जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय सावकारे
यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
जळगाव,दि. 16:-
कृषी,पशुसंवर्धन,दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व
विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा
कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-
मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2013
रोजी दुपारी 3.00 वा. शहादा येथून शासकीय मोटारीने भुसावळकडे प्रयाण (धुळे / जळगाव
मार्गे), रात्री सोयीनुसार भुसावळ येथे आगमन.
00000
वृत्त
क्र. -614
दिनांक 16 सप्टेंबर,2013
ग्रामविकास मंत्री जयंत पाटील
यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम
जळगाव, दि. 16 :- राज्याचे
ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-
मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2013
रोजी सकाळी 5.38 वा. राजेंद्रनगर एक्सप्रेसने जळगाव रेल्वेस्थानक येथे आगमन व
मोटारीने शासकीय विश्रामगृह जळगावकडे प्रयाण, सकाळी 5.45 वा. अजिंठा शासकीय
विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव, सकाळी 7.00 वा. मोटारीने जळगावहून नरडाणा जि.
धुळयाकडे प्रयाण
000000
वृत्त
क्र. -615
दिनांक 16 सप्टेंबर,2013
यावल व अमळनेर येथे माजी सैनिकांची तालुका समितीची बैठक
जळगाव, दि. 16 -
माजी सैनिक / विधवा व त्यांचे अवलंबितांच्या अडी अडचणी सोडविण्याकरिता गठीत केलेल्या समितीची बैठक यावल येथे दिनांक 19
सप्टेंबर 2013 रोजी तर अमळनेर येथे दिनांक
24 सप्टेंबर 2013 सकाळी 11.30 वाजता
आयोजित केली आहे. तालुक्यातील माजी सैनिक / अवलंबितांनी अडी अडचणी असल्यास
लेखी स्वरुपात दोन प्रतीत आणाव्यात व बैठकीस हजर राहून आपले प्रकरण तहसिलदारांना
पुढील कार्यवाहीसाठी सादर करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन
मोहन कुलकर्णी यानी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment