Friday, 27 September 2013

महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाचा आधारवड व्हा ! ना.आर.आर.पाटील



         
         महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाचा आधारवड व्हा !       
                                                       ना.आर.आर.पाटील
प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 108 व्या सत्राचे दीक्षांत संचलन सपंन्न
नाशिक दि.27-आज सर्व पोलीस उपनिरीक्षक कठीण असे समजले जाणारे प्रशिक्षण घेवून बाहेर पडत आहे.येथून बाहेर पडतानां ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला जागृत राहून काम करा तसेच महाराष्टातील सर्वसामान्य माणसाचा आधारवड व्हा  असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस ॲकेडमी,नाशिक येथे आयोजित प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 108 व्या सत्राचे दीक्षांत संचलनाच्या वेळी केले.याप्रसंगी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महासंचालक संजीव दयाल, अर पोलीस महासंचालक सुर्यप्रताप गुप्ता,पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल, नाशिक परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरिक्षक धनंजय कमलाकर, विभागीय आयुक्त रवींद्र जाधव,जिल्हाधिकारी विलास पाटील व महाराष्ट्र पोलीस ॲकेडमीचे संचालक  संजय बर्वे उपस्थित होते.
                        श्री.पाटील म्हणाले की, ज्या महत्वपूर्ण सेवेत आज पोलीस उपनिरीक्षक प्रवेश करतायत त्यासेवेचा लौकीक आपल्या माध्यमातून व्हावा.  108 या सत्रातून 1529 पोलिस उपनिरिक्षक आज बाहेर पडत आहे राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात मोठी भरती आहे. त्यात 465 महिला पोलिस उपनिरीक्षक पोलिस दलाला प्राप्त होत आहे.इतर राज्यापेक्षा सर्वाधिक महिला पोलिस अधिकारी व महिला पोलिस कर्मचारी हया महाराष्ट्र पोलिस दलात आहेत असा माझा विनम्र दावा आहे. मागील तीन वर्षातील  बॅच मधून महाराष्ट्र पोलिस अकादमीने जवळ जवळ 4 हजार पोलिस अधिकारी  महाराष्ट्र पोलिस दलाला उपलब्ध करुन दिलेत म्हणून त्यांचे आभार त्यांनी यावेळी मानले.शूरत्वाचा संपन्न  वारसा आपल्या महाराष्टाला लाभला आहे. जसा वर्दीचा रुबाब आहे. तशी जबाबदारीही तितकीच महत्वाची आहे. देशाचे सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी जशी जवानांची आहे. तसेच अंतर्गत कायदा व सुव्यवस्था व जनतेचे जीवीताचं रक्षण करणं हे सुदधा तितकचं महत्वाचं आहे म्हणून सर्व प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांनी आपली सेवा ही प्रामाणिक पणे दयावीत. आपल्या घटनेत मोठयातल्या मोठा नेता,अधिकारी हा जनतेचा सेवक असतो व जनता मालक आहे. या मालकाची सेवा अत्यंत प्रमाणिकपणे करा अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.
                           श्री. पाटील यांनी यावेळी सर्व पोलिस उपनिरीक्षकांना जाणिव करुन दिली की, पोलिस सेवेत मेरीट नुसार विदयार्थी येतात तसेच बदल्या देखील मेरीट नुसार होतात.म्हणुन गुणवत्तेनुसार पुढे या. मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करा. गुन्हेगार खाली मान खालुन जाईल व सर्वसामान्य माणूस हा ताठमानेने जगेल असे वातावरण तयार करा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली व सर्व  प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. पोलिस महासंचालक यांना सर्व प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांना कुंटबासोबत काही काळ घालविण्यासाठी 3 तारखेपर्यंत सुटी जाहीर करण्याची सूचना दिली.

महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यात पोलिसांचा सिंहाचा वाटा- राज्यमंत्री सतेज पाटील
 विकसनशील राज्यात काम करण्याची संधी सर्व प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांना या विभागाच्या माध्यमातून मिळत आहे. आजवर महाराष्ट्राने जी प्रगती केली आहे त्यात पोलिस विभागाचा सिंहाचा वाटा आहे. या ट्रेनिंगचा उपयोग सर्व  पोलिस उपनिरीक्षकांनी सातत्याने करावा. आई-वडीलांना व आपल्या मातीचे भान ठेवून काम करा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कायदयाचे सेवक व जनतेचे रक्षक असावे
                          संचालक-संजय बर्वे
आजवरची सर्वात मोठी अशी 1529 प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांची तुकडी बाहेर पडत आहेत.नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व प्रशिक्षणार्थीं यांनी टेंनिंग दिले आहेत. सर्व प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांनी कायदयाचे सेवक व जनतेचे रक्षक म्हणून काम करावे. पोलीस खात्याला ,कुंटुबाला अभिमान वाटावा असे कार्य करा.
जनतेची सेवक म्हणून सेवक म्हणून सेवा करायची आहे- बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅचचा किताब प्राप्त राजेंद्र गुरव-
          मी गेल्या 8 वर्षापासून नोकरी करत आहेत. चार वर्षे शिपाई म्हणून तर साडेचार वर्षे राज्यगुप्त वार्ता विभागात सहाय्यक गुप्तवार्ता  म्हणून काम केले आहे.मी मुळचा कोल्हापूर येथील ता.भुदरगड येथील कोनवडे गावाचा राहणार आहे.  बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅचचा किताब व मानाची तलवार मिळाल्यामुळे मला खुप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
                
         
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सीमा पेठकर,छाया देवरे व चेतन लोखंडे यांनी केले.
          
गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे हस्ते प्रशिक्षणार्थी
पोलिस उपनिरीक्षकांना पारितोषिकाचे वितरण
1. लाटे यशवंतराव चव्हाण सुवर्ण चषक-बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅचचा किताब –राजेंद्र दिनकर गुरव
2. वर्तणुकिचे शास्त्रामधील उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी- सुहास भिमराव कांबळे
3. तुकडीची अष्टपैलु प्रशिक्षणार्थी म्हणून आहिल्याबाई होळकर चषक उत्कृष्ठ महिला प्रशिक्षणार्थी म्हणुन सावित्रीबाई फुले चषक- तेजश्री रोहीदास शिंदे
4. सेकण्ड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅचचा किताब- मयुर साहेबराव भामरे
5. उत्कृष्ठ कायदा  प्रशिक्षणार्थी- अमोल रामचंद्र कोलेकर
6. डॉ.बी.आर.आंबेडकर चषक- अमोल रामचंद्र कोलेकर
7. उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी  रायफल आणि रिव्होलवर शुटींग न.एम.कामठे चषक – विलास वसंत कुटे
8. पी.टी.मधील उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थीचा- गुरव राजेंद्र दिनकर
9. उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी  टर्न आऊट- रोशन जिभाऊ देवरे
10. उत्कृष्ठ  खेळाडु प्रशिक्षणार्थीचा किताब- खान झुनेद बशीर
11. उत्कृष्ठ आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणार्थीचा किताब- कोरबू सुरेश सयाजी
12.उत्कृष्ठ अभ्यासु प्रशिक्षणार्थी-भामरे मयुर साहेबराव
13. उत्कृष्ठ सांस्कृतिक प्रशिक्षणार्थी- हर्षल सतिष कामराज
14. उत्कृष्ठ गुन्हे शोध  प्रशिक्षणार्थी- राठोड अविनाश अशोक
15. उत्कृष्ठ क्रिमिनालॉजी व पेनालॉजी प्रशिक्षणार्थी- सुवर्णा महादेव माने

                                                                    * * * * * * *

No comments:

Post a Comment