महाविद्यालयांनी ई-स्कॉलशिप
संकेतस्थळावरील
माहिती अदयावत करण्याचे आवाहन
जळगाव, दि. 17 :- जळगाव जिल्हयातील सर्व
महाविदयालय / व्यवसायीक महाविदयालयांनी, सामाजिक न्याय विभागाच्या ई-शिष्यवृत्तीचा
लाभ घेण्यासाठी जळगाव जिल्हयातील सर्व महाविदयालयांना शासनाचे https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळास त्वरीत भेट देऊन डॅशबोर्डावरील
दस्तऐवज या रकान्यातील लिंक फाईल पाहून त्यामध्ये आपल्या महाविदयालयाचे नाव ,
मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, व अभ्यासक्रमाचा कालावधी सॉप्टवेअरमध्ये
व्यवस्थितरित्या समाविष्ट झालेला आहे किंवा नाही याची खात्री करावी.
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी, परीक्षा फी, प्रदाने योजना
सन 2011 पासून ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. सदर योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी
करण्यासाठी व त्यातील असलेल्या त्रूटी दूर करण्यासाठी राज्यातील प्रत्येक
विदयापीठाकडून त्यांच्या अधिनस्त आलेली मान्यताप्राप्त महाविदयालये, त्यातील
मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, त्यांची मान्य संख्या, सदर अभ्यासक्रमाचा कालावधी
याबाबतची माहिती प्राप्त करुन घेऊन ती ई- स्कॉलरशिप सॉफ्टवेअरमध्ये सामाविष्ट
करण्यात आली आहे. अभिमत विदयापीठे (Deemed Universities) व त्यातील अभ्यासक्रम
यांचा या सॉफ्टवेअरमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
आपल्या महाविदयालयाचे नाव किंवा एखादा अभ्यासक्रम या सॉफ्टवेअरमध्ये
सामाविष्ट केला गेला नसेल अथवा अभ्यासक्रमाचा कालावधी चुकलेला असेल तर आपण या
संदर्भात लेखी निवेदन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण जळगाव यांच्याकडे आवश्यक त्या
पुराव्यासहित उदा. विदयापीठाने संबंधित महाविदयालयास त्यातील अभ्यासक्रमास / मान्य
संख्येस दिलेली मान्यता यांचे आदेशासह दि. 20 जून 2014 पर्यत सादर करावे.
महाविदयालयाचे नाव, त्यातील अभ्यासक्रम किंवा त्याचा कालावधी सॉफ्टवेअरमध्ये
व्यवस्थितरित्या समाविष्ट न झाल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून
तसेच महाविदयालये शिक्षण फी व परीक्षा फी पासून वंचित राहिल्यास त्यांची संपुर्णत:
जबाबदारी संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील,असे आवाहन सहाय्यक आयुक्त
, समाजकल्याण जळगाव यांनी केले आहे.
* * * * * * * *
अस्थिव्यंग
अपंगांसाठी व्यवसाय प्रशिक्षण
जळगाव दि. 17 :- प्रेरणा ट्रस्ट,औरंगाबाद,
संचलित निवासी अपंग केंद्र (कार्यशाळा ) येथे
16 वर्षावरील 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी महाराष्ट्र राज्य
व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे मान्यता प्राप्त
व्यवसाय अभ्यासक्रम राबविते. त्यासाठी
अपंगांनी प्रवेशासाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेत शिकवले जाणारे अभ्यासक्रम व आवश्यक
पात्रता याप्रमाणे- सी. टी. सी. शैक्षणिक पात्रता 10 वी 12 वी उत्तीर्ण, टेलरींग
ॲण्ड कटींग - 7 वी पास, इलेक्ट्रिक वायरमन- 8 वी पास, इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी- 10 वी
प्रवेशित.
मराठवाडा व मराठवाडया बाहेरील अपंग
व्यक्तीसाठी संस्थेची विनाअनुदानित व मोफत वसतीगृह निवासी व्यवस्था, नास्ता, भोजन,
वैद्यकीय उपचार व अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा, खेळासाठी क्रीडांगण व मनोरंजनाची
साधने उपलब्ध आहेत. प्रशिक्षण कालावधीत अपंगाना स्वखर्चासाठी कमवा शिका योजनेतून
विविध उपक्रम राबवून विद्यावेतन दिले जाते. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त अपंगानी लाभ
घावा असे आवाहन केले आहे.
* * * * * * * *
पंचायत समिती सभापती पद आरक्षण
सोडत 30 जून रोजी
जळगाव, दि. 17 :- जळगाव जिल्हयातील
पंचायत समित्यांचे सभापती पदे दि. 12 सप्टेबर 2014 पासून पुढील अडीच वर्षांच्या
कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला
यांचेसाठी सोडत पध्दतीने आरक्षीत करावयाची आहे. त्यासाठी सोडत सभा दिनांक 30 जून
2014 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार
जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व संबंधितांनी व जिल्हा परिषद अथवा
पंचायत समिती क्षेत्रातील ज्या नागरिकांना सदर सभेस उपस्थित राहण्याची इच्छा आहे
त्यांनी उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी
रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment