जळगांव, दि. 5 - शहरात 30 कोटी
रुपये खर्च करुन शासनातर्फे जळगांव येथे उभारण्यात येत असलेले बंदिस्त नाटयगृह हे
स्थानिक नाटय कर्मींना आदर्श नाटय मंदीर उपलब्ध करुन दिल्याचा आत्मिक समाधान मला
असल्याचे मत राज्याचे कृषीराज्यमंत्री तथा पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज येथे
व्यक्त केले. आज सकाळी जळगांव शहरात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या शासकीय निवासस्थाना
लगत 30 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येणा-या बंदिस्त नाटयगृहाचा कोनशिला
समारंभ त्यांच्या हस्ते झाला त्याप्रसंगी
आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे, माजी
पालकमंत्री गुलाबराव देवकर, महापौर किशोर पाटील, ॲड रविद्र पाटील, जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर, अधीक्षक अभियंता प्रविण रणभोर, गफार मलिक आदि मान्यवर उपस्थित
होते.
सावकारे पुढे म्हणले , अद्यावत
नाटयगृहामुळे व्यावसायिक नाटय संस्था अपली कलाकृती सादर करण्यासाठी जळगांवी मोठया
प्रमाणावर येतील शहरातील नाटय रसिकांची अनेक वर्षापासून मागणी पूर्ण होत आहे.
स्थानिक नाटय कलावंत त्यांचा अभिनय पाहून मार्गदर्शन मिळेल व त्यातून चांगले
कलावंत निर्माण होतील ते जिल्हयाचा नाव लौकिकात भर घालतील जळगांव प्रमाणेच भुसावळ
येथेही नाटयगृह उभारण्याचा प्रयत्न सुरु आहे.
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी
आपल्या मनोगतात नाटयगृह निर्मितीसाठी केलेले प्रयत्न व जळगांवातील नाटयप्रेमी व
प्रशासनातील अधिका-यांनी केलेले सहकार्या बद्दल उपस्थितांना माहिती दिली. विरोधी
पक्षनेते एकनाथराव खडसे, महापौर किशोर पाटील, शंभू पाटील यांनी आपले विचार मांडले.
कार्यकारी अभियंता संजय सोनवणे
यांनी प्रस्तावित नाटयगृहात निर्माण
होणा-या सुविधा आणि निर्मीतीतील तीन टप्प्यांची माहिती दिली आज पहिला टप्प्यांचा
कामांचा शुभारंभ झाला त्यास 13 कोटी रुपये खर्च होणार आहे. नाटयगृह निर्मितीसाठी माजी
पलकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केलेल्या प्रयत्नांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
नाटयकर्मीनी त्यांचा विशेष् सत्कार केला जेष्ठ नाटयकर्मी तारे यांनी श्रध्दांजली
अर्पण करण्यात आली . या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी रणे, विनोद देशमुख,
वाल्मीक पाटील, रमेश पाटील, विनोद तराळ, नाटय प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा
अभियंता भदाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन उप अभियंता टी. जे. पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment