Friday, 20 September 2013

जादूटोणा विरोधी कायद्याच्या विशेष पुरवणीसह लोकराज्यचा उत्तर महाराष्ट्र विशेषांक प्रकाशित



जादूटोणा विरोधी कायद्याच्या विशेष पुरवणीसह
लोकराज्यचा उत्तर महाराष्ट्र विशेषांक प्रकाशित
 मुंबई, दि. 20: लोकराज्यच्या कोकण विशेषांकाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर लोकराज्यचा सप्टेंबर महिन्याचा अंक 'उत्तर महाराष्ट्र विशेष' म्हणून प्रसिध्द करण्यात आला आहे. या अंकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अंकात जादुटोणा विरोधी कायद्याचा अध्यादेश प्रकाशित करण्यात आला असून या कायद्याविषयी सामान्यपणे पडणाऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्यात आली आहेत.
          उत्तर महाराष्ट्र या प्रादेशिक विभागाचे महाराष्ट्रातील स्थान  वैशिष्टयपूर्ण आहे . सह्याद्री, सातपुडा, डोंगररांगा, गोदावरी, तापी, गिरणा,प्रवरा,भिमा या नद्या यामुळे या भागात समृध्दी आली  आहे . उत्तर महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो . प्रत्येक जिल्ह्याची आपली स्वतंत्र प्रतिमा आहे . तसेच या जिल्ह्यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून गतिमान विकासाकडे वाटचाल सुरु आहे. वैविध्याने नटलेल्या या प्रदेशाचा सर्वसमावेशक वेध घेण्याचा प्रयत्न या अंकात आहे .
          उत्तर महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी,भौगोलिक वैशिष्ट्ये, लोकजीवन, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, शिक्षण परंपरा, कर्तृत्ववान व्यक्ती, उद्योगधंदे, सहकार चळवळ, पर्यटन, खाद्यसंस्कृती इ . विविध विषयांवर मान्यवर लेखकांचे लेख या अंकात समाविष्ट आहेत .

No comments:

Post a Comment