Wednesday, 10 July 2013

राज्यस्तरीय प्राणी कल्याण मंडळाची पुर्नरचना



           जळगांव, दि. 10 :- कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई 32 यांचेकडील पत्रानुसार महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाची पुर्नरचना करणेसाठी अशासकीय सदस्यांची नांवे त्यांच्या बायोडाटा व इच्छापत्र मागविण्यांत येत आहे.
             राज्य प्राणी कल्याण मंडळाची पुर्नरचना करतांना त्यामध्ये खालीलप्रमाणे अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याचे नियोजन आहे.
            प्राणी कल्याणाचे काम करणा-या व्यक्ती 4 प्रतिनिधी, एस. पी. सी. ए. अंतर्गत काम करणा-या व्यक्ती 2 प्रतिनिधी, खाजगी पशुचिकित्सा व्यवसायी 1 प्रतिनिधी
            तरी जळगांव जिल्हयातील वरीलप्रमाणे कोणी इच्छूक व्यक्ती असल्यास, त्यांनी इच्छापत्र, त्यांचा संपूर्ण बायोडाटा इत्यादी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, महाबळ कॉलनी रोड, जळगांव या कार्यालात पाठवावी. असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जळगांव यांनी कळविले आहे.     

No comments:

Post a Comment