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमांचे सूत्र संचलन जेष्ठ पत्रकार अनिल पाटील, डॉ. जी. ए. उसमानी यांनी केले, या सोहळयास शहरातील नागरीक , विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

                                          * * * * * * * * 

Saturday, 25 January 2014

मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा :जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर


               मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा                                                                            :जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर

         जळगाव, दि. 25 :- लोकशाही बळकटीकरणाच्या प्रकियेत निर्भयमुक्त वातावरणात पार पडणा-या निवडणुका आणि मतदारांचे मत या दोन्ही गोष्टींना अनन्य साधारण असे महत्व आहे. एकीकडे आपल्या आवडीचा सक्षम नेता निवडण्याचे स्वातंत्र्य या माध्यमातून मतदारांना मिळत असतांना दुसरीकडे सशक्त लोकशाहीची पायाभरणी होत असते. आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची एक चांगली गुंतवणूक देखील मानली जाते. त्यामुळे मतदार असल्याचा अभिमान बाळगून प्रत्येक मतदारांनी  निवडणूक प्रक्रियेत आपला सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात केले.
         यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले, अप्पर पोलीस अधिक्षक एन.अंबीका, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उप विभागीय अधिकारी अभिजीत भांडे, उप जिल्हाधिकारी निवडणूक मनोहर चौधरी यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नवमतदार मोठया संख्येने उपस्थित होते.
          कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मतदारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल मत - आपला हक्क- आपला मतदान केंद्र याबाबतीत जागरूक राहतांना मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावं. मतदानाचा मुलभूत अधिकार बजवावा आणि मतदानाला न जाण्याची आणि मतदान न करण्याची उदासिनता मनातून काढून टाकावी. तरुणांना आपण देशाचा आधारस्तंभ मानतो. याच आधारस्तंभांने पुढे येऊन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हाव, समृध्द, सशक्त लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले. त्याचे 4 थे वर्ष आज साजरा करतांना मनस्वी आनंद होत असून या दिवसाचे महत्व व आपला मौल्यवान मताधिकार ओळखून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
         यावेळी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री.व्हि.एस.संपत यांची मतदार दिनाचे महत्व पटविणारी चित्रफित प्रदर्शीत करण्यात आली तर तहसिलदार गोविंद शिंदे यांनी निर्भयपणे व निपक्षपातीपणे सर्वांनी मतदान करण्यासाठी शपथ दिली. प्रसंगी नवमतदारांना मतदान कार्डांचे वाटप करण्यात आले तर मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्याचे बक्षीस वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मतदारांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप जिल्हाधिकारी निवडणूक मनोहर चौधरी यांनी केले तर आभार तहसिलदार निवडणूक श्रीमती हेमलता बढे यांनी मानले.

* * * * * *

Friday, 24 January 2014

पालकमंत्री संजय सावकारे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री संजय सावकारे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

               जळगाव,दि. 24:-  राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री  संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-
               शनिवार दि. 25 जानेवारी 2014 रोजी सकाळी 7.00 वा. महानगरी एक्सप्रेसने भुसावळ रेल्वेस्थानक येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी 10.00 वा. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजक, तहसिलदार भुसावळ नाहटा कॉलेज, भुसावळ सकाळी 10.45 वा. शासकीय मोटारीने फैजपूर ता. यावलकडे प्रयाण, सकाळी 11.00 वा. जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय, युवारंग 2013-14 कार्यक्रमास उपस्थित स्थळ जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय फैजपूर, दुपारी 12.30 वा. फैजपूर येथुन मोटारीने भुसावळकडे  प्रयाण व आगमन, दुपारी 2.30 वा. शासकीय मोटारीने जळगावकडे प्रयाण, दुपारी 3.00 वा. रॉ. कॉ. पार्टीच्या लोकसभा निवडणूक 2014 आढावा सभेस उपस्थिती स्थळ रा. कॉ. पक्ष कार्यालय, जळगाव. संध्या सोयीनुसार शासकीय मोटारीने भुसावळकडे प्रयाण,
              रविवार दि. 26 जानेवारी 2014 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय मोटारीने जळगावकडे प्रयाण, सकाळी 9.15 वा. भारतीय प्रजासत्ताक दिन - 64 वा वर्धापन दिन ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित, स्थळ पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव. सकाळी 11.00 वा. ग्रंथोत्सव 2013 च्या उदघाटन काय्रक्रमास उपस्थित, म. रा. साहित्य व संस्कृती मंडळ व जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने स्थळ - लेवा एज्युकेशन युनियन सभागृह,बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव, सकाळी 12.00 वा. शासकीय मोटारीने भुसावळकडे प्रयाण, दुपारी 1.00 वा. समस्त लेवा समजा चिंतन मेळावा स्थळ - संतोषी माता हॉल, भुसावळ, दुपारी 2.30 वा. भुसावळ येथे राखीव, रात्री 7.00 वा. शासकीय मोटारनी जामनेरकडे प्रयाण, रात्री  8.00 वा. ऑल इंडिया मुशायरा कवी संमेलनास उपस्थिती, स्थळ - जमजम नगर, बोदवड रोड, जामनेर, रात्री सोईनुसार शासकीय वाहनाने भुसावळकडे प्रयाण

* * * * * * * * * *

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आरोग्य पत्र वितरणांचा उदयापासून प्रारंभ

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
आरोग्य पत्र वितरणांचा उदयापासून प्रारंभ

              जळगाव, दि. 24 :- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना महाराष्ट्र शासनाने कमी उत्पन्न गटांच्या लाभार्थ्यांसाठी चालू केलेली आहे. दारिद्रयरेषेखालील (पिवळे शिधापत्रिका) व दारिद्रयरेषेवरील केशरी शिधापत्रिका धारक ( रुपये 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारी कुटूंबे) अंत्योदय व अन्नपूर्णा शिधापत्रधारक कुटूंबे या योजनेसाठी पात्र लाभाथी्र आहेत. या योजनेमध्ये विमा कंपनीच्या सहभागने निवडलेल्या 971 गंभीर आजांवर व 121 पाठपुरावा सेवांवर प्रती कुटूंब रुपये 1.50 लाख मर्यादे पर्यत विमा संरक्षण देण्यात येते. यामध्ये प्रती कुटूंब प्रती वर्षी रुपये 1.50 लाख मर्यादे पर्यत कुटूंबातील सर्व सदस्य रुग्‍णालयातून लाभ घेवू शकतात.
                पहिल्या टप्यामध्ये ही योजना 8 जिल्हयामध्ये 2 जुलै 2012 पासून कार्यान्वित झाली अहे. पहिल्या टप्प्यातील मिळालेलया अभूतपूर्व यशानंतर आता महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व जिल्हयात रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरऔरंगाबाद, बीड, हिंगोली,  जालना, लातून, परभणी, उस्मानाबाद, अकोला, बुलढाणा,वाशिम, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्हयात ही  योजना 21 नोव्हेंबर 2013 पासून कार्यान्वीत झाली आहे.
                पात्र लाभार्थ्यांना पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारक अन्नपूर्णा व अंत्योदय शिधापत्रिकाधारक यांना ओळखपत्र म्हणून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य पत्र वितरण करण्याची कार्यवाही चालू आहे. सदरचे आरोग्य पत्र रुग्णालयात उपचाराच्या वेळी ओळख पत्र म्हणून उपयोगात येते. जिल्हयात एकूण 8 लाख 38 हजार 266 पात्र लाभार्थी असून आजतागायत  1 लाख 75 हजार 532 लाभार्थ्यांना आरोगय पत्र वितरीत करण्यात आले आहेत.
               आरोग्य पत्राचे वितरण जिल्हयातील 160 महाईसेवा केंद्रामध्ये व 1151 संग्राम केंद्राच्या ठिकाणी चालू आहे.ख्‍ या आरोग्य ठिकाणी आरोग्य पत्राचे छपाई व तिवरण चालू असले तरी विशेषत: शहरी भागात यंत्रणा कमी पडतात. त्यामुळे जनसामान्यात परिचित असणारी व सर्व सामान्यांना जवळची वाटणा-या टपाल कार्यालयामध्ये आरोगय पत्र वितरणाचा शासनाने निर्णय घेतला आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना व महाराष्ट्रातील टपाल विभाग दि. 17 डिसेंबर 2013 रोजी सामंजस्य करार करण्यात आला. जिल्हयामध्ये 2 टपाल कार्यालयामध्ये इंटरनेट व लेझर प्रिंटर सुविधा उपलब्ध असून त्या ठिकाणी लाभार्थ्यांना आरोगय पत्र छपाई करुन वितरण केले जाईल तसेच जिल्हयातील 46 टपाल कार्यालयात या सुविधा उपलबध नसल्याने लाभार्थी त्या टपाल कार्यालयात आपला अर्ज व शिधापत्रिका व  फोटो ओळखपत्राची सत्यप्रत सादर करतील व संबंधीत टपाल कार्यालये आठवडयाच्या आत लाभार्थ्याला आरोग्य पत्र उपलबध करुन देतील.
             जिल्हयातील ज्या ठिकाणी आरोग्य पत्र मिळणाच्या सुविधा उपलब्ध आहेत त्या महाई-सेवा केंद्र, संग्राम केंद्र व टपाल कार्यालये या ठिकाणी लाभार्थ्या शिधापत्रिका व फोटो ओळखपत्र दाखवून आरोगय पत्र छपाई करुन घेतील तयानंतर लाभार्थ्यांनी त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या नावा समोर दश्रविलया ठिकाणी स्टॅम्प आकाराचे फोटो चिकटवावयाचे आहेत. नामनिर्देशित केलेल्या अधिका-याकडून सदरचे आरोग्य पत्र स्वाक्षांकित करुन घ्यावयाचे आहेत. त्यानंतरच या आरोग्य पत्राचा रुग्णालयातील उपचारासाठी उपयोग होऊ शकेल.
           जिल्हयातील आरोग्य सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, ग्राम विस्तार अधिकारी, मंडळ निरीक्षक, मंडल अधिकारी, सहाय्यक पोस्ट मास्टर, पोस्ट मास्टर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयातील अधिकारी , अन्य कोणत्याही राजपत्रित अधिकारी या अधिका-यांना आरोग्य पत्र स्वाक्षांकित करण्याचे अधिकार दिले आहेत.

* * * * * * * * *

Thursday, 23 January 2014

राष्ट्रीय महामार्ग क्रं.211 च्या भुसंपादनाचे कामकाज चाळीसगांव प्रांताधिका-यांकडे वर्ग : प्रांताधिकारी गणेश मिसाळ

राष्ट्रीय महामार्ग क्रं.211 च्या भुसंपादनाचे कामकाज
चाळीसगांव प्रांताधिका-यांकडे वर्ग
                                                              : प्रांताधिकारी गणेश मिसाळ
  
चाळीसगाव, दिनांक 23 :- औरंगाबाद-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्रं.211  च्या चौपदरीकरणासाठी चाळीसगाव तालुक्यातील 14 गावातील शेतजमिनी संपादीत करण्याचे काम पाचोरा प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांचेकडे सुरु होते. भारत सरकारच्या सन 2011 च्या राजपत्रान्वये पुर्वी पाचोरा प्रांताकडे चाळीसगांव तालुका असल्याने तेच हे कामकाज हाताळत होते. परंतु महाराष्ट्र शासनाने 15 ऑगस्ट, 2013 रोजी नविन उपविभागाची निर्मीती केल्याने चाळीसगांव येथे नविन उपविभाग तयार करण्यात आलेला आहे व त्या ठिकाणी श्री.मनोज घोडे हे प्रांताधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत. भुसंपादन होणारी सर्व 14 गावे  अनुक्रमे बोढरे, रांजणगांव, चाळीसगांव, कोदगांव, पाटखडकी, खडकी बु., बिलाखेड, करगांव, भोरस खु., भोरस बु., दसेगांव बु., मेहुणबारे, खडकीसिम व दहिवद ही चाळीसगांव तालुक्यात येत असल्याने व कामास अधिक गती यावी म्हणुन पाचोरा प्रांत गणेश मिसाळ यांनी जिल्हाधिकारी यांचेमार्फत भारत सरकारकडे प्रस्ताव सादर करुन हे काम चाळीसगांव प्रांताकडे वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यानुसार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाने नुकतेच भारत सरकारच्या राजपत्रात भुसंपादन अधिका-याच्या पदनामात बदल करुन सक्षम प्राधिकारी म्हणुन चाळीसगांव प्रांताना घोषित केले आहे. सदर राजपत्र पाचोरा कार्यालयास प्राप्त होताच पाचोरा प्रांत कार्यालयाने भुसंपादनाचे सर्व दप्तर चाळीसगांव प्रांतकार्यालयाकडे हस्तांतरीत केले आहे. यापुढील राष्ट्रीय महामार्गाच्या भुसंपादनाच्या कामकाजाबाबत सर्व संबंधितांनी पाचोरा प्रांत कार्यालयात पत्र्यव्यवहार न करता चाळीसगांव प्रांतकार्यालयात करावा असे आवाहन प्रांताधिकारी पाचोरा गणेश मिसाळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            पाचोरा प्रात कार्यालयात भुसंपादनाबाबत यापुर्वी 3(अ) चे राजपत्र प्रसिध्दीकरण झालेले आहे. यामध्ये संपादन होणा-या गटांचा समावेश असतो. तसेच 11 गावांची मोजणी प्रक्रिया झालेली आहे. तीन गावांची मोजणी प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित आहे. कलम 3(अ) च्या राजपत्र प्रसिध्दीवर संबंधित शेतक-यांनी घेतलेल्या 535 हरकतींची सुनावणी घेऊन त्यांचे आदेश निर्गमित केलेले आहेत. बहुतेक हरकती या मुल्यांकनासाठी असल्याने त्या निकाली काढलेल्या आहेत. मुल्यांकनाबाबत हरकती या कलम 3(ड) चे शेतक-यांच्या नावासह राजपत्रात गट प्रसिध्दी झालेनंतर मुदतीत घ्याव्यात. त्यानंतर कलम 3(ग) प्रमाणे निवाडा (हिशेब आदेश) केला जातो. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असेही प्रांताधिकारी, पाचोरा गणेश मिसाळ यांनी कळविले आहे.



                                   * * * * * * * * 

Wednesday, 22 January 2014

प्रजासत्ताक दिनाचा 64 वा वर्धापन दिन समारंभ पोलीस परेड मैदानावर : तहसिलदार बाबासाहेब गाढवे

प्रजासत्ताक दिनाचा 64 वा वर्धापन
 दिन समारंभ पोलीस परेड मैदानावर
                                                        : तहसिलदार बाबासाहेब गाढवे
  
चाळीसगाव, दिनांक 22 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 64 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त 26 जानेवारी, 2014 रोजी सकाळी 09:15 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास तालुक्यातील अधिकाधिक लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे. शहरातील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तहसिल कार्यालय चाळीसगाव येथे उप विभागीय अधिकारी चाळीसगांव यांच्या अध्यक्षतेखाली  तालुक्यातील सर्व कार्यालय व  विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली  प्रसंगी ते बोलत होते.
            या बैठकीस उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड, गटविकास अधिकारी मालती जाधव, मुख्याधिकारी नगर परिषद रविंद्र जाधव, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह तालुक्यातील विविध कार्यालयाचे प्रमुख, विभाग प्रमुख उपस्थित होते.
            प्रजासत्ताक दिनी  ध्वज सरंक्षणासाठी पोलीस प्रमुखांना दोन पोलीस कर्मचा-यांची नियुक्ती करण्याच्या सुचना देण्यात आल्या, तर वन्य जिवांचे सरंक्षण व वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृतीपर भित्तीपत्रीका प्रदर्शीत करण्याच्या सुचना वन विभागाला देण्यात आल्या, विविध शाळांनी आपले सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजनाची मंजूरी घेऊन त्याचे नियोजन करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांना सुचना देण्यात आल्या तर आदर्श आचारसंहितेचे यथोचित नियोजन सर्व विभागप्रमुखांनी करण्याच्या सुचना प्रातांधिकारी घोडे यांनी या बैठकीत दिल्या.
            शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना या शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी 26 जानेवारी, 2014 रोजी सकाळी 08:30 ते 10:00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 08:30 पूर्वी किंवा 10:00 वाजेनंतर करावे असे आवाहनही उप विभागीय अधिकारी मनोज घोडे यांनी केले आहे.

नगरपरिषदेमार्फत श्री छत्रपती शिवाजी महाराज घाट येथे होणार ध्वजारोहण

            चाळीसगाव नगरपरिषदेमार्फत 26 जानेवारी, 2014 रोजीच्या 64 व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण नगराध्यक्षा अनिता चौधरी यांच्या हस्ते सकाळी 08:20 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज घाट येथे होणार असून या समारंभासाठी शहरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष प्रदीप निकम तसेच मुख्याधिकारी रविंद्र जाधव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


                                   * * * * * * * * 

Tuesday, 21 January 2014

लोकराज्यचा ‘आत्ता या क्षणी’ ई-गव्हर्नन्स विशेषांक प्रकाशित


लोकराज्यचा ‘आत्ता या क्षणी’ ई-गव्हर्नन्स विशेषांक प्रकाशित

मुंबई, दि.21 : प्रशासन व्यवस्थेला माहिती तंत्रज्ञानाची साथ लाभल्याने मागील काही वर्षात महाराष्ट्राचे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक, उत्तरदायी आणि परिणामकारक झाले आहे. माहिती तंत्रज्ञान हा आधुनिक काळातील सुप्रशासनाचा प्रमुख आधार बनला आहे. हाच धागा पकडून लोकराज्यचा जानेवारी महिन्याचा अंक ‘आत्ता या क्षणी’ ई-गव्हर्नन्स विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे.
            स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान धोरण जाहीर करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. या माध्यमातून राज्यात अनेक अभिनव प्रयोग यशस्वीपणे राबविले गेले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात आमुलाग्र परिवर्तन घडून आले आहे. या सर्व बदलाचा वेध या विशेषांकामधून घेण्यात आला आहे.
            ई-गव्हर्नन्सच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. 33 व्या स्कॉच शिखर परिषदेत ई-गव्हर्नन्स विषयक 18 पारितोषिके मिळवून महाराष्ट्राने विक्रम केला. ई-गव्हर्नन्स अंतर्गत पेपरलेस शासकी व्यवहाराला प्राधान्य देण्यात आले आहे. अनेक विभाग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काम करीत आहेत. राज्यात 35 हजार नागरी सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. निविदा प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी ई-टेंडरिंगचा वापर केला जात आहे. राज्यातील 25 हजार ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून 'सेतू' , 'संग्राम' या कार्यप्रणाली यशस्वी ठरल्या आहेत. महसूल, विक्रीकर, राज्य उत्पादन शुल्क, उच्च शिक्षण, कृषी, आरोग्य, नगरविकास, साखर आयुक्तालय या  विभागात माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरु करण्यात आल्या आहेत.
            माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवा-सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र शासनाने केलेल्या प्रगतीचा आलेख सोप्या भाषेत या अंकात मांडण्यात आला आहे. सोबत या क्षेत्रातील अभिनव प्रयोग आणि यशकथा देखील देण्यात आल्या आहेत. लोकराज्यच्या इतर अंकांप्रमाणे हा अंकदेखील संग्राह्य असाच आहे.


* * * * * * * *

Monday, 20 January 2014

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे शाळा प्रमुखांचा सत्कार


जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे शाळा प्रमुखांचा सत्कार

        जळगाव, दि. 20 :- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास मदत करणा-या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक विश्रामगृह, मायादेवी नगर, महाबळ रोड, जळगाव येथे करण्यात आला. यावेळी कर्नल एच. एन. माहेश्वरी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन मोहन कुलकर्णी उपस्थित होते. जळगाव जिल्हयातील विविध शाळामधील मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका व शिक्षक, माजी सैनिक संघटनांचे पदधिकारी, माजी सैनिक यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला..
          कार्यक्रमाच्या सुरुवातीस  साधना लोखंडे, मुख्याध्यापक, आर्दश हायस्कूल भुसावळ तसेच मुख्याध्यापक अग्लो उर्र्दू हायस्कूल, रावेर यांनी देश भक्तीपर गीते सादर केली. श्री. शशिकांत हिंगोणेकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन  रतन थोरात, यांनी तर आभार प्रदर्शन कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी केले.
                                                                      
                                                           * * * * * * * *

Saturday, 18 January 2014

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेस आज पासून प्रारंभ जळगाव जिल्हयात 2345 लसीकरण केंद्र सज्ज

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेस आज पासून प्रारंभ
जळगाव जिल्हयात 2345 लसीकरण केंद्र सज्ज

       जळगाव, दि. 18- राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम 19 जानेवारी व 23 फेब्रुवारी 2014 रोजी जिल्हयात सर्वत्र राबविण्यात येणार आहे.त्यासाठी जिल्हाभरात 2345 लसीकरण केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत.
           राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम हे राष्ट्रीय कार्य असून देशात  पल्स पोलीओ मोहीम सातत्याने काही वर्षापासून राबविली जात आहे. त्यामुळेच भारत हा पोलिओ मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. दि. 19 जानेवारी व 23 फेब्रुवारी 2014 जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील 0 ते 5 वर्ष् वयोगटातील बालकांना ही लस दिली जाणार आहे. या लसीकरण मोहीमेसाठी जिल्हयातील  ग्रामीण भागात  2006 केंद्रे असून शहरी भागातील 339 अशी एकूण 2345 लसीकरण केंद्रे आहेत. ग्रामीण भागात 3 लाख 25 हजार 56 तर शहरी भागात 1 लाख 1 हजार 954 अशी एकूण 4 लाख 27 हजार 10 अपेक्षित लाभार्थी आहेत. लसीकरण केंद्रासाठी ग्रामीण भागात 5 हजार 433 तर शहरी भागात 991 असे एकूण 6 हजार 424 मनुष्यबळ उपलब्ध आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागात 403 तर शहरी भागासाठी 68 लसीकरण केद्र पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. ट्रांझिट टीम ग्रामीण भागात 159 तर शहरी भागात 41, मोबाईल टीम ग्रामीण भागासाठी 230 तर शहरी भागासाठी 18, रात्री साठी प्रत्येकी 2 टीम नियुक्त करण्यात आल्या आहेत.
            जिल्हयातील प्रत्येक रेल्वे स्टेशन, एस. टी. बसस्थानक, खाजगी वाहतूक स्थानक, बाजार, यात्रा, लग्न, चेकपोस्ट, वीट भट्टया , कारखाने, शेतमळे, खाजगी दवाखाने इत्यादी ठिकाणी ट्राजीट व फिरते पथकामार्फत लस देण्यात येणार आहे. ग्रामीण - शहरी भागात दि. 21 जानेवारी ते 23 जानेवारी व 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या दरम्यान घरोघरी जाऊन मुलांना लस दिली जाणार आहे. एकही बालक लसी पासून वंचित राहणार नाही असे नियोजन प्रशासनाने केले आहे. लसीकरणासाठी पुरेसे साहित्य उपलब्ध झाले आहे. जिल्हयातील सर्व नागरिकांनी आपल्या 5 वर्षाच्या बालकास 19 जानेवारी व 23 फेब्रुवारीला सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेच्या दरम्यान नजिकच्या पोलिओ बुथवर जाऊन पोलीओ डोस पाजवा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

                                                              * * * * * * * *

इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेन्शीयल स्कूल मधील प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा

इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेन्शीयल स्कूल मधील प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा

          जळगाव, दि. 16 :- आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणा-या इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशिलय पब्लिक स्कूल, नाशिक येथे सन 2014-15 या शैक्षणिक वर्षात इयत्ता  6 वी मध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद, ता. अमळनेर जि. जळगाव  व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गंगापूरी ता. जामनेर जि. जळगाव या दोन परीक्षा केंद्रावर स्पर्धा परीक्षा रविवार दिनांक 9 मार्च 2014 रोजी सकाळी 11.00 ते 13.00 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. जे आदिवासी विद्यार्थी सन 2013-14 या चालू शैक्षणिक वर्षामध्ये इयता 5 वी च्या वर्गात शिकत असून परीक्षेला बसलेले आहेत व पुढील वर्षी इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश घेणारे आहेत अशा इच्छूक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकामार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव यांचेकडे दिनांक 20 जानेवारी 2014 पर्यंत अर्ज करावेत. अर्जाचा नमुना प्रकल्प कार्यालय, यावल व सर्व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती येथे उपलब्ध आहे. सदर परीक्षा शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा व इतर मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेले इयत्ता 5 वीच्या विद्यार्थी करीता पूर्णत: खुली आहे. तथापि विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक कमाल उत्पन्न रुपये एक लाखाच्या आत असावे. व पालक शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावे. अर्जासोबत सक्षम अधिका-यांनी दिलेला पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखल जोडणे आवश्यक आहे. अनुसूचित जमातीतील अपंग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 जागा आरक्षित राहतील. तरी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास, प्रकल्प यावल यांनी केले आहे.

                                                      * * * * * * * *

Friday, 17 January 2014

दंगलीबाबत पालकमंत्र्यांकडून सद्यस्थितीचा आढावा


दंगलीबाबत पालकमंत्र्यांकडून सद्यस्थितीचा आढावा

जळगाव,दि.17- राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य आणि भटक्या – विमुक्त जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज जळगाव शहरातील तांबेपूरा भागातील दंगलीबाबतच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक एस. जयकुमार , माजी आमदार गुलाबराव पाटील व अन्य पोलीस अधिकारी तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांची दंगलीची कारणमिमांसा जाणून घेत दोन्ही समुदायाच्या लोकांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. भविष्यात पुन्हा असे प्रकार घडू नये यासाठी तात्काळ व दिर्घकालीन उपाय करण्याच्या सुचना पोलीस अधिका-यांना केल्या. या भागातील समाजकंटकांवर कठोरपणे कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. तसेच तपासकामी स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

* * * * * * * * * *

डॉजबाल स्पर्धेत  महाराष्ट्र संघ अजिंक्य

जळगाव, दि.17- 59 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत  मुले व मुली दोन्ही गटात महाराष्ट्राचे संघ अजिंक्य ठरले. आज जळगाव येथे या स्पर्धांचा समारोप झाला. राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य आणि भटक्या - विमुक्त जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्र संघ प्रथम, पंजाब द्वितीय तर झारखंडचा संघ तृतीय क्रमांकाचा विजेता ठरला. तर मुलांच्या गटात महाराष्ट्र प्रथम, पंजाब द्वितीय व छत्तीसगडचा संघ तृतीय क्रमांकाचा विजेता ठरला.  या वेळी क्रीडा उपसंचालक आघाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील व अन्य अधिकारी, प्रशिक्षक, संघांचे व्यवस्थापक, क्रीडाप्रेमी नागरीक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          
* * * * * * * * * *

प्रजासत्ताक दिनाचा 64 वा वर्धापनदिन
समारंभ पोलीस कवायत मैदानावर

          जळगाव, दि.17:-  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 64 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त्‍ 26 जानेवारी 2014 रोजी 9.15 वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास सर्व स्वातंत्र सैनिक, विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी व शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले आहे. जळगाव शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना या शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी 26 जानेवारी 2014 रोजी सकाळी 8.30 ते 10.00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभा करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 च्या पूर्वी किंवा 10.00 च्या नंतर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यानी केले आहे.
          
* * * * * * * * * *

अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त जमातीच्या
हक्काविषयी शिबीर संपन्न

               जळगाव, दि. 17 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव, जिल्हा वकील संघ, जळगाव व कमल - केशव प्रतिष्ठान, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त जमाती यांचे हक्क बाबत कायदेविषयक शिबीर नुकतेच संपन्न झाले.
               कार्यक्रमास जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. पी. सुराणा तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक आयुक्त समाजकल्याण श्री. पी. सी. चव्हाण उपस्थित होते.
               याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास तर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समिती सदस्या श्रीमती भारती म्हस्के यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्रीमती शिलाबरी जमदारे व सहकारी कलाकार यांनी हुंडा बळी, लेक वाचवा, व्यसनमुक्ती व अंधश्रध्दा या विषयावर पथनाटय सादर केले.
              यावेळी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण  पी. सी. चव्हाण यांनी अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांच्या पाल्यांना कोणकोणत्या शासकीय योजनांचा लाभ मिळतो तसेच यासाठी काय करावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
             यावेळी अध्यक्षांनी शासकीय योजनांची संपूर्ण माहिती असणारे वाटचाल या शासकीय मार्गदर्शिकेचे वाटप करण्यात आले.
               सदर शिबीरास  जिल्हा न्यायाधिश   एम. बी. दात्ये, तदर्थ जिल्हा न्यायाधिश -2. के. पी. नांदेडकर, दिवाणी न्यायाधीश क.स्तर के. आर. चौधरी, मुख्य न्यायदंडाधिकारी  एम. आर. पुरवार, दुसरे सहदिवाणी न्यायाधिश क.स्तर  पी. पी. राजवैदय, तिसरे सह दिवाणी न्यायाधिश क.स्तर श्रीमती पी. व्ही. घुले, चौथे सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर श्रीमती के. डी. शिरभाते, पाचवे सहदिवाणी न्यायाध्णीश क.स्तर  पी. पी. मुळे, सहावे सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर श्रीमती ए. डी. बोस, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर  ए. बी. होडावडेकर, पाचवे सहदिवाणी न्यायाधिश क.स्तर  ए. सी. बिराजदार, सातवे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर  पी. जी. महाळकर, आठवे सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर  जे. जी पांडे, नववे  सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर व जिल्हा महिला विकास अधिकारी  देवेंद्र राऊत,श्रीमती शोभा हंडोरे, श्रीमती विद्या सोनार, श्रीमती सरीता माळी, श्रीमती स्मिता वेद, श्रीमती निवेदिता ताठे, श्रीमती वैशाली विसपुते,  ए. एन. पाटील श्रीमती संध्या कुलकणी,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक  लखन कुमावत, आशा खैरनार, वंदना कळस्कर, उर्मिला खैरनार, चारुलता सोनवणे उपस्थित होते.
               कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड केतन सोनार यांनी  तर आभारप्रदर्शन . डी.आर. शेट्टी यांनी केले.
          
* * * * * * * * * *

 डाक अदालत 28 जानेवारी रोजी
            जळगाव, दिनांक 17 :- डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या निवृत्ती वेतन (पेंशन) संबंधी ज्या तक्रारीचे निवारण 6 आठवडयांच्या आत झालेली नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2014 रोजी 4.30 वाजता मुख्य पोस्टमास्टर जनरल, मुंबई यांचे कार्यालमध्ये 36 वी डाक पेंशन अदालत आयोजित केली आहे. सदर डाक अदालत मध्ये  कायदा संबंधित प्रकरणे उदा. उत्ताराधिकार तथा धोरणात्मक स्वरुप संबंधित तक्रारी पेंशन अदालतमध्ये विचारात घेतली जाणार नाही. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.  तारीख  व ज्या अधिका-यांस मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव, हुद्या इत्यादी संबंधितांनी पेंशन बाबतची आपली तक्रार एस. जी. वढवेकर, वरिष्ठ लेखधिकारी / सचिव, पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी. पी. ओ. इमारत, 2 रा माळा, मुंबई - 400 001 यांचे नावे अतिरिक्त प्रतिसह दिनांक 22 जानेवारी 2014 अथवा तत्पुर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे एस. एम. पाटीलसुपरिंटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिस, जळगाव यांनी कळविले आहे.
          
* * * * * * * * * *


Wednesday, 15 January 2014

एकत्रित प्रयत्नातून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करा : मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले


एकत्रित प्रयत्नातून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करा !
: मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले

       जळगाव, दि. 15- राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम 19 जानेवारी व 23 फेब्रुवारी 2014 रोजी जिल्हयात सर्वत्र राबविण्यात येणार असून पल्स पोलिओ मोहीमेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी आपआपसात उत्तम समन्वय ठेवून एकत्रित प्रयत्नातून  ही मोहीम यशस्वी करावी अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शीतल उगले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय कृती समितीच्या आढावा बैठकीत सहभागी अधिका-यांना  दिल्या .
            श्रीमती उगले पुढे म्हणाल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम हे राष्ट्रीय कार्य असून देशात  पल्स पोलीओ मोहीम सातत्याने काही वर्षापासून राबविली जात आहे. त्यामुळेच भारत हा पोलिओ मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. दि. 19 जानेवारी व 23 फेब्रुवारी 2014 जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील 0 ते 5 वर्ष् वयोगटातील बालकांना ही लस दिली जाणार आहे. या लसीकरण मोहीमेसाठी जिल्हयातील  ग्रामीण भागात  2006 केंद्रे असून शहरी भागातील 339 अशी एकूण 2345 लसीकरण केंद्रे आहेत. ग्रामीण भागात 3 लाख 25 हजार 56 तर शहरी भागात 1 लाख 1 हजार 954 अशी एकूण 4 लाख 27 हजार 10 अपेक्षित लाभार्थी आहेत. लसीकरण केंद्रासाठी ग्रामीण भागात 5 हजार 433 तर शहरी भागात 991 असे एकूण 6 हजार 424 मनुष्यबळ उपलब्ध आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागात 403 तर शहरी भागासाठी 68 लसीकरण केद्र पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. ट्राझिट टीम ग्रामीण भागात 159 तर शहरी भागात 41, मोबाईल टीम ग्रामीण भागासाठी 230 तर शहरी भागासाठी 18 रात्री साठी प्रत्येकी 2 टीम नियुक्त करण्यात आल्या आहेत.
             जिल्हयातील प्रत्येक रेल्वे स्टेशन एस. टी. बसस्थानक, खाजगी वाहतूक स्थानक, बाजार, यात्रा, लग्न, चेकपोस्ट, वीट भट्टया , कारखाने, शेतमळे, खाजगी दवाखाने इत्यादी ठिकाणी ट्राजीट व फिरते पथकामार्फत लस देण्यात येणार आहे. ग्रामीण - शहरी भागात दि. 21 जानेवारी ते 23 जानेवारी व 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या दरम्यान घरोघरी जाऊन मुलांना लस दिली जाणार आहे. एकही बालक लसी पासून वंचित राहणार नाही असे नियोजन प्रशासनाने केले आहे. लसीकरणासाठी पुरेसे साहित्य उपलब्ध झाले आहे. जिल्हयातील सर्व नागरिकांनी आपल्या 5 वर्षाच्या बालकास 19 जानेवारी व 23 फेब्रुवारीला सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेच्या दरम्यान नजिकच्या पोलिओ बुथवर जाऊन पोलीओ डोस पाजवा असे आवाहन श्रीमती उगले यानी केले.
                 बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी केले.

                             * * * * * * * *

Monday, 13 January 2014

ई-टपाल सेवेचा सर्व सामान्य जनतेने लाभ घ्यावा : पालकमंत्री संजय सावकारे


ई-टपाल सेवेचा सर्व सामान्य जनतेने लाभ घ्यावा
                                                          : पालकमंत्री संजय सावकारे
  
चाळीसगाव, दिनांक 13 :- वेब बेस्ड ई-टपाल सेवेमुळे उपविभागीय अधिकारी चाळीसगाव या कार्यालयात येणारे व जाणारे संपुर्ण टपाल हे संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून आपण दाखल केलेल्या टपालाची सद्यस्थिती पहाण्यासाठी संकेतस्थळावर ही कार्यप्रणाली उपलब्ध होणार आहे. त्याचा सर्व सामान्य जनतेला मोठया प्रमाणात फायदा होणार असून या सेवेचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे कृषि राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.संजय सावकारे यांनी केले.
उप विभागीय कार्यालयातील ई-टपाल सेवेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रसंगी अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे ना.रामराव वडकुते, तालुक्याचे आमदार राजीव देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप देशमुख, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांच्यासह तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
 या कार्यप्रणालीमुळे कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता येऊन नागरिकांनी दाखल केलेल्या प्रत्येक पत्रव्यवहारात पारदर्शकता येणार असल्याने ख-या अर्थाने महसूल विभाग हा लोकाभिमूख होण्यास मदत होणार आहे. या प्रणालीचा वापर हा केवळ टपालापुरताच मर्यादीत न राहता महसूल व फौजदारी दाव्यांचीही सद्यस्थिती यावर आपल्याला पहायला मिळणार असल्याचे आमदार राजीव देशमुख यांनी सांगितले.
अवघ्या पाच महिन्यापुर्वी सुरु झालेल्या उप विभागीय कार्यालयात राबविण्यात येणारी ई-टपाल प्रणाली शासनाचे सुवर्ण जयंती राजस्व अभियानाबाबतचे उद्दिष्ट निश्चित कार्यसाधक ठरेल असा आशावाद जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी  व्यक्त केला असून टप्प्या-टप्प्याने संपुर्ण जिल्हयातील महसूल प्रशासनात या कार्यप्रणालीचा अवलंब केला जाईल असेही त्यांनी यावेळी  सांगितले.
ई-टपाल संगणकीय प्रणाली बद्दल माहिती देतांना उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी सांगितले की, सदर संगणकीय प्रणालीचा शुभारंभ तालुक्यातून होतांना मनस्वी आनंद होत आहे. ही संगणकीय प्रणाली सर्वसामान्य जनता व महसूल प्रशासनातील महत्वाचा दुवा ठरणार असून, आजतागायत 148 दाव्यांची माहिती या प्रणालीत समाविष्ट करण्यात आली आहे. लवकरच कार्यालयातील संपुर्ण माहितीचे संगणकीय प्रणालीत रुपांतर करण्यात येणार असल्याचे सांगून ही प्रणाली कार्यन्वित करण्यासाठी तालुक्याचे आमदार राजीव देशमुख व जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले असल्याचे सांगितले.
चाळीसगांव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.संजय नानकर यांनी संगणकीय प्रणालीबाबत प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, या प्रणालीमुळे सामान्य जनतेला निश्चीतच फायदा होऊन उप विभागीय अधिका-यांनी आधुनिक युगाची मुहर्तमेढ केल्याने त्यांचे अभिनंदन केले. व ही प्रणाली नियमीत अद्यावत ठेवण्याची विनंतीही केली.
प्रारंभी उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी पालकमंत्री ना.सावकारे व उपस्थितांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर प्रास्ताविक व आभार तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले.

                                   * * * * * * * * 

Sunday, 12 January 2014

राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत आ.राजीव देशमुख यांच्या हस्ते क्रिडा संकुलाचे भुमिपूजन


राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत
आ.राजीव देशमुख यांच्या हस्ते क्रिडा संकुलाचे भुमिपूजन
  
चाळीसगाव, जि. जळगाव, दिनांक 12 :- तालुक्यापासून देशपातळी पर्यंत मजल मारणारे क्रिडा पटू या तालुक्याने दिले असून क्रिडा प्रेमींना सरावासाठी उपयुक्त असे तालुका क्रिडा संकुल उभे रहावे अशी अनेक वर्षाची मागणी होती. आणि आज राष्ट्रीय दिनी चाळीसगांव तालुक्यातील खडकी शिवारात भव्य अशा क्रिडा संकुलाचे भुमिपूजन आमदार राजीव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
            यावेळी नगराध्यक्षा अनिता चौधरी, पंचायत समिती सभापती विजय जाधव, खडकीच्या सरपंच अलकानंद भंवर, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, गट विकास अधिकारी मालती जाधव, जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील, सार्वजानिक बांधकामचे जे.बी.मालविय यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित होते.
            आपल्या भाषणात आमदार देशमुख यांनी सांगितले की, तालुक्यातील क्रिडा प्रेमींची क्रिडा संकुलाची इच्छा पूर्ण होतांना मनस्वी आनंद होत आहे. या क्रिडा संकुलासाठीचा खर्च एकूण 1 कोटी 20 लाख मंजूर झाला असून या क्रिडा संकुलाच्या मंजूरीसाठी जिल्हाधिकारी व प्रशासनाचे सहकार्य देखील मोलाचे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. या क्रिडा संकुलाचे एकूण क्षेत्रफळ 2 हेक्टर 30 आर असून  क्रिडा संकुलामध्ये धावनपथ बांधणे, खो-खो मैदाने, कबड्डी मैदाने, व्हॉलीबॉल मैदाने अशा प्रकारची विविध मैदानांचा समावेश आहे, याचा तालुक्यातील सर्व क्रिडा प्रेमींना नक्कीच लाभ होईल. त्याच बरोबर या क्रिडा संकुलाच्या जागेसाठी खडकीच्या सरपंच अलकानंद भंवर यांनी ग्रामसभेत मंजूरीअंती जागा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
            मार्गदर्शनपर भाषणात खडकीच्या सरपंच अलकानंद भंवर यांनी आमदार राजीव देशमुख यांच्या प्रयत्नामुळेच तालुक्यात क्रिडा संकुल उभे राहत असल्याने त्यांचे आभार मानले. त्याच बरोबर खडकी ग्रामपंचायती लगत असलेल्या एम.आय.डी.सी. ला चालना देऊन जे उद्योग उभारण्यास गती मिळाली त्यामुळे मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याने आ.देशमुखांच्या विकास कामांबद्दल शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
            या कार्यक्रमास महानंदा चे संचालक प्रमोद पाटील, उपनगराध्यक्ष प्रदीप निकम, अजित देशमुख, बाजीराव दौंड, दिलीप चौधरी, महेंद्र पाटील, प्रशांत देशमुख, शिक्षण सभापती नगर परिषद रामचंद्र जाधव, निखील राठोड, दिपक पाटील, किशोर पाटील यांच्यासह मान्यवर व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजित देशमुख यांनी केले तर आभार रामचंद्र जाधव यांनी मानले.



आदर्श शेतक-यांच्या सन्मानाने कृषि प्रदर्शनाची सांगता
  
चाळीसगाव, जि. जळगाव, दिनांक 12 :- लोकनेत कै.अनिलदादा देशमुख यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत तालुक्यात दिनांक 09.01.2014 ते 12.01.2014 या कालावधीत भरविण्यात आलेल्या कृषि प्रदर्शनाची आज आदर्श शेतक-यांचा सन्मान करुन सांगता करण्यात आली. या समारोपाच्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी पालकमंत्री सतिष पाटील उपस्थित होते  तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी खा.वसंतराव मोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे होते.
            अध्यक्षीय भाषणात माजी पालकमंत्री म्हणाले की, स्मृती दिन, वाढ दिवस हे सर्वत्र साजरे होतांना दिसतात परंतु वडिलांच्या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांच्या स्मृतीदिनी शेतक-यांची तंत्रज्ञानाशी जोड घालून हरितक्रांती घडविण्यासाठीचे भव्य असे कृषि प्रदर्शन भरवून ख-या अर्थाने स्मृती दिन साजरा करण्याचा आमदार देशमुख यांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले. शेतक-यांची बांधिलकी जपणारा लोकनेता अनिलदादा देशमुख याच्या विचारांनी प्रेरीत होऊन आमदार राजीव देशमुख यांना विकास कामे करण्याची संधी या जनतेने उपलब्ध करुन दिली आणि त्यांचा सन्मान करुन आज ख-या अर्थाने आमदार देशमुख यांनी वारसारूपी मिळालेली संस्कृतीचे दर्शन या प्रदर्शनातून घडविले आहे.
            तालुक्याच्या प्रश्नांना ख-या अर्थाने न्याय देणारे नेतृत्व या तालुक्याला लाभले असून चाळीसगाव तालुका हा बेलगंगा साखर कारखाना, दुग्ध व्यवसाय व राष्ट्रीय मिल या उद्योगामुळे प्रसिध्द् होता. मात्र या तालुक्याने गमावलेले हे वैभव परत मिळविण्यासाठी सर्व पक्षांनी व जनतेने आमदार देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यास आमदार देशमुख हे या तालुक्याचे गमावलेले वैभव परत मिळविण्यास नक्कीच यशस्वी होतील अशी ग्वाही माजी खासदार वसंतराव मोरे यांनी आपल्या भाषणातून दिली.
            या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, जि.प.समाज कल्याण सभापती राजेंद्र राठोड, कांताताई मराठे, प्रदीप देशमुख, रोहिदास पाटील, जालम पाटील, प्रदीप निकम, महानंदाचे संचालक प्रमोद पाटील, रामचंद्र जाधव, आदि मानयवर उपस्थित होते.
            तालुक्यातील जवळपास 1 लाख शेतक-यांनी या भव्य अशा कृषि प्रदर्शनाचा लाभ घेतला असून शेतक-यांचाही त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाल्यामुळे या प्रदर्शनाचा उद्देश ख-या अर्थाने सफल झाल्याचा आनंद व्यक्त करीत आमदार देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.

                                   * * * * * * * *