जळगांव, दि. 29 :-
जिल्हयातील सर्व कनिष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयांना सामाजिक न्याय विभागाने
दिनांक 20 जुलै 2010 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्याना
त्यांना देय असणारी भारत सरकार शिष्यवृत्तीची शिक्षणशुल्क व परिक्षा शुल्काची
रक्कम ही ऑनलाईन देण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. म्हणून सहाय्यक आयुक्त,
समाजकल्याण जळगांव यांनी ई-स्कॉलरशीप संदर्भात सन 2013-14 या शैक्षणिक वर्षासाठी
खालील प्रमाणे सभेचे आयोजन केलेले आहे.
दिनांक 30 जुलै
2013 रोजी वेळ सकाळी 11.00 वाजता प्राचार्य, एम. जे. कॉलेज जळगांव येथे जिल्हयातील जळगांव, चोपडा,
एरंडोल, चाळीसगांव, धरणगांव, पाचोरा, पारोळा, अंमळनेर, भडगांव या तालुक्यातील
प्राचार्य यांनी उपस्थित रहावे.
दिनांक 31 जुलै
2013 रोजी वेळ सकाळी 11.00 वाजता प्राचार्य श्री. जे. टी. महाजन कॉलेज ऑफ
इंजिनिअरिंग फैजपूर ता. यावल जि. जळगांव येथे भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, यावल,
जामनेर, बोदवड या तालुक्यातील प्राचार्य यांनी उपस्थित रहावे. असे सहाय्यक आयुक्त,
समाजकल्याण, जळगांव यांनी कळविलेले आहे.
No comments:
Post a Comment