Saturday, 21 September 2013

भारतीय वायुसेनेतील सैनिकांच्या पाल्यांना बिनिव्हलंट फंडातून शिष्यवृत्ती योजना



भारतीय वायुसेनेतील सैनिकांच्या पाल्यांना
बिनिव्हलंट फंडातून शिष्यवृत्ती योजना
                     जळगाव, दि. 21 :- भारतीय वायुसेनेतील सेवानिवृत्त सैनिकांच्या पाल्यांना भारतीय हवाई दलातील बिनिव्हलट फंडामधुन शिष्यवृत्ती मिळण्याची तरतूद आहे. इयत्ता 12 ते पदवी परीक्षेपर्यत शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याची  / पोहचण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2013 आहे. पदवी परीक्षेनंतर पुढील अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याची दिनांक 31 ऑटोबर 2013 आहे. शिष्यवृत्तीचे फॉर्म जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे विनामूल्य उपलबध आहेत. वायु सेनेतील जास्तीत जास्त वायु सैनिकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

No comments:

Post a Comment