आठवडयातुन एकदा पाळावा कोरडा दिवस
चाळीसगाव दिनांक 10 :- जिल्हयात डेंग्यु या साथीच्या रोगाची लागण सुरु आहे. या साथीच्या रोगाचा
प्रसार लागण होऊ नये या
करीता प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन आठवडयातुन एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन नगरपरिषदेमार्फत मुख्याधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
या आजाराचा प्रसार डासांमार्फत होत असतो.
शहरातील डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करावी, साठवणीचे पाणी रिकामे करित असतांना साठवणीचे पाणी गटारीत न टाकता ते कोरडया जागेवर टाकावे, कुलर, फुलदाणी, फ्रीज यामधील पाणी दर आठवडयाला बदलवून कोरडे करुन नंतर पाण्याने भरावे, टायर दुकानदार यांनी रिकामे टायर हे त्वरीत शहराबाहेर हलवावे, शहाळे विक्रेत्यांनी रिकामी शहाळे इतरत्र न टाकता कचरा कुंडीत टाकावे, शहरातील पिण्याच्या पाण्याच्या नळांना तोटया बसवाव्यात. तसेच पाणी साठवणीचे साधने आठवडयातुन एकदा स्वच्छ व कोरडी करुनच वापरावी. साथीच्या रोगाची लक्षणे दिसताच नगरपरिषद दवाखाना किंवा ग्रामीण रुग्णालय, चाळीसगांव यांच्याकडे वेळोवेळी तपासण्या करुन घ्याव्यात.
शहरातील नागरिकांनी साथीच्या रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय करण्याविषयी तसेच योग्य त्या मार्गदर्शनासाठी संपर्क साधण्याचे आवाहन नगरपरिषदेमार्फत एका प्रसिध्द्ी पत्रकान्वये करण्यात
आले आहे.
* * * * * *
No comments:
Post a Comment