कापूस पिकावरील गुलाबी
बोंडअळी नियंत्रणाबाबतची
20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी
यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
जळगाव, दिनांक 16 ऑगस्ट (जिमाका वृत्त) : जळगाव जिल्हयात जिनींग प्रेसिंग मिल्स व कापूस सरकीपासून
तेल काढणारे उद्योग कार्यरत आहेत. येणा-या कालावधित कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा
प्रादुर्भाव आढळुन येण्याची शक्यता असते. यासाठी वेळीच उपाययोजना करुन जिल्हयातील सर्व
जिनींग प्रेसिंग मिल्स व कापूस सरकीपासून तेल काढणारे उद्योग यांचे मार्फत शेंदरी बोंडअळीचा
प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी वेळीच खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जिल्हयातील सर्व जिनींग प्रेसिंग मिल्स व कापूस सरकीपासून
तेल काढणारे उद्योग यांच्या मालकांची बैठक मंगळवार, दिनांक 20 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी
11.00 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात
आलेली आहे, त्यासाठी संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले आहे.
0 0 0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment