वन्यजीव सप्ताह निमित्त
निबंध, चित्रकला, छायाचित्र स्पर्धेचे आयोजन
जळगाव, दि. 20 - सर्वसामान्य नागरिकांना व नव्या पिढीला निर्सग आणि वन्य जीव याविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा म्हणून वनविभागातर्फे वन्यजीव सप्ताह दिनांक 1 ते 7 ऑकटोबर 2013 या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
जिल्हयातील महाविद्यालये व मुक्त गट, कनिष्ठ महाविद्यालयीन गट, माध्यमिक विद्यालयीन गट यांच्यासाठी चित्रकला, निबंध, स्पर्धाचे आयोजन करण्यांत आलेले आहे. या स्पर्धेत , प्रथम, व्दितीय व तृतीय अशी बक्षीसे ठेवण्यात आलेले आहेत.
जळगाव जिल्हयातील महाविद्यालये तसेच माध्यमिक विद्यालये, प्राथमिक विद्यालयांनी दिनांक 1 ते 7 ऑक्टोंबर, 2013 या कालावधीत वन्यजीव सप्ताहात सहभाग घ्यावा व अधिक माहितीसाठी उपवनसंरक्षक जळगाव वनविभाग जळगाव व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक तालुका स्तरावर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक (प्रा.) धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment