Wednesday, 4 June 2014

शहरात मोफत जयपूर फूट रोपण शिबीराचे आयोजन

शहरात मोफत जयपूर फूट रोपण शिबीराचे आयोजन

            चाळीसगाव, दिनांक 4 जून :-  पोलीओमुक्त  भारताबरोबर  अपंगमुक्त भारत करण्याचे रोटरी क्लब व महावीर ‍ विकलांग  सहायता ‍ समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने  चाळीसगांव शहरात मोफत जयपूर फूट रोपण (कृत्रीम पाय बसविणे) या शिबीराचे आयोजन दिनांक 09 जून 2014  ते 12 जून 2014 या कालावधीत  शहरातील साईकृष्ण हॉस्पीटल, लक्ष्मीनगर, चाळीसगांव यंथे संपन्न होणार आहे.  तरी चाळीसगांव पंचक्रोशीतील अपंग बंधु-भगिनींनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन  रोटरी क्लब ऑफ चाळीगांवचे अध्यक्ष रोटे. डॉ. सुनिल राजपूत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            सदर ‍ शिबीरात गरजू  अपंग बंधु-भगिनींना कृत्रीय पाय  बसविण्यात येतील तसेच कॅलीपर्स  व क्रचेसचे वाटपही करण्यात येणार आहे. चार  दिवस चालणा-या या शिबीरात जयपूर फूट व्हॅन मध्ये कृत्रीम पाय बनवि ण्याचे वर्कशॉप कार्यरत राहील. रोटरी क्लबचे सदस्य रोटे.हिरानंद बजाज, सामाजिक कार्यकर्ते अशोकभाई रावलानी यांचे  विशेष सहकार्यातून तसेच डॉ.मंगेश रविंद्र वाडेकर,  रोटे. अनुप परमार व डॉ.अमित जैन यांच्या मदतीने हे  शिबीर घेण्यात येणार आहे. गरजूंनी अधिक ‍ माहितीसाठी संपर्क क्रं. 9579962262, 9604927852, 9822053939, 9822772177 या भ्रमणध्वनींवर संपर्क साधावा. असे आवाहन रोटरी क्लब ऑफ चाळीसगांवचे अध्यक्षांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये  कळविले आहे.
* * * * * * * *

अंध विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

            चाळीसगाव, दिनांक 4 जून :-  चाळीसगांव येथील  राष्ट्रीय सहकारी  शिक्षण  प्रसारक मंडळ  संचलीत अंधशाळा चाळीसगांव या संस्थेत सन 2014-2015 या शैक्षणीक वर्षाकरिता  वय 6 ते 12 वर्षे वयोगटातील अंध मुलामुलींना  प्रवेश देणे सुरु आहे. तरी पालकांनी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन  मुख्याध्यापिका अंधशाळा चाळीसगांव यांनी केले आहे.
            अंध शाळेत मोफत जेवण, निवास व शिक्षणाची  व्यवस्था असून प्रवेश घेवू  इच्छीणा-या  अंध मुलामुलींनी  पुढील पाच प्रकारच्या कागदपत्रांची पुर्तता करावी (1) अंध असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक  यांचे कडील  त्रिस्तरीय प्रमाणपत्र (2) जन्म तारखेचा दाखला (3) पालकांचा उत्पन्नाचा दाखला (4) अंध ‍व्यतिरीक्त इतर अपंगत्व नाही तसेच इतर आजार नाहीत याचे आरोग्य तपासणी प्रमाणपत्र (5) अंध मुला-मुलींचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो वरील कागदपत्रांची पुर्तता करुन  संबंधितांनी  अंधशाळा चाळीसगांव जिल्हा जळगांव च्या मुख्याध्यापिका  श्रीमती प्रभा मेश्राम यांचेशी त्वरीत संपर्क साधावा. संपर्कासाठी दुरध्वनी क्रं. 02589-223426 तर मोबाईल क्रं. 8308279115 असा असून यावर संपर्क साधावा असे आवाहन  प्रसि ध्दी पत्रकान्वये केले आहे.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment