देशाची भावी पिढी
घडविण्याचे काम शिक्षकांच्या हाती
: पालकमंत्री संजय सावकारे
जळगाव, दि. 5 :- भावी पिढी घडविण्याचे तसेच
राष्ट्र उभारणीचे अत्यंत महत्वाचे कार्य शिक्षकांकडून होत असते. शिक्षकांने
घडविलेला विद्यार्थी हा त्या शिक्षकांचे
प्रमाणपत्र असते. उच्च पदस्थ अथवा नाव लौकीक मिळविलेल्या एखादा माजी विद्यार्थी
आपल्या शिक्षकांस भेटून चरणस्पर्श करतो तो क्षण त्या शिक्षकाच्या जीवनातला मोठा
सन्मानाचा क्षण असतो असे भावपूर्ण उदगार जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री तथा कृषी,
पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त
जातींचे कल्याण राज्यमंत्री संजय सावकारे यांनी आज केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण
विभागा तर्फे आयोजित शिक्षक दिन समारंभात ते बोलत होते. जळगाव जिल्हा मध्यवर्ती
बॅकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी बँकेच चेअरमन आमदार
चिमणराव पाटील होते.
पालकमंत्री
पुढे म्हणाले, शासन शिक्षणासाठी विद्यार्थ्यासाठी 10 ते 12 हजार खर्च करते. तरी
आवश्यक गुणात्मक शिक्षणाचा दर्जा आपण मिळवू शकलो नाही. शिक्षकांनी चांगले कार्य करुन हे चित्र बदलण्याची जबाबदरी घेतले पाहिजे शिक्षकांचे काम अध्यपनाचे आहे. इतर
कामे शासनाकडून लादले जातात त्याचा वेळोवेळी सभागृहात विरोध केलेला आहे .
तंत्रज्ञानासोबत जातांना जिल्हयात प्रत्येक तालुक्यातील पाच शाळांमध्ये ई-लर्नींग
प्रयोगिक तत्वावर सुरु करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. 15 आदर्श शिक्षकांचा
यावेळी 500 रुपये स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ , शिक्षिकेस साडी देऊन
सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे
अध्यक्ष दिलीप खोडपे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शीतल उगले, उपाध्यक्ष
मच्छिंद्र रतन पाटील, महिला बालकल्याण सभापती सौ. लिलाबाई भिला भाऊ सोनवणे, कृषी
सभापती कांताबाई मराठे, समाजकल्याण सभापती राजेंद्र राठोड, शिक्षण सभापती रक्षाताई
खडसे , जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल गायकवाड, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल कुटे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी
शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याना प्रमाणपत्र वितरण, प्राथमिक शिक्षणांच्या गुणवंत
विकास कार्यक्रमात जिल्हास्तरावर निवड झलेले शाळांना पारितोषिक वितरण कै. निंबा दुलाजी चौधरी फिरत्या ढालीचे वितरण,
चाळीसगाव येथील तात्यासाहेब सामंत विद्यालयास करण्यात आले.
प्रारंभी वामनराव मुलींचे
विद्यालयातील मुलींनी ईशस्तवन व स्वागत सादर केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्न, सावित्रीबाई फुले
व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलनाने समारंभाचे उदघाटन झाले. प्राथमिक
विभागाचे शिक्षणाधिकारी एस. डी. पाटील यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची माहिती
दिली. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शशिकांत
हिंगोणीकर यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अजबसिंग
पाटील यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, शिक्षक त्यांचे कुटूंबीय, शिक्षण विभागाचे
कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
* * * * * * *
No comments:
Post a Comment