Tuesday, 10 September 2013

नंबर नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई करणार : पोलीस निरीक्षक संजय देशमुख



नंबर नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई करणार
                                          : पोलीस निरीक्षक संजय देशमुख

चाळीसगाव दिनांक 10 :- नवीन वाहन खरेदी केल्यापासुन सात दिवसांच्या आत वाहन आर.टी.ओ. कार्यालयाकडे नोंदणी करुन वाहन क्रमांक प्राप्त करुनच वाहनाचा वापर करणे बंधनकारक आहे. विना क्रमांक वाहन चालविणा-या  वाहनधारकांवर मोटार वाहन कलम 50/177 नुसार कडक कारवाई करण्यात येईल. तरी वाहन धारकांनी त्वरीत वाहनांवर वाहन क्रमांक टाकून घ्यावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी केले आहे.
 गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी आपल्या वाहनांवर तात्काळ नंबर टाकावा, तसेच वाहनांची कागदपत्रे वाहनासोबत बाळगावी. कुठलेही जुने वाहन खरेदी अथवा विक्री करतांना मालकाकडुन मुळ कागदपत्रांची शहानिशा करुनच व्यवहार करावा, आपल्या वाहनावर विहीत नमुन्यात नंबर प्लेट असावी, शहरात वाहन चालवितांना परिवहन विभागाने ठरवुन दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करावे. (शहरात घडत असलेल्या गुन्हेगारी मध्ये वापरण्यात येत असलेले वाहन हे विना नंबर, विना पासिंगचे चोरीचे असल्याचे निष्पन्न होते.)  तरी ज्या नागरिकांच्या वाहनांवर नंबर नसतील त्यांनी विहीत नमुन्यात नंबर टाकुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी प्रसिध्द्ी पत्रकान्वये केले आहे.
                                                                     * * * * * *

No comments:

Post a Comment