Friday, 13 September 2013

लेखाधारकाची कार्यशाळा संपन्न



              जळगाव, दि. 13 :-   स्विय प्रपंजी लेख्यातून होणारे सर्व आर्थिक व्यवहार हे  ECS /  NEFT / RTGS  मार्फत करणे शासनाने अनिर्वाय  केले असल्यामुळे  त्याबाबतची माहिती व्हावी यासाठी  जिल्हयातील  स्विय प्रपंजी लेखाधारक, प्रशासक तसेच आहरण संवितरण अधिकारी व त्यांचे प्रतिनीधी यांची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. भारतीय स्टेट बँक व जिल्हा कोषागार कार्यालय जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा कोषागार अधिकारी शि. बा. नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली  करण्यांत आले.
            यावेळी अप्पर कोषागार अधिकारी एस. बी. सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक करुन आदात्यांच्या, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक पध्दतीने थेट प्रदान करण्याच्या योजनेचे महत्व पटवून दिले.
भारतीय स्टेट बॅक मुख्य शाखेचे प्रबंधक श्रीकांत बी. धोंड, एस. ए. करंदिकर यांनी उपस्थित सर्व स्विय प्रपंजी लेखाधारक , प्रशासक तसेच आहरण संवितरण अधिकारी, प्रतिनिधी यांना येणा-या दैनंदिन अडीअडचणी समजून घेतल्या.

No comments:

Post a Comment