भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन
समारंभ ;
पालकमंत्री अनिल पाटील यांच्या
हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण
नंदुरबार,
दिनांक 12 ऑगस्ट, 2024 (जिमाका वृत्त)
भारताचा
78 वा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्याचे मदत व पुनर्वसन,
आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते
गुरुवार 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 09-05 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाचे प्रांगण नंदुरबार येथे होणार आहे,
असे उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई-वडील, शौर्य पुरस्कार विजेत्या, स्थानिक राजकीय पक्षातील प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, इतर मान्यवर आणि नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे
0000000000
No comments:
Post a Comment