Tuesday, 30 July 2013

शेतक-यांच्या दारात कृत्रिम रेतन योजना



           जळगांव, दि. 30 :- 12 व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत जळगांव जिल्हयातील शेतक-यांच्या दारात कृत्रिम रेतन सुविधा पुरवणे कामी तालुकानिहाय 10 रिक्त केंद्रासाठी पशुवैद्यकीय पदवीधर / पदवीकाधारक सुशिक्षीत बेरोजगार यांची नेमणूक करावयाची आहे. पशुवैद्यकीय पदवीधर / पदवीकाधारक या आर्हतेचे तांत्रिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास 10 / 12 वी उमेदवारांची सेवादाता म्हणून निवड करण्यात येणार आहे.  तरी इच्छूक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक अर्हता व इतर अनुशंगीक कागदपत्रांसह अर्ज पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती संबधीत तालुका किंवा पशुधन विकास अधिकारी, जिल्हा कृत्रिम रेतन केंद् महाबळ रोड, जळगांव यांच्या कार्यालयात तात्काळ सादर करावा. 10 / 12 वी इच्छूक उमेदवारांना कृत्रिम रेतन कार्याचे प्रशिक्षण देऊन सेवादाता म्हणून नेमणूक करण्यात येईल.
            सेवा पुरविण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत. जळगांव - वडनगरी, धानवड, शिरसोली भडगांव - वडजी, अचलगांव, अंमळनेर - रडावन, हिंगोणे खु . मंगरुळ, भुसावळ - फेकरी, पारोळा - पिंपळकोठा

Monday, 29 July 2013

सामाजिक न्याय विभागामार्फत ई- स्कॉलरशीप संदर्भातील माहितीसाठी सभांचे आयोजन



           जळगांव, दि. 29 :- जिल्हयातील सर्व कनिष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयांना सामाजिक न्याय विभागाने दिनांक 20 जुलै 2010 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्याना त्यांना देय असणारी भारत सरकार शिष्यवृत्तीची शिक्षणशुल्क व परिक्षा शुल्काची रक्कम ही ऑनलाईन देण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. म्हणून सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण जळगांव यांनी ई-स्कॉलरशीप संदर्भात सन 2013-14 या शैक्षणिक वर्षासाठी खालील प्रमाणे सभेचे आयोजन केलेले आहे.
             दिनांक 30 जुलै 2013 रोजी वेळ सकाळी 11.00 वाजता प्राचार्य, एम. जे.  कॉलेज जळगांव येथे जिल्हयातील जळगांव, चोपडा, एरंडोल, चाळीसगांव, धरणगांव, पाचोरा, पारोळा, अंमळनेर, भडगांव या तालुक्यातील प्राचार्य यांनी उपस्थित रहावे.
            दिनांक 31 जुलै 2013 रोजी वेळ सकाळी 11.00 वाजता प्राचार्य श्री. जे. टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फैजपूर ता. यावल जि. जळगांव येथे भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, यावल, जामनेर, बोदवड या तालुक्यातील प्राचार्य यांनी उपस्थित रहावे. असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जळगांव यांनी कळविलेले आहे.

शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे



        जळगांव. दि. 29 :- सामाजिक न्याय क्षेत्रात काम करणा-या संस्थांना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने शाहु, फुले, आंबेडकर पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. यासाठी जळगांव जिल्हयातील सामाजिक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
         पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविणा-या संस्थेने समाजातील अतिशय दुर्बल व मागासवर्गीय घटकातील व्यक्ती व समाजासाठी सेवा, शिक्षण, आरोग्य, पुर्नवसन , रोजगार, अशा व यासारख्या व्यक्तीगट व सामुहिक क्षेत्रामध्ये एकमेव अव्दीतीय कार्य केलेले असले पाहिजे. संस्था वरील क्षेत्रामध्ये 15 वर्षापेक्षा अधिक वर्ष कार्यरत असली पाहीजे या इतर अटीची पुर्तता करणा-यां संस्थांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे . तेव्हा संस्थांनी दिनांक 6 ऑगस्ट 2013 पर्यत प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जळगांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदीराजवळ, महाबळ, जळगांव या कार्यालयाकडे तीन प्रतीत प्रस्ताव सादर करावा. उशिरा येणारे प्रस्ताव स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी असे श्री. व्ही. ए. पाटील, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, जळगांव यांनी कळविले आहे

उच्च माध्यमिक प्रमाणापत्र ( इ. 12 वी) परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन सादर करावयाच्या तारखा घोषित



         जळगांव, दि. 29 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेमार्फत सप्टें. / ऑक्टो. 2013 मध्ये घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. 12 वी ) परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, नांव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या काही तांत्रिक अडचणीमुळे त्यामध्ये अंशत: बदल करण्यात आला असून बदललेल्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.
          नियमित शुल्कासह विद्यार्थ्यानी शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पध्दतीने विहीत शुल्कासह आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखा शुक्रवार दिनांक 19 जुलै ते बुधवार        दि. 31 जुलै 2013 , शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा शुल्क भरणे व चलनाची माहिती अपलोड करणे गुरुवार दि. 1 ऑगस्ट ते शनिवार दि. 3 ऑगस्ट 2013
          विलंब शुल्कासह गुरुवार दि. 1 ऑगस्ट ते मंगळवार दि. 6 ऑगस्ट 2013  शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा शुल्क व चलनाची माहिती अपलोड करणे बुधवार दि. 7 ऑगस्ट ते शनिवार दि. 10 ऑगस्ट 2013
          तरी सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यानी आवेदनपत्र भरण्यासाठी संबंधित शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांच्याशी संपर्क साधावा. सर्व शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक / प्राचार्य यांना कळविण्यात येते की, त्यांनी पूर्वी कळविलेल्या संकेतस्थळाऐवजी  www.mahahsscboard.in या मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यात यावीत. असे सचिव राज्य मंडळ, पुणे  यांनी कळविले आहे.

Saturday, 27 July 2013

मागासवर्गीयांच्या विकास योजना तळागाळापर्यत पोहोचवाव्यात- पालकमंत्री संजय सावकारे



जळगांव, दि. 27:- समाजातील तळागाळातील मागासवर्गीयांचा विकास व्हावा यासाठी सर्व यंत्रणांनी प्रथमत: योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यत पोहोचावी असे आवाहन पालकमंत्री तथा कृषी राज्यमंत्री संजय सावकरे यांनी आज भुसावळ येथे जिल्हा परिषद स्तर समाजकल्याण अतर्गत 20 टक्के निधी व महिला बाल कल्याण 10 टक्के निधी सन 2012-13 अंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजने अंतर्गत मंजूर लाभार्थ्याना साहित्य वाटप  कार्यक्रमाच्या केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती भुसावळच्या  सभापती श्रीमती मंदाकीनी झोपे उपस्थित होत्या.
            भुसावळ येथे योजना निहाय मंजूर लाभार्थी संख्या पुढीलप्रमाणे
20 टक्के समाजकल्याण अंतर्गत  शेवाई मशीन 2, मंडप साहित्य 4, भजनी मंडळ सात्यि 2, एच. डी. पी. ई. पाईप 8, पन्हाळी पत्रे 5, ताडपत्री 19
 10 टक्के महिला बालकल्याण - मिनी पिठाची चक्की 10
              यावेळी बोलतांना पालकमंत्री सावकारे  पुढे म्हणाले की, मागासवर्गीय व दलित लोकांना आधी शिक्षण देऊन त्यांना सहकार्य केल्यास त्यांच्या विकासाच्या विविध् विकास योजनांची माहिती मिळेल त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. समाज शिक्षित झाल्यावरच त्यांची प्रगती होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन गट विकास अधिकारी आर . पी. तायडे यांनी केले. 

Thursday, 25 July 2013

विज ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महावितरण तर्फे रॅलीचे आयोजन


विज ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी
महावितरण तर्फे रॅलीचे आयोजन

चाळीसगांव दिनांक 25 :- मानवी गरजांमध्ये आज विजेला अनन्य महत्व प्राप्त झाले असुन विजेची बचत ही काळाची गरज आहे. विज वाचवा राष्ट्र वाचवा, विज ही विकासाची जननी आहे, विज चोरी थांबवा भारनियमन टाळा अशा घोषणा देत महावितरण तर्फे आज तहसिल कार्यालयापासुन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन तहसिलदार बी.एन.गाढवे यांचे हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले. या रॅलीचा तहसिल कार्यालय, स्टेशन रोड मार्गे सिग्नल पॉईंट, बस स्टॅण्ड, कॅप्टन कॉर्नर मार्गे महावितरणच्या लक्ष्मी नगर येथील विभागीय कार्यालयाजवळ समारोप करण्यात आला.
या समारोपाच्या कार्यक्रमात तहसिलदार गाढवे म्हणाले की, महसुल वाढीसाठी ग्राहकांबरोबर महावितरण तर्फे देखील सुसंवाद साधणे गरजेचे असुन विज चोरीमुळे होणा-या अपघातांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या रॅलीचे आयोजन करण्याची चांगली प्रथा या माध्यमातुन सुरु झाली आहे. ग्राहकांना चांगली सेवा देणे हे आपले आद्य कर्तव्य समजुन ग्राहक महावितरण मध्ये कौटुंबिक वातावरण निर्मीती या माध्यमातुन नक्कीच होईल असे सांगुन ग्राहकांनी देखील या उपक्रमाचा लाभ घ्यावा महावितरणास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणातुन जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक प्रदिपदादा देशमुख म्हणाले की, प्रशासन-शासन कायदा या पलीकडे जाऊन लोकसहभागातुन विज चोरी थांबविण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असुन विज ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महावितरणाच्या या रॅली आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. विज निर्मीती विज वितरणामधील तफावत वाढल्यामुळेच आपल्याला भारनियमनाला सामोरे जावे लागते, करिता विजेची बचत सुयोग्य वापर किती महत्वाचा असुन विज निर्मीती ही नैसर्गीक संपत्तीवर आधारीत आहे त्या विजेचे महत्व प्रत्येकाने ओळखले पाहिजे विजेचा काटकसरीने वापर केला पाहिजे असे त्यांनी आपल्या भाषणातुन सांगितले.
महावितरणचे कार्यकारी अभियंता धनंजय मोहोड म्हणाले की, ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी महावितरण कटीबध्द् असुन विज चोरी, विज गळती, अपघात भारनियमन या विषयक विज ग्राहकांमध्ये जनजागृती होण्याचा प्रमुख उद्देश या रॅलीच्या आयोजनाचा असुन विभागातील संपुर्ण सदोष विज मिटर बदलविण्याचा उपक्रम महावितरण तर्फे राबविण्यात येणार आहे. करिता ग्राहकांनी देखील या उपक्रमात सहभागी होऊन आपले सदोष मिटर बदलविण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले महावितरण तर्फे ग्राहकांना देण्यात येणा-या विविध सेवा विषयक माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी पोलीस प्रशासनाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंबाट, उप निरीक्षक वाघ तर महावितरणचे विविध पदाधिकारी आदिंनी मार्गदर्शनपर भाषणे केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक अभियंता धिरज चव्हाण तर आभार प्रदर्शन ईश्वर पाटील यांनी केले. सदर रॅली यशस्वी करण्याकरिता कनिष्ट अभियंता गणेश अस्मार, राहुल कुलकर्णी, उन्नत जगताप, प्रताप सपकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी नगराध्यक्षा अनिता चौधरी, उपनराध्यक्ष प्रदीप निकम, सहायक पोलीस निरीक्षक देवरे, ग्राहक प्रतिनीधी श्रीकृष्ण पाईप इंडस्ट्रीजचे संचालक प्रदीप अमृतकर यांच्यासह महावितरणचे सर्व अधिकारी कर्मचारी वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.
* * * * *

नवीन वाहन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरु



                   जळगांव, दि. 25 :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांत मोटार सायकल नवीन नोंदणी एमएच -19/बीएस-0001 ते 9999 पर्यतची मालिका लवकरच सुरु करण्यांत येणार आहे.
                   ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी  दाखल करावेत, व विहीत शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरु झाल्यावर करुन आकर्षक  व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करुन घ्यावेत. तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहन 30 (तीस) दिवसाचे आत नोंदणी करुन कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. 30 दिवसाचे आत वाहन नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क हस्तांतरीत किंवा परतावा होणार नाही. त्या रकमेचा परत वापरही होउ शकणार नाही,
              मालिका सुरु झाल्यावर अर्ज स्विकारले जातील. दररोज प्राप्त होणारे अर्ज दुपारी 4-00 वाजेपर्यत स्विकारले जातील व त्याच दिवशी अर्जाची छाननी करण्यात येईल एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास खालील पध्दतीने क्रमांक जारी करण्यात येतील.
            दुस-या दिवशी सर्व अर्जदारांनी क्रमांकाचे मुळ शुल्क व वाढीव शुल्क असे दोन धनादेश बंद लिफाप्यातून सादर करणे बंधनकाकर राहील. दुस-या दिवशी दुपारी 4-00 वा बंद लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रक्कमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरीत धनादेश परत करण्यात येतील. अर्ज प्राप्त झालेल्या अर्जदारांना अर्ज केलेल्या दिनांकाच्या दुस-या दिवशी पैसे भरुन क्रमांक देण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगांव यांनी कळविले आहे.

Monday, 22 July 2013

सैन्य व पोलीस दलासाठी भरतीपूर्व प्रशिक्षण



          जळगांव, दि. 22 - जळगांव जिल्हयातील सैन्य व पोलीस दलात भरती होऊ इच्छिणा-या युवकांसाठी त्यांच्या पात्रतेप्रमाणे व कमीत-कमी खर्चात प्रशिक्षण देऊन भरती योग्य बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन अंगिकृत असलेल्या माजी सैनिक महामंडळाव्दारे करंजे नाका, सातारा येथे प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. येथे 30 दिवसांचे 98 वे प्रशिक्षण शिबीर दिनांक 30 जुलै 2013 ते 28 ऑगस्ट 2013 या कालावध्णीत चालविले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी निवास व भोजनासह एकूण शुल्क रु. 6000/- आकारले जाते. तरी इच्छूक उमेदवारांनी ( 10 वी ते 12 वी पास असल्याचे गुणपत्रक (मार्कशिट) लिव्हींग सर्टिफिकेट) शैक्षणिक प्रमाणपत्रांसह निवड चाचणीसाठी 26 जुले 2013 तारखेला सकाळी 9.00 वाजता सैनिकी मुलांचे वसतीगृह, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगांव येथे हजर रहावे. चाचणी नंतर पात्र ठरलेल्या युवकांना सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल. प्रवेश शुल्क रक्कम रुपये 200/- त्वरीत भरुन उमेदवाराने आपला प्रवेश निश्चित करावा. या प्रशिक्षण केंद्रामध्ये पात्र विद्यार्थ्याकडून सैन्यात भरती होण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करुन घेतली जाते. यात शारिरीक चाचणीमध्ये रनिंग,मैदानी खेळ, पुलप्स, लॉग जम्प, गोळाफेक इत्यादी तसेच इतर विषयांमध्ये लेखी परीक्षेसाठी जनरल नॉलेज, इंग्रजी, गणित या विषयांची तयारी करुन घेतली जाते. तरी जळगांव जिल्हयातील युवकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कॅप्टन मोहन कुलकर्णी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.

Saturday, 20 July 2013

जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सार्वजनिक सुटीत स्वीकारणार



          जळगांव, दि. 20 :- संशोधन अधिकारी, विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे यांचे कार्यालयाचे वतीने कळविण्यात येते की, दिनांक 18 मे 2013 च्या शासन निर्णयानुसार सर्व मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. तसेच मागासवर्गीय अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांचे जाती दाव्याबाबतचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव संबधित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दिनांक 31 जुलै 2013 पर्यत जमा करुन सदरची पोच पावती संबंधित कार्यालयाच्या आस्थापनेच्या विभाग प्रमुखाकडे जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत.
           त्याअनुषंगाने शासकीय अधिकारी  / कर्मचारी यांची गैरसोय टाळण्यासाठी समितीच्या अधिनस्त असलेल्या सेतू सुविधा केंद्रामार्फत अधिकारी / कर्मचारी यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सकाळी 8.30 ते सायं.  7 पर्यत तसेच सार्वजनिक सुटी (शनिवार व रविवार) या दिवशी सुध्दा स्विकारले जातील याची सर्व मागासवर्गीय अधिकारी / कर्मचारी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन श्री. राकेश जी. पाटील संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक क्र. 2 मुख्यालय, धुळे यांनी कळविलेले आहे.             

Friday, 19 July 2013

6149 शेतक-यांना पीक विम्यापोटी 6.74 कोटी मंजूर



          जळगांव, दि. 19 – जळगांव सन 2012-2013 मध्ये शासनाने खरीप हंगामासाठी कापूस, ज्वारी, बाजरी, उडीद, मुग, सोयाबीन, तुर, कांदा या पिकांसाठी राष्ट्रीय कृषि पीक विमा योजना राबविली होती त्यानुसार खरीप 2012 मध्ये पीक विमा उतरवलेल्या 6149 शेतक-यांना राष्ट्रीय कृषि पिक विमा योजनेतून 6.74 कोटी नुकसान भरपाई जळगांव जिल्हयासाठी निश्चित झालेली असून जाहीर झालेली आहे.
              नुकसानग्रस्त कापूस उत्पादक सर्वाधिक 6149 उत्पादकांना 6.74 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. या शिवाय बाजरी व ज्वारी आदी पिकांनाही नुकसान भरपाई मिळणार आहे. सर्वाधिक कापूस पिकासाठी जामनेर तालुक्यातील 1598 उत्पादकांना 2 कोटी 23 लाख 85 हजार, जळगांव तालुक्यातील 1443 उत्पादकांना 1 कोटी 26 लाख, चाळीसगांव तालुकयातील 1054 उतपादकांना 1 कोटी 12 लाख 22 हजार, एरंडोल तालुक्यातील 678 उत्पादकांना 56 लाख 65 हजार, धरणगांव तालुक्यातील 578 उत्पादकांना 94 लाख 40 हजार, पारोळा तालुक्यातील 273 उत्पादकांना 12 लाख 73 हजार, पाचोरा तालुका 128 उत्पादकांना 31 लाख 87 हजार, बोदवड तालुक्यातील 385 उत्पादकांना 23 लाख 80 हजार नुकसान भरपाई मिळणार आहे.
          या वर्षी पीक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2013 आहे. तरी शेतक-यांनी नजीकेच बॅकेत किंवा आपले खाते आहे त्याठिकाणी वीमा हप्ता भरण्याची कार्यवाही करावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जळगांव यांनी केले आहे.

सन 2014 -15 साठी नवीन शाळा सुरु करण्यासाठी व दर्जावाढ करण्यासाठी अर्ज करावेत



            जळगांव, दि. 19 :- सन 2014-15 या शैक्षणिक वर्षाकरिता सर्व माध्यमाच्या नवीन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना परवानगी देण्याकरीता व विद्यमान शाळांचा दर्जा वाढ करण्यासाठी नोंदणीकृत संस्थांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. स्वयंअर्थसहाय्यित शाळा ( स्थापना व विनियमन) अधिनियम 2012 तसेच दिनांक 2 जुलै 2013 चा अध्यादेश शासनाच्या खालील संकेत स्थळावर उपलबध करुन देण्यात आला आहे.
                  www.depmah.com , www.mahdoesecondary.com, www.msbshse.ac.in  त्याचप्रमाणे सदर अधिनियमाची तसेच अध्यादेशाची प्रत शिक्षणाधिकारी  (प्राथमिक  / माध्यमिक ) यांचे कार्यालयात पाहण्यास उपलब्ध होईल. सदर अधिनियमामध्ये विहित नमुन्याचा अर्ज व अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी देण्यात आलेली आहे. नवीन शाळा मान्यतेकरीता व अस्तित्वात असलेल्या शाळांचा दर्जा वाढ करण्यासाठी अर्ज करु इच्छिणा-या संस्थांनी विहित प्रपत्रामध्ये आपला अर्ज उपरोक्त अधिनियम तसेच दिनांक 2 जुलै 2013 च्या अध्यादेशातील सुधारणा / दुरुस्त्या विचारात घेऊन www.school.maharashtra.gov.in/sfc या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरुन व त्यासोबत रुपये 5 हजार चलनाव्दारे विहित लेखाशिर्षामध्ये जिल्हा कोषागारामध्ये जमा करुन दिनांक 31 जुलै 2013 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यत ऑनलाईन पध्दतीने भरलेला अर्ज, चलनाची मूळ प्रत व अर्जासोबत जोडावयाच्या कादपत्रासह संबंधित शिक्षणाधिकारी  (प्राथमिक / माध्यमिक) यांचेकडे समक्ष सादर करावेत. लेखी स्वरुपातील तसेच पोष्टावदारे / कुरिअरने पाठविलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. त्याचप्रमाणे सदरचा अर्ज सादर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार  नाही, असे शिक्षण संचालक (माध्यमिक  व उच्च माध्यमिक ) यांनी कळविले आहे.

Wednesday, 17 July 2013

शासकीय कार्यालयातील लेखा लिपीकांचे प्रशिक्षण



              जळगांव. दि.  17 -  वित्त विभागांतर्गत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत महाराष्ट्र लेखा लिपिक प्रशिक्षण सत्र क्र 80 हे दिनांक 22 जुलै 2013 ते 25 सप्टेबर 2013 (50 दिवस) या कालावधीत घेण्यात येणार आहे सदर प्रशिक्षणासाठी 15 मोडयुल्सप्रमाणे निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी जळगांव यांच्या कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे
           या प्रशिक्षण सत्रासाठी कोणत्याही इच्छूक कर्मचा-यांस प्रवेश देण्यात येईल सदर प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे बंधनकारक नसून इच्छेनुसार विशिष्ट मोडयुल्सना देखील प्रवेश घेण्याची मुभा कर्मचारी यांना असेल त्या अनुषंगाने नाशिक विभागातील जळगांव जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांना त्यांच्याकडील लिपीकवर्गीय कर्मचारी यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे आवाहन श्री एस एन औताडे, सहसंचालक, लेखा व कोषगारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी केले आहे

