Thursday, 19 September 2013

अधिकारी / कर्मचा-यांसाठी पर्यवेक्षकीय व लेखा लिपीक प्रशिक्षणाचे आयोजन



      अधिकारी / कर्मचा-यांसाठी पर्यवेक्षकीय व लेखा लिपीक प्रशिक्षणाचे आयोजन
               जळगाव, दि. 19:- वित्त विभागांतर्गत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे नाशिक विभाग यांच्यामार्फत पर्यवेक्षकीय प्रशिक्षण सत्र.क्र. 9 दिनांक 21 ऑक्टोंबर 2013 ते 8 जानेवारी 2014 (60 दिवस) या कालावधीत व महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण सत्र क्रमांक 81 हे दिनांक 21 ऑक्टोंबर 2013 ते  24 डिसेंबर 2013  ( 50 दिवस ) या कालावधीत घेण्यात येणार आहे. सदर दोन्ही प्रशिक्षणासाठी 17 व 15 मोडयुल्सप्रमाणे निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी जळगाव यांच्या कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे.
             या प्रशिक्षण सत्रासाठी कोणत्याही इच्छूक अधिकारी / कर्मचा-यास प्रवेश देण्यात येईल. सदर प्रशिक्षणासाठी संपूर्ण 60 दिवसांच्या व 50 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे बंधनकारक नसुन इच्छेनुसार विशिष्ट मोडयुल्सना प्रवेश घेण्याची मुभा अधिकारी / कर्मचारी यांना असेल. त्यानुषंगाने जळगाव जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांना त्यांच्याकडील पर्यवेक्षकीय अधिकारी/ लिपीक वर्गीय कर्मचारी तसेच सद्य:स्थिती अधिका-यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे आवाहन बाळासाहेब घोरपडे,  सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी केलेले आहे.                                                

No comments:

Post a Comment