जळगाव, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम आज दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता अल्पबचत भवन, जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात एकूण 73 अर्ज प्राप्त झाले.
उप माहिती कार्यालय, चाळीसगाव
छाया निवास, स्टेट बँक इमारत, भडगाव रोड, चाळीसगाव, जि.जळगाव.
Monday, 7 July 2025
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 73 अर्जांची नोंद
Friday, 4 July 2025
जळगाव जिल्हयात M-Sand (मॅन्युफॅक्वर्ड सेंड) प्रकल्प उभारणीसाठी प्रस्ताव मागविणे
जळगाव, दि. ४ जुलै (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्हयातील नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत शासन निर्णय क्रमांक गोखानि/10/0325/प्र.क्र.80/ख दोन दि. 23 में 2025 नुसार जळगाव जिल्हयात पर्यावरणपूरक व यांत्रिक पध्दतीने M-Sand उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांची आवश्यकता लक्षात घेता खालील अटी व शर्तोंच्या अधीन राहुन M-Sand प्रकल्प उभारणीस इच्छुक उद्योजक, संस्था अथवा कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
सदर प्रस्ताव सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक बाबी आहेत.
1. प्रकल्पाचे संपूर्ण स्वरूप व उदिष्ट
2. प्रकल्पासाठी सुचविलेल्या जागेचे वितरण व भू-संपत्ती बाबतचे कागदपत्र.
3. पर्यावरण परवानगी व संबंधित यंत्रणाकडून आवश्यक अनुमती.
4. यांत्रिक उपकरणे, प्रक्रिया व वार्षिक उत्पादन क्षमतेची माहिती.
5. संस्थेची आर्थिक व तांत्रिक पात्रता दर्शविणारे कागदपत्र
6. मागील संबंधित अनुभव असल्यास त्याचा तपशिल.
इतर अटी-
1. शासन निर्णय दि. 23 में 2025 मधील नियम व मार्गदर्शक तत्वे लागू राहतील.
2. अपूर्ण प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही.
3. अंतिम निर्णयाचा अधिकार जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे राहतील.
तरी, वरीलप्रमाणे सर्व बाबींची तसेच अटींची पुर्तता करून सदर प्रस्ताव आपले तालुक्यातील तहसीलदार /उपविभागीय अधिकारी / जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत. असे उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्र्यांच्या गटाची पहिली बैठक
नवी दिल्ली, दि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांचा गट (GoM) यांची वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक आज महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे पार पडली.
या बैठकीला महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री श्रीमती आदिती तटकरे, छत्तीसगड व पंजाबचे अर्थमंत्री आणि यांच्यासह नऊ राज्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर दोन राज्यांचे प्रतिनिधी आभासी पद्धतीने सहभागी झाले. आंध्र प्रदेश, गुजरात आणि तेलंगणा यांनी आपली सविस्तर सादरीकरणे सादर केली.
श्रीमती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, ही जीएसटी, आयजीएसटी आणि एसजीएसटी उत्पन्नासंबंधी पहिलीच बैठक होती. यापूर्वी मंत्र्यांच्या गटाच्या विविध मुद्द्यांवर बैठका झाल्या असल्या, तरी जीएसटी उत्पन्नावर केंद्रित अशी ही पहिली बैठक आहे. यावेळी तांत्रिक चर्चा मर्यादित राहिली, परंतु पुढील बैठकींमध्ये सर्व राज्यांकडून सखोल सूचना आणि चर्चा अपेक्षित आहे. महाराष्ट्र नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2025 मध्ये होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत आपले सादरीकरण करेल, त्यामुळे आजच्या बैठकीत महाराष्ट्राकडून सादरीकरण करण्यात आले नाही.
बैठकीत राज्यनिहाय महसूल प्रवृत्ती, आर्थिक घटकांचा प्रभाव, करचोरीविरोधी उपाय आणि धोरणात्मक शिफारशींवर सविस्तर चर्चा झाली. जीएसटी अंमलबजावणी समितीने (GIC) महसूल संकलन आणि करचोरीविरोधी साधनांचा आढावा घेतला. राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC), जीएसटी नेटवर्क (GSTN) आणि आंध्र प्रदेश, गुजरात व तेलंगणा यांनी एकसमान अंमलबजावणी आणि अनुपालन व्यासपीठ विकसित करण्यावर जोर दिला. करचोरीला प्रवण क्षेत्रांमधील समस्यांचे निराकरण, नोंदणी, ई-वेबिल आणि B2C अनुपालन यावरही लक्ष केंद्रित झाले. GIC ने पुढील बैठकीत या मुद्द्यांचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवले.
गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले, ही बैठक जीएसटी धोरणांना स्पष्ट दिशा देण्यासाठी आणि केंद्र-राज्य यांच्यातील आर्थिक समन्वय बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात 4 शिपाई पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी निविदा प्रक्रिया सुरु
जळगाव दि – 04 ( जिमाका ) : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव येथे शिपाई (बहुउद्देशीय गट-ड कर्मचारी) या कंत्राटी स्वरूपातील पदांच्या भरतीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. एकूण ४ रिक्त पदे ही ११ महिन्यांच्या कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. ही भरती प्रक्रिया कंत्राटदार/ठेकेदार/कंपनी/संस्
यापदाकरिता उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण, पदवीधर असल्यास प्राधान्य. चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. तसेच शासकीय/निमशासकीय कार्यालयात सेवा पुरवण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे बयाणा रक्कम (EMD) : ₹५,०००/- राष्ट्रीयीकृत बँकेच्या डिमांड ड्राफ्ट / पे-ऑर्डरद्वारे करण्यात येणार आहे. कागदपत्रांमध्ये जीएसटी, ईपीएफ, ईएसआयसी, व्यवसाय कर नोंदणी प्रमाणपत्र, तीन वर्षांचे ITR, पॅन कार्ड प्रत, संस्थेची नोंदणी प्रत, काळ्या यादीत नसल्याचे शपथपत्र, अनुभवाचे पुरावे इ. आवश्यक आहे.
निविदा प्रक्रियेतील अटी व शर्ती संबंधित संस्थांनी काळजीपूर्वक वाचून, दोन्ही लिफाफ्यांत (तांत्रिक आणि आर्थिक) आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करावीत. निविदा स्वीकारल्यानंतर ३% रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करावी लागेल.
निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असून, त्यानंतर आलेल्या निविदा कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.या भरती प्रक्रियेसाठी जळगाव विभागातील पात्र ठेकेदार, कंपन्या, संस्था यांनी तत्काळ निविदा सादर
करावी, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त, जळगाव विभाग, जळगाव यांच्या कार्यालयातून करण्यात आले आहे.
भुसावळ तालुक्यात ८ जुलै रोजी सरपंच पद आरक्षणासाठी सोडत सभा
जळगाव दि – 04 ( जिमाका ) : भुसावळ तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाबाबतची सोडत सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गनिहाय आरक्षणासाठी दिनांक ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
त्यानंतर, महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत सभा ९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता घेण्यात येणार आहे. या दोन्ही सभा तापी सभागृह, उपविभागीय अधिकारी भुसावळ कार्यालय, भुसावळ येथे पार पडणार आहेत.
या महत्वपूर्ण आरक्षण सोडत प्रक्रियेसाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव दि – 04 ( जिमाका ) : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा पुढील प्रमाणे, शनिवार दिनांक 05 जुलै, 2025 रोजी दुपारी 02.00 वाजता भुसावळ येथुन शासकीय वाहनाने ता. मंगळवेढा जि. सोलापुरकडे रवाना.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव, दि. 04 जुलै (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आज, शुक्रवार दिनांक 04 जुलै 2025 रोजी जळगाव जिल्हा दौरा होत आहे.
शुक्रवार दिनांक 04 जुलै 2025 रोजी दुपारी 02.00 वाजता मुंबई येथून मोटारीने जळगावकडे प्रयाण करतील. रात्री 08. 30 वाजता पाळधी (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथे आगमन व राखीव.