Wednesday, 4 September 2013

कापूस व सोयाबीन कीड रोगाविषयी मार्गदर्शन व सल्ला



कापूस व सोयाबीन कीड रोगाविषयी मार्गदर्शन व सल्ला
           जळगाव, दि. 4 :- जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यातील कापूस, व सोयाबीन हे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते शासनाने या पिकांचे सर्वेक्षण करणेसाठी तालुकास्तरावर कीड सर्वेक्षक व किड नियंत्रक यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्यास्थितीत कापूस व सोयाबीन पिकावर खालीलप्रमाणे किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. या रोग नियंत्रणासाठी कृषि विषयक सल्ला पुढीलप्रमाणे-
           कापूस - किडीचा प्रादुर्भाव 1.00 सरासरी ग्रेड आढळूण आला तरी पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन किडींच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. जर कपाशीच्या झाडाच्या खालच्या बाजूस पाने आकसलेली तसेच कोकडलेली अधिक पानाच्या कडा पिवळसर रंगाच्या होणे किंवा तुरतुडे प्रति पान पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत आढळून आल्यास तसेच किडीच्या नैसर्गिक शत्रू किडींची संख्या जर जास्त असेल तर हानिकारक रासायनिक  किटकनाशकाचा वापर टाळावा. गरज भासल्यास व्हर्टिसिलिम लेकानी  @ 10  ग्रॅम प्रति लिटर किंवा विवेरीया बासियांना या बुरशीची 10 मिली प्रति लिटर किंवा निम तेल 5 मिली अधिक 1 ग्रॅम वाशिंग पावडर प्रति लिटर पाणी याची फवारणी करावी. किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तरी पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन किडीच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवावे. भविष्यात जर किडीची संख्या पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत 10 पिल्ले व प्रौढ , 3 पाने , झाडे आढळून आल्यास तसेच किडीच्या नैसर्गिक शत्रू किडींची संख्या जर जास्त असेल तर हानिकारक रासानिक किटकनाशकाचा वापर टाळावा . गरज भासल्यास व्हर्टिसिलियम लेकानी @ 10 ग्रॅम प्रति लिटर किंवा विवेरीया वासियांना या बुरशीची 10 मिली प्रति लिटर किंवा निम तेल 5 मिली अधिक 1 ग्रॅम वाशिंग पावडर प्रती लिटर पाणी याची फवारणी करावी. जर किडीची संख्या पिक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत 10 पिल्ले व प्रौढ , 3 पाने ,झाड आढळून आल्यास तसेच किडीच्या नैसर्गिक शत्रू किडींची संख्या जर जास्त असेल तर हानिकारक रासायनिक हिकटनाशकाचा वापर टाळावा. गरज भासल्यास व्हर्टिसिलियम लेकानी  @ 10 ग्रॅम प्रति लिटर किंवा विवेरीया बासियाना या बुरशीची 10 मिली प्रति लिटर किंवा निम तेल 5 मिली अधिक 1 ग्रॅम वाशिंग पावडर प्रति लिटर पाणी याची फवारणी करावी.
           सोयाबीन - उंट अळी स्पोडोप्टेरा व हेलीकोव्हर्पा अळीच्या व्यवस्थापनासाठी बीव्हेरिया बासियांना 2 ग्रॅम किंवा प्रोफिनोफॉस 50 टक्के 2.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. स्पोडोप्टेराच्या अंन्डीपुंजा व समुहातील अळयावर लक्ष्य ठेवावे. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा. पाण्याचा निचरा करावा व पीक तण मुक्त्‍ ठेवावे.
                                                                  * * * * * * * *

No comments:

Post a Comment