सहाव्या
आर्थिक गणनेचे काम वेळेत पूर्ण करावे
जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर
जळगाव, दि. 19 :- सहावी आर्थिक गणना
2013 आढावा बैठक आज जिल्हाधिकारी
कार्यालयातील अल्पबचत सभागृहात जिल्हाधिकारी तथा सहगणना आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली
झाली. यावेळी त्यांचे समवेत निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनपा आयुक्त संजय
कापडणीस, जिल्हा सांख्यिकी अधिकारी रा. आ.
पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री राजूरकर यावेळी
म्हणाले, की, केंद्र शासनातर्फे राष्ट्रव्यापी आर्थिक गणना घेण्यात येत असून 6
व्या आर्थिक गणनेचे काम जळगाव जिल्हयात दिनांक 1 ऑक्टोंबर 2013 ते 15 नोव्हेंबर 2013 या कालावधीत पूर्ण
करावयाचे असल्याने या गणनेमध्ये सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा यांची प्रत्यक्ष
घरोघरी जावून प्रत्येक कुटूंबास / उद्योगांना भेटी देवून करण्यांत येणार आहे.
प्रत्येकाने बारकाईने अभ्यास करुन व योग्य तो समन्वय साधून सहाव्या आर्थिक गणनेचे
काम पूर्ण करावे असे त्यांनी उपस्थित विविध खाते प्रमुख, / प्रतिनिधी,
तहसिलदार व विस्तार अधिकारी सांख्यिकी, यांना मार्गदर्शन
करतांना सांगितले.
जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री पवार यांनी आर्थिक जनगणनेच्या
संदर्भात उपस्थितांना स्लाईड शोव्दारे
माहिती दिली. व उपस्थितांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment