राज्यस्तरीय
नवोपक्रम स्पर्धा 30 नोव्हेंबर पूर्वी प्रस्ताव मागविले
जळगाव, दि. 30 :- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण् परिषदेमार्फत सन 2014 - 15 या वर्षासाठी राज्यातील पा्रथमिक,
माध्यमिक व उच्च् माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धांचे आयोजन
करण्यात आले आहे. संशोधनात्मक कार्याची आवड असणा-या शिक्षकांनी या स्पर्धेत भाग
घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी आपले नवोपक्रम चार प्रतीत आवश्यक
त्या कागदपत्रांसह संबंधित जिल्हयाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे
दिनांक 30 नोव्हेंबर 2014 पर्यंत पाठवावे. स्पर्धेच्या सविस्तर माहितीसाठी संबंधित
जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), प्राचार्य, जिल्हा शिक्षण व
प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या
कार्यालयाकडे संपर्क साधावा.
स्पर्धेची
उदिष्टये :- प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात
अध्यायन अध्यापनाशी संबंधित क्षेत्रांमधील पारंपारिक पध्दती बदलून त्यामध्ये
सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहित करणे, शिक्षकांनी प्रशिक्षण
क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले मुलभूत आणि उपयुक्त संशोधनात्मक कार्य
सर्वसामान्य शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासकांच्या माहितीसाठी प्रस्तृत करणे,
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रांमधील नवनवीन संकल्पना,
विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन- अध्यापन पध्दती यांचा निरंतर शोध घेणा-या
शिक्षकांना उत्तेजन देऊन त्यांना त्यासाठी प्रोत्साहन देणे.
स्पर्धकांची
पात्रता :- स्पर्धेत भाग घेणारे
स्पर्धक हे जिल्हा परिष्द, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अथवा मान्यता प्राप्त प्राथमिक,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 12 वीला शिकविणारे शिक्षक
म्हणून काम करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इयत्ता 5 वी ते 8 वी ला शिकविणारे
शिक्षक प्राथमिक स्पर्धेत गणले जातील.
स्पर्धेचे नियम : - नवोपक्रम सादर केल्याच्या तारखेस स्पर्धक प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक
शाळांमध्ये शिकवित असावेत, निवडलेला नवोप्रकम, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणा-यांना उपयुक्त ठरणा-या कोणत्याही विषयावरील
असावा, नवोपक्रम शिक्षकांच्या स्वत:च्या
संशोधनावर अथवा अनुभवावर आधारलेला असावा. नवोप्रकमाच्या प्रकल्प अहवाल सोबत.
राज्य व राष्ट्रीयस्तरावरील अन्य कोणत्याही स्पर्धेसाठी या अगोदर पाठविलेला
नवोपक्रम या स्पर्धेसाठी पाठविण्यात येऊ नये. प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
नवोपक्रमाची पृष्ठयसंख्या 40 ते 50 असावी, अहवालात वापरलेले संदर्भ
नवोपक्रमाच्या शेवटी नमुद करावेत. नवोपक्रमाला जोडलेली परिशिष्टे संक्षिप्त
असावीत. मुख्याध्यापक, प्राचार्य स्वाक्षरी नाव व शिक्का मराठी, इंग्रजी किंवा
हिंदी यापैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा.
स्पर्धकाचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव व पत्ता, कायमाचा पत्ता, जन्मतारीख्,
शैक्षणिक अर्हता, शिक्षक म्हणून केलेल्या कामाचा अनुभव, नवोपक्रमाचे शिर्षक, नवोपक्रमाची
पृष्ठसंख्या. नवोप्रकम ए 4 साईज कागदच्या एकाच बाजूस सुवाच्च हस्ताक्षरात लिहिलेला
असावा. कार्डशीट कव्हर वापरुन साधी बांधणी केलेला असावा.
नवोपक्रमाचे जिल्हा व राज्यस्तरावर मूल्यांकन पुढील निकषांच्या आधारावर
करण्यात येईल. नवीनता (कल्पाना कार्यवाही पध्दती) 20 गुण, नियोजन (वेळापत्रक
साधने, पुरावे, सादीकरण इत्यादीचे) 25 गुण, कार्यवाही 25 गुण, यशस्विता 15 गुण,
अहवाल लेखन 10 गुण, संदर्भ व उद्दिष्टे 5 गुण एकूण 100 गुण
पारितोषिक :- जिल्हा पातळवरील पहिल्या तीन उत्कृष्ट नवोपक्रमाना
अनुक्रमे रु. 1000/, रु 800, रु. 600 रु.
400,रु 200 ची रोख पारितोषिक व प्रशस्तिपत्रके देण्यात येतील. तसेच क्रमांक 6 ते
10 च्या नवोपक्रमांना फक्त उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रके देण्यात येतील.
राज्यस्तरावरील स्पर्धेतील उर्वरित सहभागी सदस्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेत भाग घेणा-या शिक्षकांनी आपला नवोपक्रम चार प्रतीत आवश्यक त्या
सर्व प्रमाणपत्रांसह आपल्या जिल्हयाच्या प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण
संस्थेकडे दि. 30 नोव्हेंबर 2014 अखेर पर्यंत सादर करावेत.
* *
* * * * * * * *
दुचाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका
जळगाव, दिनांक 30 :- उप
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दुचाकी चाकी नवीन नोंदणी क्रमांक एमएच 19/ बीवाय 0001 ते 9999 पर्यंतची मालिका वाहन धारकांना उपलब्ध
होणार आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांकरीता आकर्षक नोंदणी क्रमांक हवा असेल
त्यांनी उप प्रादेशिक कार्यालयात अर्ज
दाखल करावेत, विहीत शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरु झाल्यावर करुन आकर्षक
नोंदणी क्रमांक प्राप्त करुन घ्यावेत. आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहन 30
दिवसाचे आत नोंदणी करुन कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. 30 दिवसाचे आत वाहन
नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क हस्तांतरीत किंवा परतावा होणार नाही. त्या रकमेचा
परत वापरही होऊ शकणार नाही, अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव
येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
* *
* * * * * * * *