युवतींसाठी शाळा व महाविद्यालयातील क्रीडांगणे राखीव ठेवावीत



         जळगांव, दि. 17 :- सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडांगणे युवतींसाठी आठवडयातून विशिष्ट दिवशी राखीव ठेवण्यात यावीत, असे शासनस्तरावरुन कळविण्यांत आलेले आहे.
          सध्या जी क्रीडांगणे उपलब्ध आहेत, त्यांची संख्या पुरेशी नाही आणि जी आहेत तिथे मुले अधिक काळ खेळत असतात. सबब, युवतींना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होत नाहीत.
           त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयात युवतींसाठी आठवडयातील निवडक दिवस क्रीडांगण राखीव ठेवण्यात यावे, जेणेकरुन युवतीही मनसोक्तपणे क्रीडांगणाचा वापर करु शकातील.
               सदर बाबीचा अहवाल शासनास सादर करावयाचा असल्याने आपल्या शाळा / महाविद्यालयातील उपलब्ध क्रीडांगणे, उपलब्ध सोयी - सुविधा व कोणत्या दिवशी क्रीडांगण युवतींसाठी राखीव ठेवणार आहात, याचा अहवाल उलट टपाली तात्काळ या कार्यालयास सादर करावा , असे आवाहन जिल्हा क्रीड अधिकारी, सुनंदा पाटील यांनी केले आहे.

Tuesday, 16 July 2013

12 वी सप्टेंबर ऑक्टोंबर परिक्षा फार्म ऑनलाईन भरावे



               जळगांव, दि  15 :- महाराष्ट्र  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक  विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य / मुख्यापकांना कळविण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ 12 वी
 परीक्षा सप्टेंबर - ऑक्टोंबर 2013 परीक्षेचे पुनर्परीक्षार्थी, खाजगी व श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्याचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने दिनांक 19 ते 25 जुलै 2013 नियमित शुल्कास व 26 ते 31 जुलै 2013 विलंब शुक्लासह आपल्याच कनिष्ठ महाविद्यालयात मंडळाच्या वेबसाईटवर भरावयाचे आहेत याची सर्व विद्यार्थी, पालक व  कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक / प्राचार्यानी नोंद घ्यावी
           कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यासाठीच्या आवश्यक सूचना, सॉफटवेअरची सी डी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाचा लॉग-इन आयडी आणि पासवर्ड  व इतर माहितीचे पत्र कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळामार्फत मंगळवार दिनांक 16 जुलै 2013 रोजी मंडळाच्या निर्धारित वितरण केंद्रावर सकाळी 11-00 ते 5-00 वाटप करण्यात येणार आहे याची सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक / प्राचार्यानी नोंद घेवून आपला जबाबदार प्रतिनिधी अधिकारपत्रासह उपयेक्त दिनांकास निर्धरित वाटप केंद्रावर साहित्य घेण्यास पाठवावा असे विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक 1 यांनी कळविलेले आहे

Monday, 15 July 2013

बेरोजगार युवकांसाठी 50 टक्के अनुदानावर शेळी व बोकड गटाचे वाटप



               जळगांव, दि 15 :- जळगांव जिल्हयामध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत 40 शेळी व 2 बोकड गटाची वाटप योजना सन 2013 - 2014 या वर्षात राबविण्यांत येणार आहे
              सदरील योजना 50 टकके अनुदानावर राबविण्यांत येणार असून एक गटाची किंमत रु  300,000/- योजनेचा लाभ्‍ सर्व प्रवर्गासाठी खुला असून जळगांव जिल्हयातील अवर्षण प्रवण क्षेत्रग्रस्त असलेल्या 7 तालुक्यांमध्ये मुक्ताईनगर, अंमळनेर, चाळीसगांव, पारोळा, पाचोरा, जळगांव, जामनेर राबविण्यात येणार आहे लाभार्थी निवड सर्व प्रवर्गातील बेरोजगार युवकांचीच प्राधान्याने निवड करण्यांत येणार आहे यामध्ये 30 टक्के महिला व 3 टक्के विकलांग लाभार्थ्याना प्राधान्य देण्यात येईल.
               या योजनेसाठीचे अर्ज संबंधित तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिती यांचेकडे दिनांक 5 ऑगस्ट 2013 पर्यतच स्विकारण्यांत येणार आहे अर्ज भरण्यासाठी संबंधितांना आवश्यक कागदपत्रांची माहिती व विहित नमुन्यांतील अर्ज पंचायत समिती येथे उपलब्ध होतील अशा प्रकल्प योजनेसारखा व तत्सम व्यक्तीगत लाभाचा पूर्वी लाभार्थीने लाभ घेतला असेल तर या प्रकल्पा अंतर्गत लाभ्‍ अनुज्ञेय राहणार नाही
               या प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या लाभार्थींना सर्व प्रथम स्वहिस्याचे रक्कमेतून शेळी गटाचे निवा-याचे बांधकाम व इतर मुलभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक रहिल लाभार्थीने शेळी गटाची खरेदी ही महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांचे प्रक्षेत्रावरुनच करणे आवश्यक राहील असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जळगांव योनी कळविले आहे

शासकीय कार्यालयातील लेखा लिपीकांचे प्रशिक्षण



              जळगांव. दि. 15-  वित्त विभागांतर्गत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत महाराष्ट्र लेखा लिपिक प्रशिक्षण सत्र क्र 80 हे दिनांक 22 जुलै 2013 ते 25 सप्टेबर 2013 (50 दिवस) या कालावधीत घेण्यात येणार आहे सदर प्रशिक्षणासाठी 15 मोडयुल्सप्रमाणे निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी जळगांव यांच्या कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे
           या प्रशिक्षण सत्रासाठी कोणत्याही इच्छूक कर्मचा-यांस प्रवेश देण्यात येईल सदर प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे बंधनकारक नसून इच्छेनुसार विशिष्ट मोडयुल्सना देखील प्रवेश घेण्याची मुभा कर्मचारी यांना असेल त्या अनुषंगाने नाशिक विभागातील जळगांव जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांना त्यांच्याकडील लिपीकवर्गीय कर्मचारी यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे आवाहन श्री एस एन औताडे, सहसंचालक, लेखा व कोषगारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी केले आहे

Friday, 12 July 2013

जामनेर व भडगांव तालुक्यातील माजी सैनिकांची बैठक



            जळगांव, दि. 12 :- जामनेर व भडगांव तालुक्यातील सर्व माजी सैनिक / विधवा व त्यांचे अवलंबितांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता गठीत केलेल्या समितीची बैठक बुधवार दिनांक 17/7/2013 रोजी  सकाळी 11.30 व गुरुवार दिनांक 19/7/2013 रोजी सकाळी 11.30 वा. तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केलेली आहे. तरी संबंधित तालुक्यातील माजी सैनिक / अवलंबितांनी बैठकीस उपस्थित रहावे.  त्यांच्या अडीअडचणी लेखी स्वरुपात दोन प्रतीत आणव्या व बैठकीस हजर राहून आपले प्रकरण तहसिलदारांना पुढील कार्यवाहीसाठी सादर करावे असे आवहन कॅप्टन मोहन कुलकर्णी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.
                                                                00000

वृत्त क्रमांक -480                                                                          दिनांक -12 जुलै 2013

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे अर्ज ऑन लाईन भरावे
             जळगांव, दि. 12 :- जळगांव जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य / मुख्याध्यापक यांना कळविण्यात येते की, सामाजिक न्याय विभाग जिल्हा परिषद जळगांव या कार्यालयामार्फत इयत्ता 5 वी ते 10 वी तील अनु-जाती व विमुक्त जाती, भटक्या जमाती या संवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते. सदर योजना ऑनलाईन करण्यात आली असून या योजनेच्या अर्जाचा नमुना तसेच इतर महत्वाच्या सूचना https;//; mahaeschol.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  शाळेतील विद्यार्थीनींचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी ही शाळेचे प्राचार्य / मुख्याध्यापक यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. याची नोंद सर्व प्राचार्य / मुख्याध्यापक यांनी घ्यावी, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांनी कळविले आहे.