Friday, 6 September 2013

तलाठी भरती परीक्षा केंद्रांवर कलम 144(2) लागू : प्रांताधिकारी गणेश मिसाळ



वृत्त विशेष                                                                                                               दिनांक  06.09.2013


तलाठी भरती परीक्षा केंद्रांवर  कलम 144(2) लागू 
: प्रांताधिकारी गणेश मिसाळ

चाळीसगाव दिनांक 06 :- जिल्हा महसूल विभागात तलाठी भरती प्रक्रिया सुरु असुन रविवार दिनांक 08 सप्टेंबर, 2013 रोजी सदर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये त्या ठिकाणी शांतता सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी  यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1)(2) नुसार परीक्षा केंद्रांवर सकाळी 09:00 ते 14:00 दरम्यान सर्व परीक्षा केंद्राचे 100 मिटर परिसरात मनाई आदेश लागु केले आहेत.
दरम्यान चाळीसगाव उपविभागात केंद्र प्रमुख म्हणुन उप विभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचा-यांना दिनांक 05 07 सप्टेंबर, 2013 रोजी एकदिवसीय प्रशिक्षण साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षार्थी हे रायगड, अहमदनगर, नाशिक, ठाणे, चाळीसगाव असे एकुण 4021 विद्यार्थी सदर परीक्षा देणार असुन शहरातील 14 शाळा महाविद्यालये ताब्यात घेण्यात आली आहेत. परिक्षेसाठी 168 समवेक्षक, 35 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील वर्ग-1 वर्ग-2 च्या 14 अधिका-यांची उप केंद्रप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बाहेर गावाहुन येणा-या परीक्षार्थ्यांसाठी अतिरीक्त एस.टी.बस सेवा उपलब्ध करण्यात आली असुन परीक्षा केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करुन भरारी पथकही नेमण्यात आल्याचे प्रांताधिकारी मिसाळ यांनी कळविले आहे. तलाठी भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शीपणे राबविण्यात येणार असुन परीक्षार्थ्यांनी कुणाच्याही भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही प्रांताधिकारी मिसाळ यांनी केले आहे.
* * * * * *

वृत्त विशेष                                                                                                               दिनांक  06.09.2013

भूजल उपशावरील निर्बंध उठविले
                                 
चाळीसगाव दिनांक 06 :- उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांच्या कडील दिनांक 22.02.2013 दिनांक 12.02.2013 अन्वये पाचोरा चाळीसगाव उपविभागातील 4 बंधारे, 2 मध्यम प्रकल्प 13 लघु प्रकल्प या पाणी पुरवठा करणा-या सार्वजानिक विहिरींच्या स्त्रोतांपासून 1 कि.मी. पर्यंत पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजना व्यतिरिक्त भूजल उपश्यांवर बंदी घालण्यात आली होती.
त्या अनुषंगाने पाचोरा चाळीसगाव उपविभागात 1 जून ते 31 ऑगस्ट, 2013 या कालावधीत झालेल्या समाधानकारक पर्जन्यमानामुळे जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेश क्र.985/2013 दिनांक 05.09.2013 नुसार भूजल उपश्यावर घालण्यात आलेले निर्बंध उठविण्यात आले आहे. सदर निर्बंध उठविण्यासाठी चाळीसगावचे आमदार राजीव देशमुख यांनी पाठपुरावा केला असल्याचे प्रांताधिकारी मिसाळ यांनी प्रसिध्द्ी पत्रकान्वये कळविले आहे.
* * * * * *

No comments:

Post a Comment