वादळग्रस्त भागाची पालकमंत्र्याकडून पहाणी
जळगाव,
दि. 19 :- रावेर, मुक्ताईनगर
तालुक्यातील गावांना गेल्या दोन, तीन दिवसापासून वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त
भागात राज्याचे कृषी,पशुसंवर्धन,दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय
आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे
पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज भेट
देवून पहाणी केली. शेतक-यांच्या भावना जाणून घेतल्या रावेर तालुक्यातील 18
गावांची 265.72 हेक्टर क्षेत्र बाधीत झालेले असून 491
शेतक-यांना याची झळ पोहोचली असून प्राथमिक अंदाजानुसार 5 कोटी 74 लाख 63 हजार 469
रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती
सावकारे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली. मुक्ताईनगर
तालुक्यातील 22 गावातील 410 हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त असून 597 शेतक-यांना
त्याची झळ पोहोचली असून याचा नुकसानीचा प्राथमिक अंदाज 8 कोटी 44 लाख असल्याची माहिती
सावकारे यांनी दिली.
पहाणी दौ-याप्रसंगी रावेरचे आमदार शिरीष चौधरी, फैजपूरचे उपविभागीय अधिकारी
डॉ. अरविंद अंतूर्लीकर, रावेर तहसिलदार बबनराव काकडे, तालुका कृषी अधिकारी, व्ही. जी. भारंबे आदि मान्यवर उपस्थित होते. सावकारे यांनी निंभोरा येथील वादळामुळे झाड पडून
मृत्यू पावलेल्या श्रीमती जनाबाई लाला भोई,
लालचंद देवीचंद भोई यांच्या घरी जावून कुटूंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी
करुन नियमानुसार तत्काळ मदत देण्याचे जाहीर केले. रावेर , मुक्ताईनगर या नुकसानग्रस्त भागातील
पंचनामे सुरु असून आर्थिक नुकसानीचा अंदाज अधिक होण्याची शक्यता आहे, हवामानावर
आधारीत पीक वीमा नुकसानग्रगस्त भागांचे पंचनामे यांची योग्य सांगड घालून
शेतक-यांना योग्यती मदत मिळवून देण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रयत्न करु
असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment